Skin Care | आरोग्यच नव्हे, तर तजेलदार चेहऱ्यासाठीही ‘ब्लॅक टी’ लाभदायी! वाचा याचे फायदे…

दररोज ‘ब्लॅक टी’चे सेवन केल्याने त्वचा तजेलदार दिसू शकते. तसेच, त्वचेवरील डाग कमी होतात आणि चेहरा देखील चमकदार दिसू लागतो.

Skin Care | आरोग्यच नव्हे, तर तजेलदार चेहऱ्यासाठीही ‘ब्लॅक टी’ लाभदायी! वाचा याचे फायदे...
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 10:46 AM

मुंबई : ‘ब्लॅक टी’चे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, जे केवळ आपल्या आरोग्यासाठीच नव्हे, तर त्वचेसाठीदेखील फायदेशीर असतात. दररोज ‘ब्लॅक टी’चे सेवन केल्याने त्वचा तजेलदार दिसू शकते. तसेच, त्वचेवरील डाग कमी होतात आणि चेहरा देखील चमकदार दिसू लागतो. ग्रीन टीप्रमाणेच’ ‘ब्लॅक टी’ आपल्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे (Black Tea benefits on skin).

‘ब्लॅक टी’मध्ये बऱ्याच प्रकारचे अँटि-ऑक्सिडेंट्स आहेत. जे आपल्या शरीरातून टॉक्सिक घटकांचे प्रमाण कमी करतात. तसेच हे अँटि-ऑक्सिडेंट्स आपली त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी मदत करतात. चला तर, जाणून घेऊया ‘ब्लॅक टी’ त्वचेच्या समस्या दूर करण्यात कशी मदत करते…

डोळ्यांची सूज कमी करेल..

बऱ्याच स्त्रिया वारंवार डोळ्यांखाली येणारी सूज कमी करण्यासाठी थंड ‘ब्लॅक टी’च्या पिशव्या ठेवतात. ब्लॅक टीमध्ये अँटि- इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. तसेच, त्यात कॅफिन हा घटकही असतो, ज्यामुळे डोळ्यांखालील जळजळ आणि सूज कमी होण्यास मदत होते.

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

डोळ्यांच्या खालील सूज कमी करण्याबरोबरच ‘कोल्ड टी बॅग्स’ त्वचा घट्ट करण्याचे काम देखील करतात. यामुळे, चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतात (Black Tea benefits on skin).

केस चमकदार होतात.

‘ब्लॅक टी’ हा केसांना रंगवण्यासाठी एक खूप जुना आणि पारंपारिक मार्ग आहे. केसांना नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी ब्लॅक टीचा वापर केला जातो. केस काळे आणि चमकदार करण्यासाठी मेंदीमध्ये ‘ब्लॅक टी’ मिसळली जाऊ शकते.

चेहऱ्यावरील डाग कमी करते.

‘ब्लॅक टी’मध्ये अँटी ऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि फाईन लाईन कमी करण्यासाठी मदत करते. काळ्या चहामुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होते. यात असलेले पॉलीफेनॉल आणि टॅनिन हे घटक त्वचेच्या पेशींना पुन्हा सक्रिय करण्यासाठी प्रोत्साहित करतात.

हाडांना बळकटी मिळेल.

जे लोक नियमित ब्लॅक टी घेतात त्यांची हाडे ‘ब्लॅक टी’ न घेणाऱ्यांपेक्षा बळकट असतात, असे एका संशोधनातून समोर आले आहे. मात्र, जे लोक ब्लॅक टी घेत नाहीत किंवा कमी प्रमाणात घेतात त्यांना अर्थ्रायटीस होण्याची शक्यता असते. ‘ब्लॅक टी’मध्ये फायटोकेमिकल नावाचा पदार्थ असतो ज्याचा हाडांच्या बळकटीसाठी उपयोग होतो.

(Black Tea benefits on skin)

हेही वाचा :

'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.