कुत्रे फिरवण्यासाठी तगडा पगार, वर्षाकाठी 29 लाखांची ऑफर, निवृत्तीनंतर पेन्शनही
नोकरीसाठी ज्याची निवड होईल, त्याला दिवसभर डेस्कजवळ थांबावे लागेल. कुत्र्याचा सांभाळ करणे हे त्याचे मुख्य काम असेल.
लंडन : दिवसभर कुत्र्यांचा सांभाळ, तगडा पगार आणि निवृत्तीनंतर पेन्शन. प्राणीमित्रांसाठी आदर्शवत असणारी अशी ही नोकरी लंडनमधील रहिवाशांसाठी चालून आली आहे. लंडनमधील ‘जोसेफ हेग अॅरॉनसन‘ या लॉ फर्मने कुत्र्यांना फिरवण्यासाठी प्रोफेशनल व्यक्तींना नोकरी ऑफर केली आहे. (Dream Job for Dog Lovers London law firm offers big salary and pension)
या नोकरीसाठी ज्याची निवड होईल, त्याला दिवसभर डेस्कजवळ थांबावे लागेल. कुत्र्याचा सांभाळ करणे हे त्याचे मुख्य काम असेल. यासाठी त्याला वर्षाकाठी 30 हजार पाऊण्ड (अंदाजे 28.95 लाख रुपये) पगार दिला जाईल. याबरोबरच निवृत्तीवेतन, जीवन विमा, खासगी वैद्यकीय आणि दंत विम्याचा लाभही मिळेल.
नोकरी मिळाल्यानंतर या व्यक्तीला सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काम करावे लागेल. बर्याच जणांनी हे काम आनंददायी असल्याचं म्हटलं आहे. ‘दैनिक जागरण’ वेबसाईटने यासंबंधी वृत्त दिले आहे.
लंडनमध्येही यापूर्वी अशा नोकरीच्या संधी चालून आल्या होत्या. एका वर्षापूर्वी लंडनमधील नाईट्सब्रिजमध्ये राहणाऱ्या जोडप्याने त्यांच्या दोन कुत्र्यांची काळजी घेण्यासाठी उमेदवाराची गरज असल्याची जाहिरात दिली होती. या जाहिरातीत त्यांनी केअर टेकरला लाखोंच्या पगाराची ऑफर दिली होती.
या दाम्पत्याला कामाच्या स्वरुपामुळे बहुतांश वेळ घराबाहेर रहावे लागत असे. म्हणूनच त्यांना आपल्या दोन गोल्डन रीट्रिव्हर कुत्र्यांची काळजी घेण्यासाठी एका व्यक्तीची आवश्यकता होती. या जोडप्याने त्यांच्या पाळीव कुत्र्यांचे ‘मिलो’ आणि ‘ऑस्कर’ असे नाव ठेवले होते. एका वर्षासाठी केअर टेकरला 40 हजार डॉलर्स (सुमारे 29 लाख रुपये) देण्यात येणार होते.
विश्वासू, मेहनती केअरटेकर हवा
या दाम्पत्याने उमेदवारामध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात, हे जाहिरातीमध्ये लिहिले होते. केअरटेकर विश्वासू असावा, मेहनती आणि कुत्र्यांना जीव लावणार हवा. तरच तो ऑस्कर आणि मिलो यांची काळजी काळजी घेईल. जाहिरातींमध्ये असेही लिहिले होते, की त्यांना कुत्र्यांची काळजी घेण्याचा अनुभव असावा आणि जर त्यांना स्वयंपाक कसा करावा हे माहित असेल तर सोन्याहून पिवळे. (Dream Job for Dog Lovers London law firm offers big salary and pension)
या जोडप्याने जाहिरातीमध्ये लिहिले होते की केअरटेकरला आठवड्यातून फक्त पाच दिवस कुत्र्यांची काळजी घ्यावी लागेल. परंतु गरज पडल्यास त्यांना एखाद्या शनिवार आणि रविवारीही यावे लागेल. केवळ या निकषात बसणाऱ्या व्यक्तीनेच नोकरीसाठी अर्ज करावा, असेही त्यात नमूद होते.
नेमके काम काय?
संध्याकाळी दोन्ही कुत्र्यांना फिरायला नेणे, त्यांच्या खाण्या-पिण्याच्या पदार्थांची खरेदी करणे, स्वच्छतेची काळजी घेणे तसेच व्यायाम करण्याची जबाबदारी केअरटेकरची असेल. कुत्र्यांना आंघोळ घालणे, त्यांचे कपडे धुणे, त्यांच्या नियमित तपासणीच्या वेळा लक्षात ठेवणे, ही जबाबदारीही संबंधित व्यक्तीची असेल.
VIDEO : Special Report | बसून खा, वर्षाला 40 लाख कमवा; बिस्कीटं चाखण्याच्या कामासाठी तगडा पगार pic.twitter.com/KLgZpaXVtR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 22, 2020
(Dream Job for Dog Lovers London law firm offers big salary and pension)