Digestive Health : पचन संस्था निरोगी ठेवायचीय? माग ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा!

जर तुम्हाला काही खाल्ल्यानंतर अस्वस्थ वाटत असेल, तर ते अपचनामुळे देखील असू शकते. पचन समस्या सामान्य असू शकतात, परंतु नेहमीच नाहीत. पाचन तंत्राशी संबंधित सर्वात सामान्य समस्या म्हणजे अतिसार, बद्धकोष्ठता, चिडचिड, पोटात गोळा येणे, ओटीपोटात पेटके, गॅस आणि मळमळ.

Digestive Health : पचन संस्था निरोगी ठेवायचीय? माग ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा!
Digestion
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 3:12 PM

मुंबई : जर तुम्हाला काही खाल्ल्यानंतर अस्वस्थ वाटत असेल, तर ते अपचनामुळे देखील असू शकते. पचन समस्या सामान्य असू शकतात, परंतु नेहमीच नाहीत. पाचन तंत्राशी संबंधित सर्वात सामान्य समस्या म्हणजे अतिसार, बद्धकोष्ठता, चिडचिड, पोटात गोळा येणे, ओटीपोटात पेटके, गॅस आणि मळमळ. पचन संबंधित समस्यांविरुद्ध लढण्यासाठी आपण बरेच घरगुती उपचारांचा अवलंब करता. अशावेळी पाचक प्रणाली निरोगी ठेवण्यासाठी आपण काही सोप्या टिप्सचे अनुसरण देखील करू शकता (Digestive Health Tips to keep digestion system healthy).

अन्न योग्य प्रकारे चावून खा

चांगल्या पचनाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या अन्नाचे योग्य प्रकारे चर्वण करणे. जेव्हा आपण आपल्या अन्नाचे योग्य प्रकारे चर्वण करता, तेव्हा ते आपल्या पाचक तंत्राचे कार्य सुलभ करते. म्हणून अन्न व्यवस्थित वेळ घेऊन, चावून खा. आपले अन्न व्यवस्थित आणि हळू हळू चावून खा. जेवण संपवण्यासाठी घाई करू नका, कारण यामुळे अपचन होऊ शकते.

फायबर समृद्ध आहार

पचनामध्ये फायबर भूमिका महत्वाची असते. विरघळणारे फायबर आणि अघुलनशील फायबर, दोन्ही प्रकारचे फायबर आहारात घेणे महत्वाचे आहे. हे दोन्ही आपल्या पाचन तंत्रासाठी वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात. फायबरच्या चांगल्या स्रोतांमध्ये फळे, भाज्या, धान्य, शेंगदाणे, बियाणे आणि शेंगांचा समावेश आहे. पाचन तंत्र तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रक्रिया केलेले किंवा जंक फूड खाणे टाळा.

हायड्रेटेड रहाणे

भरपूर पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. दिवसभर स्वत:ला हायड्रेटेड ठेवा आणि ताज्या फळांचा रस, लिंबू पाणी किंवा पिण्याचे पाणी आणि नारळाच्या पाण्यासारखे पेय प्या.

व्यायाम

चांगल्या आरोग्यासाठी शारीरिक व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी आपण एकतर फिरायला जाऊ शकता, धावू शकता आणि योगा देखील करू शकता. नियमित शारीरिक हालचालींमुळे तुमची पाचन क्रिया निरोगी राहते. हे पाचक समस्या दूर करण्यात मदत होते.

तणाव टाळा

ताण आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करते. ताणमुळे पोटातील अल्सर, अतिसार आणि बद्धकोष्ठता यासारख्या अनेक पाचन समस्या उद्भवू शकतात. काही श्वासोच्छ्वासाचे व्यायाम, ध्यान किंवा योगामुळे ताणतणाव टाळता येतो.

निरोगी चरबी

पाचक प्रणाली निरोगी ठेवण्यासाठी, आहारात निरोगी चरबीचा समावेश करा. यासाठी आपण आपल्या आहारात चीज, ऑलिव्ह ऑईल, अंडी, शेंगदाणे, एवोकॅडो आणि फॅटी फिशचा समावेश करू शकता. ओमेगा 3 फॅटी आम्लामुळे जळजळ कमी होते. आपण आपल्या आहारात सॅलमन, ट्यूना, चिया सीड्स, फ्लेक्स बियाणे आणि भोपळ्याचे बियाणे समाविष्ट करू शकता.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Digestive Health Tips to keep digestion system healthy)

हेही वाचा :

त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे Brown Rice; जाणून घ्या कसा वापर करायचा

Skincare Tips : पावसाळ्यात आपली त्वचा चमकदार आणि मुलायम ठेवण्याचे चार मार्ग

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.