Nilgiri Oil | नीलगिरीच्या तेलाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या कशा प्रकारे वापर कराल…

नीलगिरीच्या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. हे एक चांगले अँटी-सेप्टिक म्हणून देखील काम करते. त्याच्या वापरामुळे अनेक प्रकारच्या अडचणी दूर होतात.

Nilgiri Oil | नीलगिरीच्या तेलाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या कशा प्रकारे वापर कराल...
नीलगिरीचे तेल
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 2:21 PM

मुंबई : आयुर्वेदात अशा अनेक प्रकारच्या तेलांबद्द्ल सांगितले आहे, ज्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांमध्ये आराम मिळतो. यातील एक म्हणजे यूकेलिप्टस अर्थात नीलगिरीचे तेल. नीलगिरीच्या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. हे एक चांगले अँटी-सेप्टिक म्हणून देखील काम करते. त्याच्या वापरामुळे अनेक प्रकारच्या अडचणी दूर होतात. चला तर, जाणून घेऊया नीलगिरीच्या तेलाचे फायदे…(Eucalyptus aka nilgiri oil amazing benefits)

नीलगिरी तेलाचे महत्त्वपूर्ण फायदे :

– नीलगिरीचे तेल सायनस, सर्दी, फ्लू, घसा खवखवणे, दम्याचा त्रास आणि व्हायरल इन्फेक्शनमुळे होणाऱ्या समस्यांमध्ये आराम देते. अशा समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी, गरम पाण्यात त्याचे काही थेंब टाकून वाफ घ्यावी.

– अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे हे तेल त्वचेचे संक्रमण कमी करण्यास देखील मदत करते. यामुळे त्वचा मऊ आणि डाग मुक्त होते. हे तेल ज्या ठिकाणी संक्रमण होते तेथेच थेट लावले जाऊ शकते. पण, तेल लावताना त्वचा जास्त घासू नका.

– जर नीलगिरीचे तेल छातीवर लावले, तर ते जडपणाची समस्या दूर करते. यामुळे शरीराला ऑक्सिजन अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकेल. त्याच्या अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे ते फुफ्फुसातील जळजळ आणि संसर्ग दूर करण्यासाठी देखील मदत करते (Eucalyptus aka nilgiri oil amazing benefits).

– डोकेदुखी, थकवा किंवा तणाव झाल्यास त्या तेलाचे दोन थेंब कपाळावर लावा आणि हलक्या हातांनी पसरवा. यानंतर, काही काळ झोपा. भरपूर विश्रांती घ्या. अरोमा थेरपीमध्ये देखील हे तेल वापरले जाते.

– हे तेल अँटी-बॅक्टेरियल असल्याने, ते दात आणि हिरड्या यामधील संक्रमण काढून टाकते. सर्व टूथपेस्ट आणि माऊथवॉशमध्ये नीलगिरी तेल वापरले जाते.

– या तेलाला ‘फिवर ऑईल’ असेही म्हणतात. ताप येत असेल तर हाता-पायांचे तळवे आणि कपाळावर नीलगिरीचे तेल व्यवस्थित लावावे आणि चादरीने शरीर झाकून घ्यावे. थोड्याच वेळात, आपल्याला घाम येणे सुरू होईल आणि ताप कमी होईल.

– स्नायू, संधिवात किंवा सांध्यामध्ये वेदना असल्यास, निलगिरीचे तेल लावल्याने वेदनांपासून आराम मिळतो. तसेच, सूज देखील कमी होते.

लक्षात ठेवा

नीलगिरीचे तेल कधीही अन्न म्हणून वापरले जात नाही. जर, आपल्याला कोणत्याही समस्येमध्ये ते सेवन करायचे असेल, तर आपण पाण्यात दोन थेंब मिसळून घेऊ शकता. याबद्दल एखाद्या तज्ज्ञाशी सल्लामसलत करणे चांगले.

(टीप : कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Eucalyptus aka nilgiri oil amazing benefits)

हेही वाचा :

Raisins | दररोज प्या मनुक्याचे पाणी, शरीराला होतील ‘हे’ जबरदस्त फायदे!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.