Glowing Skin: नितळ, चमकदार त्वचेसाठी सकाळी उठल्यावर ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स प्या
चमकदार आणि नितळ त्वचेसाठी विविध प्रकारचे स्किनकेअर प्रोडक्ट्स आणि ब्युटी प्रोडक्ट्स वापरण्यावर अनेकदा भर दिला जातो. मात्र सर्वांत महत्त्वाची गोष्टी तुम्ही यात विसरता, ते म्हणजे निरोगी आहार (Healthy Diet).
चमकदार आणि नितळ त्वचेसाठी विविध प्रकारचे स्किनकेअर प्रोडक्ट्स आणि ब्युटी प्रोडक्ट्स वापरण्यावर अनेकदा भर दिला जातो. मात्र सर्वांत महत्त्वाची गोष्टी तुम्ही यात विसरता, ते म्हणजे निरोगी आहार (Healthy Diet). जर तुम्ही दिवसरात्र स्कीनकेअर रुटीन (Skincare Routine) फॉलो करत असाल, पण तुमचा आहार योग्य नसेल तर तुमच्या त्वचेसाठी ते ठीक नाही. त्वचेला आतून पोषण मिळण्यासाठी निरोगी आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे. निरोगी आहार आणि पुरेसे पाणी पिणे केवळ तंदुरुस्त राहण्यासच मदत करत नाही तर तुमची त्वचा चमकदार बनवते. यासाठी तुम्ही काही हेल्दी ड्रिंक्स (Healthy Drinks) सकाळच्या वेळी पिऊ शकता.
सकाळी उठल्यावर पाणी प्या
सकाळी उठल्या उठल्या आधी भरपूर पाणी प्या. यामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सीन बाहेर पडण्यास मदत होईल. यावेळी तुम्ही थंड पाण्याऐवजी कोमट पाणी पिऊ शकता. तुमच्या त्वचेसाठी हे खूप फायदेशीर आहे. शरीरात ओलावा टिकवण्यासाठी आपण जास्तीत जास्त पाणी पिणे महत्वाचे आहे.
मध आणि लिंबू
सकाळी दोन ते तीन चमचे मध आणि लिंबूचा रस कोमट पाण्यात मिसळून पिऊ शकता. तुमच्या त्वचेसाठी याचा खूप फायदा होईल. मधात अँटी-एजिंग गुणधर्म असतात. मधाचं नियमित सेवन केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. तर लिंबात व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असतं.
फळ किंवा भाज्यांचा रस
फळांचा किंवा भाज्यांचा रस हा केवळ स्वास्थ्यासाठीच तर त्वचेसाठीही फायदेशीर असतो. त्यामध्ये अनेक पोषकतत्वे असतात. फायबर आणि व्हिटामिनयुक्त या रसांचा त्वचेवर चांगला परिणाम होतो.
हळदीचं दूध
हळदीचं दूध तुम्ही रोज पिऊ शकता. हळदीत अँटिबायोटिक गुणधर्म असतात. तुमच्या त्वचेला चमकदार बनवण्यासाठी त्याची मदत होईल.
हेही वाचा:
खरबूज हे फळ खूप चवदार आणि आरोग्यासाठीही फायदेशीर, आहारात नक्की समावेश करा!