Fitness Goal | ताणतणावापासून दूर राहण्यासाठी शिल्पा शेट्टी घेते व्यायामाचा आधार, पाहा व्हिडीओ…
बॉलिवूडची ‘फिट अँड फाईन’ अभिनेत्री शिल्पा शेट्टी स्वत:ला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम आणि योगासन करते.
मुंबई : कोरोना लॉकडाऊनच्या काळात ताणतणाव कमी करण्यासाठी किंवा या काळात घरातून काम करताना आपण काही सोपे व्यायाम प्रकार करू शकता. या व्यायामांमुळे आपल्याला दिवसभराची ऊर्जा देखील मिळेल. बॉलिवूडची ‘फिट अँड फाईन’ अभिनेत्री शिल्पा शेट्टी स्वत:ला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम आणि योगासन करते. नुकताच तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे (Bollywood Actress shilpa shetty shares fitness video on social media).
अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. तिने तिचा फिटनेस व्हिडीओ सोशल मीडिया प्लटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टी योगासनानसह व्यायाम करताना दिसत आहे. नेहमी स्टायलिश दिसणाऱ्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीने यावेळी राखाडी पँटसह गुलाबी रंगाचा स्पेगेटी टॉप परिधान केला होता.
पाहा अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा फिटनेस व्हिडीओ :
View this post on Instagram
(Bollywood Actress shilpa shetty shares fitness video on social media)
सोशल मीडियावर फिटनेस व्हिडीओ शेअर करताना शिल्पाने लिहिले की, ‘स्वत:ला निसर्गाशी जोडणे हे माझे एकमेव ध्येय आहे. स्वत:ला तणावापासून दूर ठेवण्यासाठी स्वच्छ हवेत श्वास घेणे आणि व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. या व्हिडीओमध्ये ती स्क्वॉट करताना दिसत आहे.
शरीर मजबूत होईल!
हा व्यायाम आणि योगा केल्याने आपले शरीर मजबूत होते. याशिवाय पाचक प्रणाली देखील चांगली राहते. जे लोक हा व्यायाम नियमित करतात, त्यांचे शरीर मजबूत राहते. यासह शिल्पा म्हणाली की, ‘ज्या लोकांना पाठदुखीची समस्या आहे, त्यांनी हा व्यायाम करु नये.’
जर आपल्याला व्यायामाद्वारे ताणतणाव घ्यायचा असेल, तर आपण एरोबिक व्यायाम करू शकता. असे केल्याने तुमचे हृदय निरोगी राहते आणि मेंदूतील एंडोर्फिन बाहेर पडते.नवीनच व्यायाम करणाऱ्यांसाठी, वेगाने चालणे, फिरणे, धावणे, सायकल चालवणे, पोहणे, नृत्य, बॉक्सिंग यासारख्या गोष्टी केल्या पाहिजेत (Bollywood Actress shilpa shetty shares fitness video on social media).
या गोष्टींकडे लक्ष द्या :
कॅलरीवर लक्ष द्या.
हार्डकोर डाएटऐवजी आपल्या नियमित पदार्थांतून सेवन करत असलेल्या कॅलरीवर नियंत्रण ठेवा. आपल्या आहारात अधिक कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश करू नका.
भरपूर झोप घ्या.
पुरेशी झोप चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असते. मानवी शरीराला दररोज 7 ते 8 तास झोप मिळणे आवश्यक आहे. चांगली झोप तुम्हाला नेहमी निरोगी ठेवते.
भरपूर पाणी प्या.
दररोज 2 ते 3 लिटर पाणी प्या. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी पिण्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते आणि चरबीही कमी होते.
स्वत:ला आनंदी ठेवा.
सतत स्वत:ला आनंदी ठेवल्याने आपले आरोग्य देखील चांगले राहते. एखाद्याने प्रत्येक गोष्टीत आनंदी राहिले पाहिजे. यामुळे आपण निरोगी राहाल, तसेच तणावापासून दूर राहण्यास मदत होईल.
(Bollywood Actress shilpa shetty shares fitness video on social media)
हेही वाचा :
Fitness Secrets : अभिनेत्री मृणाल ठाकूरकडून फिटनेसचं रहस्य समोर, ‘या’ दोन गोष्टींना जास्त प्राधान्यhttps://t.co/Rh1x2hV85I@mrunal0801 #MrunalThakur #Bollywood #Fitness #Lifestyle #Fitnesssecrets #FitnessMotivation
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 8, 2020