लग्नाच्या वाढदिवसाला फिरायला जायचा बायको तगादा लावतेय; मग या ठिकाणी जाच!

लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी जोडप्यांना ऋषिकेश हे एक उत्तम आणि स्वस्त ठिकाण आहे. राम झूला, लक्ष्मण झूला, नदीकाठी कॅम्पिंग आणि राजाजी राष्ट्रीय उद्यानातील हत्तीवरून सफर यासारख्या अनेक आकर्षणे गोष्टी या ठिकाणी आहेत. हे ठिकाण रोमँटिक आणि संस्मरणीय अनुभव देऊ शकते.

लग्नाच्या वाढदिवसाला फिरायला जायचा बायको तगादा लावतेय; मग या ठिकाणी जाच!
Trip Rishikesh
Follow us
| Updated on: Nov 24, 2024 | 12:30 PM

एखाद्या निसर्गरम्य आणि सुंदर जागी लग्नाचा वाढदिवस साजरा केल्याने जोडप्यांना रोमांटिक अनुभव घेता येतो. नवीन जागा आणि दोघांनी एकमेकांसोबत घालवलेला वेळ या दोघांसाठीही संस्मरणीय असतो. कपल्ससाठी पहिल्या लग्नाचा वाढदिवस हा संस्मरणीयच असतो. कारण त्यांच्या नव्या नात्याला एक वर्ष पूर्ण झालेलं असतं. त्यामुळे या वर्षभराच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि एकमेकांचे अनुभव शेअर करण्यासाठीही जोडपं नव्या ठिकाणी जात असतात. बाहेर फिरायला जात असतात. त्यांना एकांत घालवण्याची इच्छा होती.

जर तुमचं बजेट अत्यंत कमी असेल आणि तुम्हाला स्वस्त असून सुंदर ठिकाणी जायचं असेल, तर ऋषिकेश एक उत्तम पर्याय ठरू शकतो. लग्नाच्या वाढदिवसाला सारख्या अध्यात्मिक नगरीत अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहेत. या ठिकाणांना भेट देऊन तुम्ही तुमचा दिवस संस्मरणीय ठरवू शकता. तुमची पिकनिक तुम्ही यादगार करू शकता. अशाच काही ठिकाणांची आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

राम झूला आणि लक्ष्मण झूला

हे सुद्धा वाचा

जर तुम्हाला ऋषिकेशमधील अनोखी आणि सुंदर जागा पाहायची असेल, तर तुम्हाला राम झूलाला नक्कीच भेट द्यायला हवं. ऋषिकेशमधील ही एक अत्यंत प्रसिद्ध आणि सुंदर जागा आहे. या पूलाच्या दोन्ही बाजूंना व्यापारीपेठ आहेत, जिथे तुम्ही शॉपिंग करू शकता. हा पूल ऋषिकेशच्या दोन काठांना जोडतो, ज्यात एक काठ लक्ष्मण झूला आणि दुसरा काठ राम झूला म्हणून ओळखला जातो. तुम्हाला एका काठापासून दुसऱ्या काठावर जाण्याची आवश्यकता नाही, तुम्ही या पुलावरून चालत लगेच दुसऱ्या काठावर पोहचू शकता.

कॅम्पिंगचा आनंद

कपल्ससाठी एक उत्तम पर्याय म्हणजे नदीकाठी कॅम्पिंगचा अनुभव घेणं. ऋषिकेशमध्ये नदी किनाऱ्यावर तंबू गाडले जातात. तिथे तुम्ही तुमच्या बजेटनुसार टेंट निवडू शकता. तुमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला खास बनवण्यासाठी याहून चांगला पर्याय नाही. रात्रीच्या जेवणाच्या आधी नदी किनाऱ्यावर बसून तुमच्या पार्टनरसोबत गप्पा मारणे आणि लग्नाचा वाढदिवस साजरा करणे हा अनुभव जीवनभर आठवणीत राहील. हे उत्तराखंडमधील एक अत्यंत सुंदर ठिकाण आहे.

हत्तीवरून फिरा

दुपारच्या वेळेत तुम्ही ऋषिकेशमधील राजाजी राष्ट्रीय उद्यानात जाऊ शकता. हे उद्यान शिवालिक पर्वत रांगेच्या पायथ्याशी आहे. हे भारतातील एक महत्त्वपूर्ण वन्यजीव उद्यान आहे. इथे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत हत्तीवरून फिरू शकता. पार्कमध्ये विविध पक्षी आणि वन्यजीवांची विविध प्रजाती पाहायला मिळतील. ऋषिकेशला जात असाल, तर ही ठिकाणं तुमच्या लिस्टमध्ये असायला हवी. ही सर्व ऋषिकेशमधील काही प्रसिद्ध आणि सुंदर ठिकाणं आहेत, जे तुम्ही तुमच्या प्रवासात जरूर पाहू शकता.

Non Stop LIVE Update
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ.