AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी ‘हे’ 5 व्यायाम नक्की करा, होतील फायदे

आजकाल लोक वजनाच्या बाबतीत खूप सजग झाले आहेत. जर आपले वजन वाढत असेल तर ताबडतोब आपल्या आहारावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात करा.

Weight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी 'हे' 5 व्यायाम नक्की करा, होतील फायदे
व्यायाम
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 2:14 PM

मुंबई : आजकाल लोक वजनाच्या बाबतीत खूप सजग झाले आहेत. जर आपले वजन वाढत असेल तर ताबडतोब आपल्या आहारावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात करा. परंतु वजन कमी करण्यासाठी केवळ आहारावर अवलंबून राहणे योग्य नाही, आहारासह काही व्यायाम देखील करावे लागतील. जेणेकरून अतिरिक्त कॅलरी बर्न करता येतील. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही सहज कॅलरी बर्न करू शकता. (Do these 5 exercises to reduce obesity)

वजन वाढण्याचे कारण जाणून घ्या

व्यायाम करणे हे फक्त वजन कमी करण्यासाठी फायदेशीर नाही तर व्यायाम केल्याने आपले आरोग्य चांगले राहते. वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे पाचन तंत्र आहे. ज्याकडे लोक सहसा लक्ष देत नाहीत. कमकुवत पचनामुळे आपले शरीर अन्न पूर्णपणे पचवू शकत नाही, ज्यामुळे शरीरावर चरबी वाढते. म्हणूनच, जर तुम्हाला वजन नियंत्रित करायचा असेल तर संतुलित आहार आणि व्यायाम महत्वाचा आहे.

अशा प्रकारे पाचक प्रणाली चांगली होईल पाचक प्रणाली सुधारण्यासाठी उच्च फायबर आहार आवश्यक आहे. फायबरच्या मदतीने आपण जे अन्न खातो ते पचन योग्य प्रकारे होते. यासाठी फळे खा आणि हिरव्या भाज्या खा. याशिवाय ग्रीन टी प्या. सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाणी प्या. जेवणाची वेळ ठरवा आणि बाहेरील अन्न खाणे पूर्णपणे टाळाच.

हे व्यायाम करा

चाला : दररोज एक तास चालण्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते. चालणे हा एक असा व्यायाम आहे ज्यामध्ये आपल्याला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची गरज लागत नाही. चालताना मन शांत आणि मुड चांगला करण्यासाठी आपण गाणे देखील ऐकू शकतो.

खेळ : कुढल्याही प्रकारचा खेळ खेळल्याने आपल्या शरीराचा व्यायाम होतो. त्यामुळे आपण तंदुरुस्त राहू शकतो. परंतु सध्याच्या जीवनशैलीमध्ये आपल्याकडे खेळण्यासाठी वेळच राहिला नाही. मात्र, वेळ काढून आपण क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल सारख्या खेळ खेळले पाहिजेत. यामुळे तुमची मनःस्थिती चांगली राहते आणि तुम्ही तंदुरुस्त राहता.

पोहणे : जर आपल्याला पोहायला येत असेल तर आपण दररोज अर्धा तास तरी पोहले पाहिजे. पोहणे हा एक चांगला व्यायाम आहे. यामुळे तुमचे वजन वेगाने कमी होईल.

झुम्बा : आजकाल झुम्बाचा व्यायाम करण्यावर अधिक भर दिला जातो. झुम्बा केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. झुम्बा आपण कोणत्याही वेळला करू शकतो.

दोरीवरच्या उड्या : जर आपण घराबाहेर जाऊन व्यायाम करू शकत नसतोल तर आपण दोरीवरच्या उड्या मारून वजन कमी करू शकतो. दोरीवरच्या उड्यांमुळे वजन कमी होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Do these 5 exercises to reduce obesity)

कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लष्कराचं कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लष्कराचं कौतुक.
पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त, हीच ती 9 ठिकाणं जिथं...
पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त, हीच ती 9 ठिकाणं जिथं....