AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 मुळे चौथी लाट येणार का? एक्सपर्टचं म्हणणं काय?

Corona JN.1 Variant : कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 मुळे वाढतोय धोका, कोरोनाची नवीन लाट येणार का? जाणून घ्या एक्सपर्ट काय म्हणतात... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटची चर्चा...

कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 मुळे चौथी लाट येणार का? एक्सपर्टचं म्हणणं काय?
Follow us
| Updated on: Dec 22, 2023 | 1:07 PM

मुंबई | 22 डिसेंबर 2023 : 2020 मध्ये भारतात आलेल्या कोरोना विषाणूने फक्त देशात नाही तर, जगभरात हाहाकार माजवला होता. आता पुन्हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 डोकं वर काढत आहे. दरम्यान, न्यू ईयर पार्टामुळे जभरात लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अनेक लोक याला कोरोनाच्या नव्या म्हणजे चौथ्या लाटेची सुरुवात मानत आहेत. असं असताना आरोग्य एक्सपर्टचं म्हणणं काय? असा प्रश्न नक्कीच अनेकांना पडला आहे. इतक्या लवकर व्हेरिएंट JN.1 ला चौथीची सुरुवात म्हणणं फार घाईचं ठरेल.. असं आरोग्य एक्सपर्टचं म्हणणं आहे.

साथीच्या आजारांची लक्षणे देखील कोविड सारखीच असतात.

मिळालेल्या माहितीनुसार, डब्ल्यूएचओचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्या मते, एडेनोव्हायरस, राइनोव्हायरस आणि रेस्पिरेटरी सिन्सायटियल विषाणू यांसारख्या सीझनल फ्लूमुळे होणारे श्वसनाचे आजार साथीच्या आजारांना कारणीभूत ठरू शकतात. या आजारांची लक्षणं कोरोना संसर्गाच्या लक्षणांप्रमाणेच आहे.

मास्क लावणं गरजेचं आहे?

डॉ. के. कोलांडाइसामी यांच्यामते, सार्वजनीक ठिकाणा मास्कचा वापण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मास्कचा वापर केल्यामुळे फक्त कोविड-19 च नाही तर, इतर आजार दूर ठेवण्यासाठी मदत होईल. पण प्रत्येक वेळी मास्कचा वापर करणं गरजेचं नाही. पण गर्भवती महिला, वृद्धा व्यक्ती, आणि लहान मुलांनी मास्कचा वापर करणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जाणून घ्या कधी – कधी कोरोनाच्या लक्षणांमध्ये बदल झाले आहेत…

WHO ने कोरोनाची लक्षणं सांगितल्यानुसार, ताप, खोकला, सर्दी, वास न येणे, सतत थकवा येणे… अशी लक्षण कोरोना होण्यापूर्वी दिसून येतात. सामान्य लक्षणांमध्ये घसा खवखवणे, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब, त्वचेवर पुरळ, डोळे लाल होणे आणि बोटांचा रंग बदलणे यांचा सामावेश आहे. तीन सर्वात गंभीर लक्षणे म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे आणि बोलण्यात अडचण जाणवणे

CDC ने सांगितली कोरोनाची लक्षणे- सीडीसीने सांगितल्यानुसार, संसर्ग झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ते 14 दिवसांच्या दरम्यान रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणे दिसू शकतात. या लक्षणांमध्ये रुग्णाला थंडीसोबत ताप येऊ शकतो आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. एवढंच नाही तर, थकवा, डोकेदुखी, चव आणि वास येणे कमी होणे, घसा खवखवणे, उलट्या किंवा जुलाब, नाक वाहणे आणि स्नायू दुखणे होऊ शकते. अशा परिस्थितीत रुग्णाने ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि डॉक्टरांट्या सल्ल्याने उपचार घ्यावे…

अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं.
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार.
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी.
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप.
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?.
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान.
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.