Baking Tips | ‘ख्रिसमस’निमित्ताने केक बनवताय? ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा!

‘केक’ हा ख्रिसमसच्या सेलिब्रेशनचा (Christmas) नेहमीच एक महत्त्वाचा भाग असतो. केकशिवाय हा सण पूर्ण होऊच शकत नाही.

Baking Tips | ‘ख्रिसमस’निमित्ताने केक बनवताय? ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा!
Follow us
| Updated on: Dec 14, 2020 | 11:19 AM

मुंबई : ‘केक’ हा ख्रिसमसच्या सेलिब्रेशनचा (Christmas) नेहमीच एक महत्त्वाचा भाग असतो. केकशिवाय हा सण पूर्ण होऊच शकत नाही. बर्‍याचदा आपण बाजारातून केक विकत घेतो, फ्रीजमध्ये ठेवून देतो आणि नंतर सेलिब्रेशनवेळी त्याला बाहेर काढून वापरतो. परंतु, या ख्रिसमसमध्ये बरीच सुट्टी असल्याने आपण काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यंदाच्या ख्रिसमस सेलिब्रेशनला आणखी खास बनवण्यासाठी आपण स्वत: केक बनवू शकता आणि आपल्या प्रियजनांबरोबर हा आनंद साजरा करू शकता. परंतु, केक बनवण्यापूर्वी आपल्याला काही टिप्स लक्षात घ्याव्या लागतील, जेणेकरून आपला केक आणखी चविष्ट बनेल (Christmas special Cake Baking tips).

ख्रिसमस केक बेकिंगसाठी खास टिप्स :

  1. केक बनवत असताना त्याची पाककृती नेहमीच काटेकोरपणे पाळा. त्यात कोणतेही बदल करण्याचा प्रयत्न करु नका. केक बनवण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक कृती, केक बनवण्यापूर्वीच आपण नीट लक्षात घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर केकसाठी लागणारे बेकिंगचे तापमान, मिक्सिंग आणि आयसिंगसाठीच्या टेप्स नीट पाळल्या पाहिजेत.
  2. जर एखाद केक बनवताना त्याच्या रेसिपीनुसार रूम टेम्प्रेचरची आवश्यकता असेल तर, त्यागोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. यामध्ये फक्त एकच गोष्ट आवश्यक आहे की, आपल्या खोलीचे तपमान केकनुसार असावे.
  3. बर्‍याच वेळा असे घडते की, आपल्याकडून केकचे मापन योग्य प्रकारे होत नाही. केक बनवतानाच्या प्रमाणात कोणत्या घटकांची आवश्यकता असते, ते लक्षात येत नाही. अशावेळी आपण आपल्या मर्जीने त्यात काही गोष्टी टाकतो आणि केक हवा तसा बनत नाही. म्हणूनच, केक बनवण्यासाठी आवश्यक घटकांचा नेहमीच योग्य प्रमाणात वापर करा (Christmas special Cake Baking tips).
  4. जर, केकच्या कृतीमध्ये इलेक्ट्रिक मिक्सरची आवश्यकता असेल तर, मिश्रण मिक्स करण्यासाठी त्याचा वापर नक्की करा. तसेच, हे मिश्रण तयार करताना आवश्यकतेनुसारच मिक्स करावे आणि त्याचे टेम्प्रेचर कमी किंवा अधिक करू नये.
  5. केक बनवताना सर्वप्रथम आपल्याकडे असलेला बेकिंग पॅन केकसाठी योग्य आहे का, याची खात्री करा. तसेच केक बेक करण्यासाठी पार्चमेंट पेपरचा वापर आवश्य करा.
  6. केक बेक करण्याच्या प्रक्रियेदरम्यान,बाहेरील हवा आत जाऊ नये यासाठी वारंवार ओव्हन उघडणे टाळा. बेकिंग दरम्यान बाहेरील हवा लागल्याने केक खराब होईल आणि आपल्याला तो फेकून द्यावा लागेल. म्हणून, केक बेकिंगसाठी आवश्यक तेवढा वेळ द्या.

(Christmas special Cake Baking tips)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.