दुपारच्या जेवणानंतर एक चमचा तुपात गूळ मिसळून खा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा !

रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीरास रोगांविरूद्ध लढायला मदत करते. हे शरीरातून रोगजनक आणि जीवाणू काढून टाकण्याचे काम करते.

दुपारच्या जेवणानंतर एक चमचा तुपात गूळ मिसळून खा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा !
गुळ आणि तूप
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 9:54 AM

मुंबई : रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीरास रोगांविरूद्ध लढायला मदत करते. हे शरीरातून रोगजनक आणि जीवाणू काढून टाकण्याचे काम करते. इतकेच नाही तर रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर फक्त कोरोनाच नाहीतर इतरही आजारांपासून आपण दूर राहू शकतो. रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी, निरोगी खाण्याबरोबरच निरोगी जीवनशैली देखील महत्वाची आहे. (Eat jaggery and ghee and boost the immune system)

अनेकांनी कोरोना काळात आपल्या जीवनशैलीमध्ये अनेक बदल केले आहेत. त्यामध्ये हेल्दी व्यायाम असो किंवा आहारात केलेले बदल असो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे दुपारच्या जेवणानंतर रोज गुळ आणि एक चमचे तूप मिसळून खा. या दोन गोष्टी एकत्र खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते. गुळामध्ये बरेच अँटी-ऑक्सिडेंट असतात. या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

गुळात व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-बी, सुक्रोज, ग्लूकोज, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, मॅग्नेशियम या सारखे घटक आढळतात. विशेषतः गुळात फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते. गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. जे आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करतात. हे घटक शरीराला आतून स्वच्छ ठेवून त्वचेला चमकदार बनवतात. विशेष म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुळ अत्यंत फायदेशीर आहे.

तूप डोकोसॅक्सिनोइक अॅसिडचा चांगला स्रोत आहे. डोकोसॅक्सिनोइक अॅसिड सर्वात लोकप्रिय ओमेगा-3 फॅटी अॅसिड आहे. ओमेगा 3 फॅटी अॅसिड ही आवश्यक चरबी आहेत, ज्याचे आपण आपल्या आहारात सेवन करणे आवश्यक आहे. हे अॅसिड आपले शरीर स्वतःहून तयार करू शकत नाही. डोकोसॅक्सिनोइक अॅसिडचा खास करून कर्करोग, हृदयविकाराचा झटका, मधुमेह, सांधेदुखीसारख्या समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

संबंधित बातम्या : 

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

(Eat jaggery and ghee and boost the immune system)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.