Health Care | दह्यासोबत हे 6 पदार्थ खाऊ नका, अन्यथा होऊ शकतो पचनाचा त्रास
दही हे कॅल्शियम, विटॅमिन बी-2, विटॅमिन बी-12, मॅग्निशियम आणि पोटॅशियमने संपन्न असते. दही पचनाला हलके असते. (Do not eat these 6 foods with curd, otherwise it may cause indigestion)
मुंबई : दही म्हटले, ते खाण्याला अनेकांची पहिली पसंती असते. काही जण दहीमध्ये साखर मिसळून खातात, तर काही जणांना चवीपुरते मीठ घालून खाण्यात आनंद वाटतो. काही कापलेल्या फळांसोबत ताजे आणि मलईदार दही खाण्याची मज्जा तर औरच असते. काही न्यूट्रिशनिस्ट आणि हेल्थ एक्स्पर्टदेखील दररोज एक वाटी दही खाण्याचा सल्ला देतात. दही हे कॅल्शियम, विटॅमिन बी-2, विटॅमिन बी-12, मॅग्निशियम आणि पोटॅशियमने संपन्न असते. दही पचनाला हलके असते. परंतु, दही काही पदार्थांसोबत खाणे चुकीचे असते, अर्थात पचनाच्या दृष्टीने ते अपायकारी ठरू शकते. चुकीच्या पदार्थासोबत दही खाऊन आरोग्याला धोका ओढवून घेऊ नका. (Do not eat these 6 foods with curd, otherwise it may cause indigestion)
कांदा
जर तुम्ही कांदा दही रायता खाण्याला पसंती देत असाल तर तुम्हाला ही सवय वेळीच बदलायला पाहिजे. कारण पदार्थाच्या रुपात दही हे थंड असते, तर कांदा शरीरात गरमी तयार करतो. त्यामुळे गरम आणि थंड असे दोन पदार्थ एकत्र खाल्ल्यास स्किनवर अॅलर्जी होऊ शकते. त्वचेच्या विविध समस्या उद्धभवू शकतात.
आंबा
कापलेल्या आंब्यासोबत एक वाटी दही म्हणजे एक पूर्ण मिठाई बनू शकते. तथापि, कांदा आणि दहीप्रमाणेच आंबा आणि दहीसुद्धा शरीरात एकाच वेळी गरमी आणि थंडावा निर्माण करू शकतात. यातून त्वचेच्या समस्या उद्धभवण्याचा धोका आहे तसेच इतरही त्रास होऊ शकतात.
मासे
दोन प्रोटीनयुक्त स्त्रोतांचा आहारात एकाच वेळी समाविष्ठ न करण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जातो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास प्रोटीनचा शाकाहारी स्त्रोत आणि प्रोटीनचा मांसाहारी स्त्रोत एकाच वेळी आहारात समाविष्ट करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते. दही प्राण्यांच्या दूधापासून बनते, तर मासेसुद्धा मांसाहारी प्रोटीनने संपन्न स्त्रोत आहे. हे दोन पदार्थ एकत्र खाण्यामुळे आपल्याला पोटाचे विकार होऊ शकतात.
दूध
दूध आणि दही हे दोन प्राण्यांचे प्रोटीन स्त्रोत आहेत. या दोन पदार्थांचे एकाच वेळी सेवन करू नये. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाण्यामुळे डायरीया, अॅसिडिटी आणि गॅसचा त्रास होऊ शकतो.
उडीद डाळ
उडदाची डाळ दह्यासोबत खाल्ल्यास आपल्याला दिर्घकाळ सोबतीला राहणारे विकार होऊ शकतात. या विकारात अॅसिडीटी, गॅस, सूज अशा त्रासांचा समावेश आहे. त्यामुळे दह्यासोबत उडीद डाळ खाणे टाळा.
तेलकट पदार्थ
आपण सर्वजण तूप लावलेले पराठे दह्याबरोबर खाण्यास पसंती देतो. वास्तविक, दह्यासह तेलकट पदार्थ खाणे आरोग्याला धोकादायक आहे. त्यामुळे आपली पचनशक्ती धीमी पडते. आपल्या शरीराला सतत सुस्ती येत राहते. ज्यावेळी तुम्ही एक ग्लास लस्सीसोबत छोले भटुरे खाता, त्यावेळी तुम्हाला झोप अनावर होते. (Do not eat these 6 foods with curd, otherwise it may cause indigestion)
तौक्ते’ चक्रीवादळामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाच्या वीजयंत्रणेची प्रचंड हानी : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत#CycloneRedAlert #CycloneTauktae #CycloneTauktaeLatestNews #nitinrauthttps://t.co/9VbE6yt2Ek
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2021
इतर बातम्या
92 वर्षांचा लढवय्या, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी कोरोनाला हरविले