सर्दी आणि खोकला म्हणजे केवळ ताप नव्हे, ‘ या ‘ गंभीर आजाराचे असू शकते लक्षण
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, बदलत्या ऋतुमानानुसार अनेक बॅक्टेरिया सक्रिय होतात, त्यामुळे न्युमोनिया आणि आरएसव्ही सारखे गंभीर संसर्ग होऊ शकतात.
बदलत्या ऋतुमानानुसार, लोकांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास सुरू होतो. ज्याला सामान्यत: लोक फ्ल्यू (flu) आणि तापाचा संसर्ग समजतात. हे लक्षात घेऊन औषधेही (medicines) घेतली जातात. मात्र अनेक प्रकरणांमध्ये, लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता ॲंटीबायोटिक्सचे सेवनदेखील करतात. मात्र तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, त्याकडे व्हायरल आणि फ्लू असे समजून दुर्लक्ष करू नये. जर एखाद्या व्यक्तीला ताप आणि सर्दी- खोकला (cough and cold)झाला असेल तर हे बऱ्याच आजारांचे प्रारंभिक लक्षण असू शकते.
डेंग्यू, न्यूमोनिया आणि आरएसव्ही संसर्ग हे असे आजार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या आजारांची सुरूवात सौम्य ताप आणि खोकला तसेच सर्दीने होते. या आजाराची सुरुवातीची लक्षणेही ही फ्ल्यू सारखीच असतात. त्यामुळेच लोकही सुरुवातीला नॉर्मल फ्ल्यू समजून या आजाराकडे दुर्लक्ष करतात, मात्र असे करू नये. अशा वेळी लोकांनी या आजारांच्या लक्षणांमध्ये जो फरक दिसतो तो समजून घेणे महत्वाचे आहे. फ्ल्यू झाला तर ताप दोन ते तीन दिवसांत उतरतो, मात्र डेंग्यू झाला असेल तर त्यामध्ये ताप जास्त काळ टिकू शकतो, असे ज्येष्ठ फिजिशियन डॉ. कवलजीत सिंग सांगतात. तसेच पोटदुखी आणि उलट्या जुलाब यांचाही त्रास होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये, शरीरावर पुरळ उठते तसेच अचानक अशक्तपणा सुद्धा येऊ शकतो.
ही आहेत न्यूमोनियाची लक्षणे –
डॉ.सिंह यांच्या सांगण्याननुसार, मुलांमध्ये न्यूमोनियाचा संसर्ग जास्त दिसून येतो . न्युमोनिया झाल्यास श्वास घेण्यास त्रास होऊन ताप येतो, तसेच थंडीही जाणवते. तर काही मुलांना खूप थकवाही येतो. सुरूवातीला न्यूमोनिया हा खोकला आणि सर्दीसारखा असतो पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पण न्यूमोनियावर वेळीच उपचार न केले नाहीत तर बाळाची प्रकृती गंभीर होऊ शकते आणि काही बाबतीत हा आजार जीवघेणाही ठरू शकतो. अशा वेळी ही सगळी लक्षणं दिसत असतील तर न्यूमोनिया बद्दल सतर्क व्हा आणि तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून वेळच्या वेळी उपचार करून घ्यावेत.
आरएसव्हीची लक्षणे –
रेस्पिरेटरी सिंक्टिअल व्हायरस (आरएसव्ही) हा फ्ल्यू सारखाच एक व्हायरस आहे. मात्र यामध्ये नाक वाहणे तसेच ताप येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे असा त्रासही होतो. आरएसव्हीची ही समस्या मुलांमध्ये जास्त दिसून येते आणि त्याचा परिणाम शरीराच्या श्वसनमार्गावर होतो. या आजाराची लक्षणं दिसत असली तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.