Health Tips :  हाडे नेहमी मजबूत ठेवायचीत? मग, आहारात नक्की सामील करा ‘हे’ 5 सुपरफूड्स

हाडांच्या निर्मितीसाठी कोणत्याही व्यक्तीचे वय खूप महत्वाचे मानले जाते. आपण 30 वर्षांचे झाल्यावर आपली हाडे जवळजवळ पूर्ण विकसित झाली असतात. जर, हाडे मजबूत नसतील तर, हाडे नाजूक आणि कमकुवत होऊ शकतात.

Health Tips :  हाडे नेहमी मजबूत ठेवायचीत? मग, आहारात नक्की सामील करा ‘हे’ 5 सुपरफूड्स
हाडांसाठी सुपरफूड्स
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 7:00 AM

मुंबई : हाडांच्या निर्मितीसाठी कोणत्याही व्यक्तीचे वय खूप महत्वाचे मानले जाते. आपण 30 वर्षांचे झाल्यावर आपली हाडे जवळजवळ पूर्ण विकसित झाली असतात. जर, हाडे मजबूत नसतील तर, हाडे नाजूक आणि कमकुवत होऊ शकतात. आज आपण अशा 5 सुपरफूड्सबद्दल जाणून घेणार आहोत, जे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. हे सुपरफूड्स पौष्टिक आणि खनिज घटकांनी परिपूर्ण आहेत, जे आपली हाडे निरोगी ठेवण्यास मदत करतात (Eat this Super foods for strong bones).

दही

दही हाडे मजबूत करतात. यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो. ऑस्टियोपोरोसिस हा एक आजार आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची हाडे कमकुवत आणि नाजूक होतात. हा रोग बहुधा वृद्ध लोकांमध्ये दिसून येतो. काही अभ्यासांनी असे सिद्ध केले आहे की, दह्याचे सेवन मजबूत हाडे तयार करण्यात मदत करते. तसेच, ऑस्टिओपोरोसिसपासून आपला बचाव करते. त्याच वेळी, या अभ्यासानुसार असेही म्हटले आहे की, ज्या स्त्रिया नियमितपणे दही खातात, त्यांची हाडे मजबूत राहतात आणि हाडांमध्ये कॉर्टिकल नुकसान कमी होते.

पनीर

पनीरमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. हे निरोगी हाडे टिकवून ठेवण्यास मदत करते. याचे सेवन केल्याने हाडे लवकर कमकुवत आणि नाजूक होत नाहीत. मात्र, पनीर नेहमी योग्य प्रमाणातच सेवन करावे. यामध्ये सोडियम आणि चरबी देखील जास्त असते. त्याचा आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. जर आपण फॅट-फ्री कॉटेज चीज अर्थात पनीर घेत असाल, तर लक्षात ठेवा की त्यात व्हिटामिन डी सारख्या व्हिटामिनचे प्रमाण जास्त आहे (Eat this Super foods for strong bones).

नट्स आणि बिया

कॅल्शियम व्यतिरिक्त, नट्समध्ये प्रथिने, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम देखील असतात. जे हाडे मजबूत करण्यात मदत करतात. अक्रोड, शेंगदाणे, बदाम आणि पीकन्स सारखे नट्स आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. बियाण्यांबद्दल बोलायचे तर, आपण आळशी, सब्जा आणि भोपळ्याच्या बिया खाऊ शकता. यात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखे पोषक घटक असतात. जे तुमची हाडे निरोगी बनवण्यात मदत करतात.

हिरव्या भाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम तसेच, जीवनसत्त्वांचे प्रमाण अधिक असते, जे आपल्या हाडांसाठी खूप फायदेशीर असते. आपण दररोज देखील त्याचे सेवन करू शकता. एक कप शिजवलेल्या पालकाचे सेवन केल्यास कॅल्शियमची कमतरता भरून निघते.

मासे

व्हिटामिन डीसाठी सूर्य किरण हा उत्तम स्त्रोत मानला जातो. तथापि, माशाच्या सेवनातून देखील व्हिटामिन डी मिळवता येतो. व्हिटामिन डी काही प्रकारच्या माशांमध्ये आढळते. जसे की, सॅमन, ट्यूना आणि रेनबो ट्राउट या माशांमध्ये व्हिटामिन डी आढळते. त्याच वेळी, सारडिन फिशमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी देखील भरपूर प्रमाणात असते. हाडांसाठी हे घटक महत्वाचे आहेत.

(टीप : सेवनापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Eat this Super foods for strong bones)

हेही वाचा :

Health Tips | मासिक पाळीच्या वेदनेत आराम मिळवून देतील ‘हे’ पदार्थ! अशा प्रकारे करा सेवन

रोगप्रतिकारशक्तीपासून ते मुळव्याधावर रामबाण उपाय म्हणजे जांभूळ, वाचा याचे अनेक फायदे

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.