बियरच्या सेवनाने खरंच चरबी वाढवते का? तथ्य जाणून घेतल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल!

बियर हे एक अल्कोहोलिक पेय आहे, जे आंबवलेल्या धान्यापासून बनवले जाते, ज्यामध्ये कार्बन डाय ऑक्साईड देखील टाकला जातो.

बियरच्या सेवनाने खरंच चरबी वाढवते का? तथ्य जाणून घेतल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल!
पोटावरची चरबी
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 11:45 AM

मुंबई : काही लोकांना बियर खूप आवडते. लोकांना इतर पेयांपेक्षा बियरचे सेवन जास्त आवडते. हे एक अल्कोहोलिक पेय आहे, जे आंबवलेल्या धान्यापासून बनवले जाते, ज्यामध्ये कार्बन डाय ऑक्साईड देखील टाकला जातो. लाईट ड्रिंकच्या शोधात असलेले लोक बर्‍याचदा बियरला प्राधान्य देतात. कारण, याच्या सेवनाने काहींना नशा चढत नाही. परंतु बर्‍याचदा असेही म्हणतात की, याचे सेवन केल्याने त्यांच्या शरीरात अतिरिक्त चरबी जमा होते (Drinking Beer can put excess fat on your body).

बियरचे बरेच प्रकार आहेत आणि प्रत्येक वेगळ्या बियरची बनवण्याची पद्धत देखील वेगवेगळी आहे. याच्या प्रत्येक प्रकाराला वेगवेगळा सुगंध आहे. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे, ते बियर किंवा कोणत्याही प्रकारचे मद्यपान करणे टाळतात. परंतु आपण आपल्या आरोग्यावर बियरच्या संभाव्य प्रभावांचा विचार केला आहे का? आपल्या प्रत्येकाला याबद्दल माहित असणे आवश्यक आहे.

बियर आणि वजन

ओटीपोटातील चरबी अर्थात लोअर बेली फॅटमुळे बरेच लोक अस्वस्थ असतात आणि बरेच लोक याबद्दल चर्चाही करतात. बरेच लोक म्हणतात की, जुन्या बियरच्या सेवनाने पोटाभोवती चरबी जमा होते, ज्यामुळे लठ्ठपणा येतो. यामुळे आपल्या निरोगी वजनात वाढ होऊ शकते, जी तुमच्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. पबमेड सेंट्रलमध्ये प्रकाशित केलेल्या समिक्षेनुसार, बियर पिणे हे वजन वाढवण्याशी संबंधित असू शकते.

आपल्या आरोग्यावर होतात अल्कोहोलचे दुष्परिणाम!

यामुळे मनुष्यांमध्ये मेंदूच्या काही कार्यांचे तात्पुरते नुकसान होऊ शकते. अल्कोहोलमध्ये उच्च प्रमाणात साखर आणि कॅलरी असू शकतात, ज्यामुळे निरोगी वजन वाढण्याची शक्यता वाढते. अल्कोहोलच्या सेवनाचा सामान्य परिणाम डिहायड्रेशनच्या रूपात समोर येतो. पाणी आपले शरीर कार्यरत ठेवते, परंतु तीव्र डिहायड्रेशन शरीरास खूप हानी होऊ शकते. मद्यपान केल्याने तुमच्या शरीरात साखरेची पातळी वाढू शकते. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना त्रास होऊ शकतो (Drinking Beer can put excess fat on your body).

बियर प्यायल्यानंतर वजन कमी करण्यासाठी टिप्स :

– नेहमीच माफक प्यावे, शक्य असल्यास पूर्णपणे टाळावे. कारण जास्त प्रमाणात किंवा अनियंत्रित पद्धतीने मद्यपान केल्याने तुमचे वजन वाढू शकते.

– बियरऐवजी अधिक निरोगी पेयांचे पर्याय शोधा, ज्यात अल्कोहोल आणि साखर कमी आहे.

– आपल्या आहारात संतुलित पदार्थांचा समावेश करून, फायबर समृद्ध अन्न सेवन करा. असे केल्याने आपले चयापचय सुधारते, जे आपले वजन कमी करण्यास देखील उपयुक्त ठरते.

काळजी घ्या :

शारीरिकदृष्ट्या स्वत:ला सक्रिय ठेवा आणि सतत व्यायामाला प्राधान्य द्या. आपण इच्छित असल्यास, हलके किंवा कठीण व्यायाम देखील करू शकता, जेणेकरून आपले वजन नियंत्रित होईल. जर आपण मद्यपान करण्याच्या सवयीवर मात करू शकत नसाल, तर कमीतकमी त्याच्या अनियंत्रित सेवनापासून दूर रहाण्याचा प्रयत्न करा.

(टीप : सदर माहिती केवळ सामान्य माहिती असून, यातून मद्यपानास उत्तेजना देण्याचा कोणताही उद्देश नाही.)

(Drinking Beer can put excess fat on your body)

हेही वाचा :

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.