AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ पदार्थांच्या सेवनाने सौंदर्याला मिळेल झळाळी, वाचा या पारंपारिक सवयींविषयी..

उन्हाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेची विशेथ काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. या काळात अनेकांना त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते.

'या' पदार्थांच्या सेवनाने सौंदर्याला मिळेल झळाळी, वाचा या पारंपारिक सवयींविषयी..
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 12:19 PM

मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. या काळात अनेकांना त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. या काळात त्वचा कोरडी पडते, भेगा पडतात, त्वचा काळवट होणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. यासाठी लोक अनेक प्रकारच्या क्रिम वापरतात किंवा अनेक उपायही करतात. मात्र, त्याचा काही फायदा होत नाही. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात नेमकी त्वचेची काळजी कशी घ्यावी हे सांगणार आहोत. (Eat these foods in summer for healthy and glowing skin)

-गुळात व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-बी, सुक्रोज, ग्लूकोज, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, मॅग्नेशियम या सारखे घटक आढळतात. विशेषतः गुळात फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते. गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. जे आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करतात. हे घटक शरीराला आतून स्वच्छ ठेवून त्वचेला चमकदार बनवतात.

-तूप आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. तूप खाल्ल्याने आपली त्वचा तजेलदार होते. यामुळे उन्हाळ्यात तूप खाणे आपल्या त्वचेसाठी फायदेशार आहे. तूप बहुधा गायीच्या दुधाचा वापर करून बनवला जाते. फॉस्फोलाइपिड घटकाच्या उपस्थितीमुळे घरगुती बनवलेले तूप बर्‍याच काळासाठी टिकून राहते, तर व्यावसायिकरित्या तयार केलेल्या तूपात ते उपलब्ध नसते.

-उन्हाळ्यात, आपल्या चेहऱ्यामधून मोठ्या प्रमाणात तेल बाहेर निघते आणि ते त्वचेच्या आत पुनःपुन्हा तयार होत राहते. आपल्याला आपला चेहरा स्वच्छ करण्याची फारशी संधी मिळत नाही. परंतु, अशावेळी आपण चेहरा स्वच्छ पुसून घेतल्यास आपल्या चेहऱ्यावरचे अतिरिक्त तेल आणि चिकटपणा दूर होण्यास मदत होते

-कोणत्याही मास्कमधील क्ले त्वचेच्या पोर्समधून सर्व घाण आणि अतिरिक्त तेल शोषण्यास मदत करते. हे मास्क आपल्या तेलकट त्वचेच्या अति-चमकण्याच्या समस्या देखील कमी करू शकतात. यासाठी निळा लगूनचा सिल्ट मड मास्क वापरा. आपण आठवड्यातून एकदा याचा वापर करू शकता. हे पॅक लावल्यानंतर चेहरा मॉइश्चरायझर करणे विसरू नका.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

तुम्हीसुद्धा सकाळी नाश्त्यामध्ये ‘पोहे’ खाता का? मग जाणून घ्या आरोग्यावर काय होतो परिणाम!

Good fat vs Bad fat : फॅटयुक्त पदार्थ खाणे टाळताय, फायद्यांपेक्षा तोटे जास्त!

(Eat these foods in summer for healthy and glowing skin)

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.