सकाळी उपाशी पोटी चुकून सुद्धा खाऊ नका हे पदार्थ अन्यथा परिणाम होतील गंभीर!

अनेकदा आपण जे काही पदार्थ खातो त्याचा प्रत्येक वेळी शरीरावर चांगलाच परिणाम होतो असे नाही. अनेकदा आपण सकाळी सकाळी असे काही पदार्थ खातो जे खाल्ल्याने शरीराला गंभीर परिणाम भोगावे लागतात.

सकाळी उपाशी पोटी चुकून सुद्धा खाऊ नका हे पदार्थ अन्यथा परिणाम होतील गंभीर!
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 8:27 PM

मुंबईः अनेकदा लोक सकाळी उठल्यानंतर आपल्या दिवसाची सुरुवात चाय पिण्याने करत असतात. काहीजण चाय सोबत नाश्तामध्ये ब्रेड – बटर, पोहे, समोसा – कचोरी इत्यादी पदार्थ खात असतात. काही जण आपल्या आरोग्य संदर्भात अनेक चिंता व्यक्त करत असतात आणि म्हणूनच सकाळी उठल्यावर हलके फुलके पदार्थ खात असतात.या सर्व पदार्थांचा परिणाम आपल्या शरीरावर दिवसभर जाणवत असतो. आपल्या आजूबाजूला असे सुद्धा काही लोक आहेत जे सकाळी उठल्यावर उपाशीपोटी (empty stomach) अनेक पदार्थ खात असतात परंतु असे करणे आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी चांगले नाही, यामुळे आपल्याला अनेक समस्या भविष्यात भोगावे लागतील. अनेक गंभीर आजार सुद्धा आपल्याला होऊ शकतात.

अनेकांना आहाराबद्दल जागृकता नसल्याने सकाळी उठल्यावर आपल्याला नेमके कोणते पदार्थ खायला हवे व कोणते पदार्थ खाऊ नये याबद्दल माहिती करून घ्यायला हवे. अशा काही छोट्या छोट्या गोष्टी जर आपण दुर्लक्ष केल्या तर याच गोष्टी भविष्यात गंभीर आजारांना (dangerous disease) आमंत्रण देऊ शकतात.आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. या माहितीच्या आधारे आपल्याला सकाळी उठल्यावर नेमके कोण ते पदार्थ सेवन करू नये (food not eat in the morning) हे सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

बहुतेक वेळा उपाशी पोटी पदार्थ खाल्ल्याने आपल्याला अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतील. खरेतर उपाशी पोटी काही पदार्थ सेवन केल्याने आपल्या आतड्यांना नुकसान पोहोचते. सकाळी उठल्यानंतर कमीतकमी 2 तासानंतर नाश्ता करायला हवा.

मसालेदार पदार्थ

अनेक लोक सकाळी उठल्यावर नाश्ता मध्ये समोसा – कचोरी, भजी यासारखे मसालेदार पदार्थ सेवन करतात. सकाळी उठल्यावर नाश्ता मध्ये अशाप्रकारचा मसालेदार पदार्थांचा नाश्ता अजिबात करायला नाही पाहिजे, यामुळे पोटात जळजळ होऊ शकते.अनेकदा असे पदार्थ खाल्ल्याने ऍसिडिक रिएक्शन आणि ऍसिडिटी सारख्या समस्या त्रास देतात. उपाशीपोटी हे पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो.

दही

सकाळी उठल्यावर उपाशीपोटी दही खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. दही मध्ये भरपूर प्रमाणामध्ये लॅक्‍टिक ऍसिड असते. सकाळी उपाशीपोटी दही खाल्ल्याने आपल्या पोटातील आम्लाची पातळी बिघडते. सकाळी उपाशीपोटी दही खाल्ल्याने आपल्या पोटातील जे चांगले बॅक्टेरिया असतात ते मृत पावतात, यामुळे ॲसिडिटी वाढते.

फळांचा रस

आपल्यापैकी अनेक जण सकाळी उपाशीपोटी वेगवेगळ्या फळांचा रस पीत असतात. तसे पाहायला गेले तर फळांचा रस आपल्या शरीरासाठी चांगला असतो परंतु उपाशीपोटी आपल्याला रस प्यायचे नाही. तज्ञ मंडळींच्या मते,दिवसाची सुरुवात फळांच्या रसाने अजिबात करू नये. फळांचा रस सकाळी उपाशीपोटी प्यायल्याने शरीरातील अग्नि मंडलावर विपरीत परिणाम होतो, जे आपल्या शरीरासाठी चांगले नसते. उपाशीपोटी रस प्यायल्याने फळांमध्ये उपलब्ध असणारे फ्रुक्टोज आपल्या लिव्हरवर अतिरिक्त भार टाकू शकतात आणि यामुळे लिव्हरची समस्या होऊ शकते.

कच्चा भाज्या

सकाळी उपाशी पोटी कच्चा भाज्या चुकून सुद्धा खाऊ नये.अशा भाज्यांमध्ये फायबर उपलब्ध असते, जे उपाशीपोटी खाल्ल्याने आपल्या पोटावर त्यांचा भार होऊ शकतो. सकाळी उपाशी पोटी हे पदार्थ खाल्ल्याने तुमचे पोट फुगू शकते किंवा पोटामध्ये गॅस सुद्धा होऊ शकतो.

आंबट फळ

फळ आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात परंतु सकाळी उपाशीपोटी आंबट फळ खाल्ल्याने शरीरामध्ये ऍसिड वाढते. फळांमध्ये फायबर आणि फ्रुक्टोज असते. उपाशी पोटी फळे खाल्ल्याने आपली पचनसंस्था योग्य पद्धतीने कार्य करत नाही आणि परिणामी पचन संस्था ची गती धीमी होते, म्हणूनच अनेकदा सकाळी उपाशीपोटी पेरू संत्री मोसंबी यासारखे आंबट फळ अजिबात खाऊ नये.

कॉफी

सकाळी उपाशीपोटी कॉफी सुद्धा नाही प्यायला पाहिजे. उपाशीपोटी कॉफी प्यायल्याने आपल्या शरीरातील ॲसिडिटी वाढते त्याचबरोबर पचनसंस्थेमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड वाढल्याने पोटाची समस्या जोर धरते.

टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

संबंधित बातम्या

Oil | शरीरातील समस्या दूर करा फक्त तेलाच्या मदतीने! घरात असायलाच हवे असे तेलाचे 5 प्रकार

या रंगाची लघवी होते…मग सावधान, तुम्हाला हा आजार असण्याची शक्यता

काय तुमची मासिक पाळी अजून आली नाही…मग ही धोक्याची घंटा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.