कोरोना काळात ‘सब्जा’ आरोग्यासाठी अधिक फायदेशीर; जाणून घ्या याचे लाभदायी फायदे
कोरोना आजाराच्या गंभीरतेपासून वाचण्यासाठी मजबूत पोषण गरजेचे आहे. मजबूत पोषणासाठी सर्वात शक्तीशाली आणि सर्वात वेगळा असा पदार्थ म्हणजे चिया सीड्स. (chia seeds is more beneficial to health during the corona period; know the benefits of this)
मुंबई : कोरोना महामारीने संपूर्ण जगाला मोठा धडा दिला आहे. माणसाला इतर गोष्टींच्या तुलनेत आरोग्याच्या मुद्द्याला पहिले प्राधान्य द्यायला भाग पाडले आहे. आपण स्वस्थ असू तरच सर्वकाही साध्य करता येईल. आपण स्वत:च जर फिट नसू तर नैसर्गिक संकटापुढे आपली ताकद कवडीमोल ठरते. डार्विनियन इव्हॉल्युशनरी थेअरनुसार, सध्याच्या घडीला तंदुरुस्त व्यक्तीच अधिक जीवन जगत आहे. कोरोनासारख्या गंभीर आजाराशी लढण्यासाठीही स्ट्रॉंग इम्युनिटीच उपयुक्त ठरत आहे. ज्या व्यक्तींकडे स्ट्रॉंग इम्युनिटी आहे, ते लोक कोरोनाची लागण झाल्यानंतरही सुखरुप कोरोनामुक्त होत आहेत. आपण सध्याच्या कोरोना महामारीत सब्जा अर्थात चिया सिड्स कितपत उपयुक्त आहेत? त्यापासून आपण कशाप्रकारे स्वस्थ आणि मजबूत आरोग्य ठेवू शकतो? जाणून घ्या. (chia seeds is more beneficial to health during the corona period; know the benefits of this)
इम्युनिस्टी बुस्टर
कोरोना विषाणूच्या संसर्गावर कशाप्रकारे वेळीच मात करायची, याबाबत महामारी तज्ज्ञांकडून, डॉक्टरांकडून वेगवेगळे सल्ले दिले जात आहेत. कोरोना आजाराच्या गंभीरतेपासून वाचण्यासाठी मजबूत पोषण गरजेचे आहे. मजबूत पोषणासाठी सर्वात शक्तीशाली आणि सर्वात वेगळा असा पदार्थ म्हणजे चिया सीड्स. याला भारतात सब्जा म्हटले जाते किंवा चिया बिया म्हणूनही ओळखले जाते. चियाला दुसरा मराठी पर्यायी शब्द नाही. सर्व बाबींचा विचार करता चिया सीड्स एक उत्तम इम्युनिटी बुस्टर आहेत.
ओमेगा-3 चा समृद्ध स्त्रोत
चिया सीड्समध्ये 60 टक्के तेल इन ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते. ओमेगा-3 फॅटी अॅसिडमुळे ह्रदयाच्या आरोग्यावर चांगला परिणाम दिसून आला आहे. चिया सीड्सचे सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते, ह्रदय सुरळीत चालते, रक्तदाब नियंत्रणात येतो, रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहतो तसेच सूज कमी होते. चिया सीड्समध्ये प्रामुख्याने घुलनशील फायबर आणि म्युसिलेज असतात. हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीरच असतात.
प्रोटीनची संपन्नता
चिया सीड्सपासून इतर कुठल्याही बियांच्या तुलनेत दुप्पट प्रोटीन मिळतात. 100 ग्रॅम चिया सीड्समध्ये 17 ग्रॅम प्रोटीनची उपलब्धता असते. जे लोक शाकाहारी भोजनाला अधिक पसंती देतात, अशा लोकांसाठी चिया सीड्ससारखे दुसरे सुपरफूड नाही. चिया सीड्समध्ये अमिनो अॅसिडचे एक उत्तम संतुलन असते. त्यामुळे शरीराला प्रोटीन सामग्रीचा उपयोग करण्यास मोठी मदत होते. कोविड-19 रिकव्हरी डायटमध्ये हे अत्यंत उपयोगी आहे.
ब्लड शुगर कंट्रोल करते
कोविड-19 चा सर्वाधिक धोका मधुमेहाच्या रुग्णांना आहे. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. टाईप 2 मधुमेहासाठी एक सुरक्षात्मक भोजन म्हणून चिया सीड्सचा आपल्या आहारात समावेश करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. चिया सीड्समुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते. अँटीऑक्सिडेंट शरिरात फ्री रेडिकल्स कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे संसर्ग तसेच कॅन्सर यांसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. चिया सीड्सचे सेवन फळे तसेच साध्या पाण्यासोबत सहजपणे केले जाऊ शकते. (chia seeds is more beneficial to health during the corona period; know the benefits of this)
एप्रिलमध्ये रेकॉर्डब्रेक विक्री, Tata कडून ‘या’ कारच्या किंमतीत वाढ, ग्राहकांना झटका#PriceHike #Tata #TataMotors #CarsPriceHikehttps://t.co/faF6pJvdsI
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 16, 2021
इतर बातम्या
Video | हवामानाची माहिती देताना भलतंच घडलं, महिला अँकरचा व्हिडीओ पाहून लोकांच्या भन्नाट कमेंट्स
सावधान! चुकूनही ‘हे’ CoWIN अॅप डाऊनलोड करु नका! अन्यथा डेटा हॅक होईल