AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

benefits of soaked dates: दमा ते अशक्तपणा ! थंडीत उपाशीपोटी खजूर खाण्याचे फायदे

benefits of dates: तुम्ही दररोज जर उठल्यानंतर उपाशी पोटी खजूर खाल्ले तर आरोग्यासाठी याचे मोठे फायदे होतात. खजूर हे अनेक आजारांपासून तुम्हाला दूर ठेवतात. सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने तुम्हाला कोणते फायदे होतील ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

benefits of soaked dates: दमा ते अशक्तपणा ! थंडीत उपाशीपोटी खजूर खाण्याचे फायदे
Soaked dates
Follow us
| Updated on: Dec 26, 2023 | 5:49 PM

benefits of soaked dates : सकाळी जे काही आपण खातो ते शरीराला लागतं. त्यामुळे सकाळी अनेक ड्रायफ्रुट ही उपाशी पोटी खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच सकाळी खजुराचे सेवन केले तर त्याचे आरोग्यासाठी दुप्पट फायदे होतात. खजुरमध्ये अनेक पोषक घटक असतात. खजुरमध्ये फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी6 आणि आयर्न असतात. जे आपल्या शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. खजूर हे पोषक तत्वांचा खजिना मानला जातो. एका खजूरमध्ये 23 कॅलरीज असतात. ज्यामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज भरपूर प्रमाणात असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. त्यामुळे सकाळी दररोज रिकाम्या पोटी खजूर खाल्ले तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.

सकाळी खजूर खाण्याचे फायदे

थंडीपासून होईल बचाव

हिवाळ्यात जर तुम्ही दररोज रिकाम्या पोटी खजूर खाल्ले तर तुम्हाला याचा मोठा फायदा होऊ शकतो. दररोज उठल्यावर २-३ भिजवलेले खजूर खाऊ शकता.

दम्यापासून मिळेल आराम

हिवाळ्यात हवामान बदलले की, अनेकांना दम्याचा त्रास होतो. त्यामुळे जर तुम्हाला पण दम्याचा त्रास होत असेल तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले खजूर खाऊ शकता.

हे सुद्धा वाचा

ऊर्जा मिळते

खजूरमध्ये ग्लुकोज, फ्रक्टोज आणि सुक्रोज आढळतात ज्यामुळे तुम्हाला लगेच उर्जा मिळते. सकाळी रिकाम्या पोटी खजूर खात असाल तर तुम्हाला फ्रेश वाटते.

हाडे मजबूत होतात

खजूरमध्ये असलेले तांबे, सेलेनियम आणि मॅग्नेशियम तुमची हाडे मजबूत करतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन के रक्त घट्ट होण्यापासून थांबवतात. कमकुवत हाडे असलेल्या लोकांनी हिवाळ्यात याचे सेवन करावे.

बद्धकोष्ठतेपासून आराम

तुम्हाला जर अपचन किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर तुम्ही सकाळी खजूर खाल्ले पाहिजे. खजूरमध्ये फायबर आढळते. जे पचनासाठी मदत करते. रोज रात्री खजूर पाण्यात भिजवून ठेवावे आणि सकाळी उठल्यावर खावेत.

एका दिवसात किती खजूर खाऊ शकता?

अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असलेले खजूर  दररोज फक्त 3 ते 4 खाऊ शकता. खजूरमध्ये असलेले पोषक तत्व तुम्हाला लगेचच फायदा देतील.

पाकिस्तानच्या विरोधात पाऊल उचला, आम्ही..; बलुचिस्तानची मोठी घोषणा
पाकिस्तानच्या विरोधात पाऊल उचला, आम्ही..; बलुचिस्तानची मोठी घोषणा.
वादळी वाऱ्यासह अवकाळीच्या सरी बरसणार, मुंबईसह राज्यात सतर्कतेचा इशारा
वादळी वाऱ्यासह अवकाळीच्या सरी बरसणार, मुंबईसह राज्यात सतर्कतेचा इशारा.
दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक; त्रालमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा
दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक; त्रालमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा.
गुडघे टेकून फोन केला म्हणून युद्धविराम - मुख्यमंत्री फडणवीस
गुडघे टेकून फोन केला म्हणून युद्धविराम - मुख्यमंत्री फडणवीस.
बलुच आर्मीकडून पाकिस्तानी लष्करावर पुन्हा हल्ला, 14 सैनिकांना केलं ठार
बलुच आर्मीकडून पाकिस्तानी लष्करावर पुन्हा हल्ला, 14 सैनिकांना केलं ठार.
एकाचवेळी 13 ठिकाणी ईडीचे छापे; नालासोपारात खळबळ
एकाचवेळी 13 ठिकाणी ईडीचे छापे; नालासोपारात खळबळ.
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....