Hair Care | केसांच्या आरोग्यासाठी लाभदायी ‘नारळाचे तेल’, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात…

केसांची निगा राखण्यासाठी बाजारामध्ये प्रकारची हेअर केअर उत्पादने उपलब्ध आहेत, ज्यांचा दीर्घकालीन उपयोग केल्यामुळे केसांचे बरेच नुकसान होते.

Hair Care | केसांच्या आरोग्यासाठी लाभदायी 'नारळाचे तेल', वाचा तज्ज्ञ काय म्हणतात...
केसांच्या आरोग्यासाठी नारळ तेल अर्थात खोबरेल तेल सर्वोत्तम मानले जाते.
Follow us
| Updated on: Jan 29, 2021 | 6:52 PM

मुंबई : केसांच्या आरोग्यासाठी नारळ तेल अर्थात खोबरेल तेल सर्वोत्तम मानले जाते. कारण त्यात केसांची चांगली काळजी घेणारे अनेक पोषक घटक असतात. नारळ तेलाच्या मालिशच्या फायद्यांविषयी बर्‍याच लोकांना माहिती नाही. चला तर, त्वचारोग तज्ज्ञ आणि हेयर व वेलनेस एक्सपर्ट अपर्णा संथानम यांच्याकडून या फायद्यांविषयी जाणून घेऊया (Coconut oil is best for hair care says hair experts).

सर्वोत्कृष्ट केस संरक्षक (प्रोटेक्टर)

केसांच्या संरक्षणासाठी नारळ तेल सर्वोत्तम आहे. उन्हात आणि उष्ण वातावरणात केसांना बर्‍याच समस्यांना सामोरे जावे लागते. केसांमध्ये असलेला नैसर्गिक ओलावा सूर्यप्रकाशामुळे देखील कमी होऊ लागतो. यामुळे केस कोरडे पडतात. परंतु नारळ तेलामुळे या समस्या टाळता येऊ शकतात. रिसर्चगेटच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, नारळ तेलाच्या मालिशमुळे ते केसांच्या तळाशी पोहचते आणि केसांचा ओलावा टिकवून ठेवणारा संरक्षण थर तयार करते. त्यात एसपीएफसह अनेक अँटीऑक्सिडेंटचे गुणधर्म आहेत, जे केसांना सूर्यामुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवते आणि केसांचे बर्‍याच रसायनांपासून संरक्षण करते.

केसांच्या आरोग्याचे आतून संरक्षण

केसांची निगा राखण्यासाठी बाजारामध्ये प्रकारची हेअर केअर उत्पादने उपलब्ध आहेत, ज्यांचा दीर्घकालीन उपयोग केल्यामुळे केसांचे बरेच नुकसान होते. नारळाच्या तेलात केसांच्या तळाशी जपण्याची क्षमता असल्याने हे केसांच्या जीवाश्मांना पुन्हा सजीव करते आणि केसांचे आरोग्य आतून निरोगी करते. त्यामध्ये उपस्थित फॅटी अॅसिडस् आणि जीवनसत्त्वे केसांमध्ये ओलावा टिकवून ठेवतात, जो कोरडेपणा दूर करण्यात प्रभावी आहेत (Coconut oil is best for hair care says hair experts).

स्काल्पची काळजी घेतात

जास्त उष्णता आणि आर्द्रतेमुळे आपल्या केसांच्या मुळांचे मोठे नुकसान होते. नारळ तेलामध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने, हे तेल स्काल्पची चांगली काळजी घेण्यात आणि डोक्यातील कोंडा, कोरडेपणा किंवा कोणताही संसर्ग इत्यादी सर्व समस्यांपासून मुक्त करण्यात हे प्रभावी आहे. केस आणि केसांची मुळे तेलकट बनवण्यातील मुख्य घटक म्हणजे टाळूवर स्थायिक होणारे सेबम, हे देखील नारळ तेल काढून टाकते.

निर्जीव केसांपासून सुटका

शॅम्पूसह अनेक केसांची निगा राखणाऱ्या उत्पादनांमध्ये असलेले केमिकल अंततः केसांचे नुकसान करते. कारण त्यात जास्त प्रमाणात रसायने असतात. त्यांच्या अत्यधिक वापरामुळे, केसांमध्ये नैसर्गिक ओलावा नष्ट होतो आणि ते निर्जीव तसेच गुंतलेले दिसतात. ही समस्या विशेषतः आर्द्र वातावरणात निर्माण होते. या समस्येतून मुक्त होण्यासाठी ओल्या केसांमध्ये नारळ तेलाचे काही थेंब घाला. असे केल्याने हा ओलावा केसांमध्येच टिकून राहतो आणि केस मऊ होतात.

सहज उपलब्ध होणारे तेल

नारळ तेल नैसर्गिक, किफायतशीर आणि सहज उपलब्ध होणारे आहे. केसांच्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी हे प्रभावी आहे. अशा परिस्थितीत, अनावश्यक महागड्या हेअर केअर उत्पादनांऐवजी नारळाचे तेल वापरणे अतिशय लाभदायी ठरते.

(Coconut oil is best for hair care says hair experts)

हेही वाचा :

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.