Better Sleep Tips: गाढ झोपेसाठी ‘एलन मस्क’ यांचा मंत्र! गाढ झोपेसाठी ‘मस्क’ ने सांगीतले हे प्रभावी उपाय

आधुनिक काळात प्रत्येकालाच शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवण्यासाठी आहार आणि जीवनशैलीची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. पण ते पुरेसे आहे का? अलीकडील अभ्यासानुसार आहार आणि व्यायामासोबत चांगली गाढ झोप घेणे देखील निरामय आरोग्यासाठी आवश्यक मानले जाते. जाणून घ्या, चांगल्या झोपेसाठी एलन मस्क ने काय सल्ला दिला आहे.

Better Sleep Tips: गाढ झोपेसाठी ‘एलन मस्क’ यांचा मंत्र! गाढ झोपेसाठी ‘मस्क’ ने सांगीतले हे प्रभावी उपाय
एलन मस्कImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 6:58 PM

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही आधीच कोणत्याही आजाराने ग्रस्त असाल, जास्त ताण किंवा तुमची बैठी जीवनशैली असेल तर त्यामुळे तुम्हाला झोपेचे आजार (Sleep disorders) होऊ शकतात. अशा परिस्थितीत आरोग्याबाबत विशेष सतर्क राहण्याची गरज आहे. झोपेचा कालावधी आणि गुणवत्ता सुधारल्याने अनेक जुनाट आजारांचा धोका कमी होतो. मात्र, आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे चांगली झोप लोकांसाठी मोठे आव्हान बनले आहे. टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Alan Musk, CEO of Tesla) यांनी झोपेची गुणवत्ता कशी सुधारावी यासाठी काही खास टिप्स सांगितल्या आहेत. गाढ झोपेसाठी एलन मस्क यांनी एका ट्विटमध्ये झोपेच्या गुणवत्तेवर भर देत त्यात सुधारणा करण्याचे दोन मार्ग सुचवले आहेत. प्रथम- डोके बेडपासून 3-5 सेमी उंचीवर ठेवा, यासाठी तुम्ही उशा वापरू शकता. दुसरे-झोपण्यापूर्वी तीन तास काहीही खाऊ नका. अर्थात जेवणानंतर तीन ते चार तासांनी झोपण्याचे नियोजन (Sleep planning) करावे.

झोपेच्या समस्येने त्रस्त असलेल्या प्रत्येकासाठी या टिप्स प्रभावी ठरू शकतात.

  • झोपण्याची वेळ निश्चीत करा. दररेाज ठरलेल्या वेळी झोपायला जा, रोज सकाळी लवकर त्याच वेळेस उठा.
  •  तुमची बेडरूम थंड, गडद रंबछटांच्या भिंती आणि आरामदायक तापमान असल्याची खात्री करा.
  • झोपेच्या काळात टीव्ही, कॉम्प्युटर आणि स्मार्टफोन यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरू नका.
  •  झोपण्यापूर्वी फक्त हलके अन्न खा. चॉकलेट, कॅफिन आणि अल्कोहोल टाळा.
  •  झोपण्यापूर्वी शतपावलीची सवय लावा. दिवसा शारीरिकरित्या सक्रिय असल्यास रात्री गाढ चांगली झोप येण्यास मदत होऊ शकते.

गाढ झोपेवर परिणाम होण्याचा धोका

  • अभ्यास दर्शविते की, ज्या लोकांना पुरेशी झोप मिळत नाही. त्यांना विविध प्रकारच्या आरोग्य समस्यांसह आजारांचा धोका अधिक असतो.
  •  रात्रीच्या झोपे अभावी दिवसभर अंगात आळस, गलथानपणा येऊ शकतो. काम करावेसे वाटत नाही.
  •  रात्री पुरेशी झोप न मिळाल्याने दिवसा खूप झोप आणि थकवा जाणवू शकतो.
  • झोपेच्या कमतरतेमुळे तुमची विचार करण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्तेवर परिणाम होऊ शकतो.
  •  झोपेच्या कमतरतेमुळे सामान्य दिनश्चर्येत नकारात्मक परिणाम होतो.

झोपेसाठी तज्ञांचा सल्ला काय?

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) चे तज्ज्ञ सांगतात की, काही गोष्टींची काळजी घेतल्यास रात्री चांगली गाढ झोप मिळणे सहज शक्य आहे.

आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.