कोरोना काळात सरबत, ताक, सूप पिण्यावर भर द्या; वाचा का?
सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे. त्यामध्येही देशामध्ये कोरोनाने सर्वत्र कहर केला आहे.

मुंबई : सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे. त्यामध्येही देशामध्ये कोरोनाने सर्वत्र कहर केला आहे. यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. या काळात आपण काय खातो काय पितो हे अतिशय महत्वाचे झाले आहे. सध्याच्या काळात आपण शरबत, ताक आणि सूप पिण्यावर जास्त भर दिला पाहिजे. उन्हाळ्यात ताक पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. (Drinking Juice, buttermilk and soup is beneficial for health)
ताक पिल्याने आपली त्वचा देखील चांगली राहते. ताकात लॅक्टिक अॅसिड आढळतं. जे चेहऱ्यावर येणारे डाग-धब्बे हटवण्यासाठी फायदेशीर ठरु शकतं. ताक पिल्ल्याने आपले शरीर थंड देखील राहते. ताकात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, लोह, फॉस्फोरस, इत्यादी खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात कमीत-कमी एक ग्लास तरी ताक पिले पाहिजे.
सध्या परिस्थितीमध्ये आपण आंबा, काकडी स्पेशल ज्यूस पिला पाहिजे. यासाठी आपल्याला 4-5 काकडी रस, 8 – 10 आंब्याचा रस, 1 चमचा हळद, 1/2 टीस्पून वेलची, 1 चमचे मध, 1.5 ताजे लिंबाचा रस, 1 आले आल आणि बर्फ लागणार आहे. काकडीचा रस एका मोठ्या भांड्यात काढून घ्या. त्यामध्ये आता लिंबाचा काढलेला रस घाला हे दोन्ही रस चांगले मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये हळद आणि वेलची मिक्स करा. सर्वात शेवटी आले आणि मध आला. यानंतर त्यामध्ये थंड पाणी आणि बर्फाचे तुकडे मिक्स करा. थंड सर्व्ह करावे.
सध्याच्या कोरोना काळात तर आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक झाले आहे. यासाठी आपण आहारात दररोज टोमॅटोचा सूप घेतला पाहिजे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. टोमॅटोची गणना नेहमीच स्वादिष्ट भाज्यांमध्ये केली जाते. टोमॅटो स्वादिष्ट असण्याबरोबरच आपल्याला शरीराला निरोगी ठेवण्यास देखील उपयुक्त आहे. टोमॅटोमध्ये व्हिटामिन ए, बी, सी आणि सोडियम, सल्फर, जस्त, पोटॅशियम यासारखी खनिज घटक देखील आढळतात असतात.
टोमॅटो सूपमध्ये हलके तळलेले ब्राऊन ब्रेडचे तुकदे टाकून, तुम्ही सूपची चव आणखी वाढवू शकता. टोमॅटोमध्ये कर्बोदकाचे प्रमाण अत्यंत कमी असते. यामुळे हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह या विकारांमध्ये टोमॅटो गुणकारी आहे. यामुळे दररोज टोमॅटो खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणही आढळतात, जे कॅन्सर आणि हृदयरोगासारख्या गंभीर रोगांपासून बचाव करण्यासाठी सहायक असतात. टोमॅटोमधील लाल रंग हा त्यातील लाइकोपीनमुळे प्राप्त होतो, जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.
संबंधित बातम्या :
Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…
Immunity Booster | थंडीच्या दिवसांत आवळ्याचा रस आरोग्यवर्धक, इम्युनिटी वाढवण्यासाठी ‘हे’ नक्की ट्राय करा!https://t.co/XPmKiIDsHE#ImmunityBooster #AmlaJuice
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2020
(Drinking Juice, buttermilk and soup is beneficial for health)