केसांना कोरफड जेल लावल्यानंतर केसांना किती वेळाने शॅम्पू लावावा? तज्ज्ञांचे म्हणणे जाणून घ्या
कोरफड जेल केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते. कोरफड जेल केसांना लावल्याने केसगळती कमी होते. मात्र कोरफड जेल लावल्यानंतर काही जण लगेच केस धुतात. पण लगेच केस धुणे योग्य आहे का? काय सांगता तज्ज्ञ जाणून घेऊयात.

सर्वांनाच माहित आहे की कोरफड जेल केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कोरफड जेल केस मजबूत करण्यास, केस गळती रोखण्यास आणि केसांना ओलावा प्रदान करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त कोरफड जेल स्कॅल्पची पीएच पातळी देखील नियंत्रित ठेवते त्यामुळे कोंडा आणि खाज सुटण्यापासून आराम मिळतो. कोरफड जेल केसांना लावल्याने केसांच्या वाढीस चालना मिळते.
त्वचारोग तज्ज्ञ डॉ. विजय सिंघल सांगतात की, कोरफडमध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझिंग, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे केसांच्या मुळांना पोषण देतात. काही लोकं स्कॅल्पवर कोरफड जेल लावल्यानंतर लगेच शॅम्पूने केस धुतात अशावेळी कोरफड जेल लावल्यानंतर किती वेळाने शॅम्पू लावावा हे जाणून घेणं गरजेचं आहे.
केसांना शॅम्पू कधी लावायचा?




अनेकदा असे होते की अनेक महिला कोरफड जेल लावल्यानंतर काही वेळातच केस धुतात. पण यावर तज्ञ सांगतात की कोरफड जेल लावताना त्यात नारळाचे तेल, व्हिटॅमिन ई किंवा मध मिक्स करून केसांवर लावा. अशाने केस गळण्याच्या समस्या दूर होतील व केसांना योग्य पोषण देखील मिळेल. जर तुम्ही केसांना ताजे कोरफड जेल लावत असाल तर लगेच शॅम्पू करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही 5 ते 6 तासांनंतर तुमचे केस धुवू शकता.
कोणत्या प्रकारचा शॅम्पू लावावा?
अनेकवेळा कोरफड जेल लावल्याने केस चिकट होऊ शकतात. अशावेळी तुम्ही केसांना शॅम्पू करून स्वच्छ धुवून केसांवरील चिकटपणा दूर करता येतो. अशाने तुमचे केस चमकदार राहतात. मात्र केस धुताना केवळ सौम्य शॅम्पूचा वापर करावा, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे केसांचे नुकसान होत नाही. व केसांवर कोणतेच दुष्परिणाम होत नाही.
या गोष्टी लक्षात ठेवा
तुम्ही कोरफड जेल रात्रभर केसांना लावून ठेवलात तर ते तुमच्या केसांना ओलावा आणि पोषण दोन्ही प्रदान करते. परंतु हे लक्षात ठेवा की तुम्हाला जर स्कॅल्पशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास केसांना कोरफड जेल लावण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)