Health Tips । वजन कमी करायचे असेल तर दररोज एक हजार कॅलरी करा बर्न, नेहमी रहाल तंदुरुस्त
Health Tips । वजन कमी करायचे असेल तर दररोज एक हजार कॅलरी करा बर्न, नेहमी रहाल तंदुरुस्त (burn a thousand calories every day for lose weight)
मुंबई : व्यस्त जीवनशैली आणि अवेळी काहीही खाण्याची सवय असल्यामुळे प्रत्येक दुसरा व्यक्तीमध्ये लठ्ठपणा दिसत आहे. वाढते वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. काही लोक डायटिंग करतात, काही लोक जिममध्ये तासनतास घाम गाळतात. मात्र याखेरीजही तुम्ही वजन कमी करु शकता. आपल्या शरीरातील कॅलरीवर कोणतेही नियंत्रण नसणे हे वजन वाढण्याचे आपले मुख्य कारण असू शकते. वाढते वजन कमी करायचे असेल तर आपल्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर रोज एक हजार कॅलरी कमी करा. कॅलरी कमी करण्यासाठी काही उपयुक्त टिप्स आहेत. (burn a thousand calories every day for lose weight)
ट्रेडमिल वॉक
वाढते वजन कमी करण्यासाठी दररोज एख हजार कॅलरी कमी करण्याची गरज असते. यासाठी दररोज एक तास ट्रेडमिलवर वॉक करा. मात्र ट्रेडमिलवर वॉक करण्याआधी हेल्थ एक्पर्टचा सल्ला अवश्य घ्या.
पाणी भरपूर प्या
रोज 3 ते 4 लीटर पानी प्या. पाणी आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर असते. पाणी शरीरातील टॉक्सिन बाहेर टाकते आणि मेटाबॉलिज्म वाढवते. पाणी प्यायल्याने शरीरातील एक्सट्रा फॅट कमी होतात.
वेट लिफ्टिंग करा
वाढते वजन कमी करण्यासाठी वेट लिफ्टिंग करणे सर्वात चांगला पर्याय आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर रोज वेट लिफ्टिंग करा. वेट लिफ्टिंगमुळे शरीरातील एक्सट्रा फॅट कमी होतात.
पूर्ण झोप घ्या
व्यस्त जीवनशैलीमुळे बरेचसे लोक रात्री उशिरापर्यंत जागरण करतात. याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. जर तुम्हाला दररोज एक हजार कॅलरी बर्न करायची असेल तर नियमित झोपण्याच्या सवयी सुधारा. रोज कमीत कमी 8 तास झोपले पाहिजे.
सायकल चालवा
रोज अर्धा तास सायकल चालवल्यास एख हजार कॅलरी बर्न करु शकता. वाढते वजन कमी करायचे असेल तर तुम्ही कोणत्याही वेळी सायकलिंग करु शकता. (burn a thousand calories every day for lose weight)
Photo : ‘जमाई राजा 2.0’ मालिकेचं जोरदार प्रमोशन, नियाच्या लूकनं वेधलं चाहत्यांचं लक्षhttps://t.co/cOTsyAUo1b#NiaSharma #NiaSharmaPhotos
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 23, 2021
इतर बातम्या
Aging Signs | कमी वयातच शरीर वृद्धत्वाकडे झुकतंय? वेळीच ओळखा ‘ही’ लक्षणे!
Food | स्वयंपाक घरातील हिंगात दडलेयत अनेक औषधी गुणधर्म! वाचा याचे फायदे…