लक्षद्वीपमध्ये घेऊ शकता या 5 साहसी उपक्रमांचा रोमांचक अनुभव
लक्षद्वीपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच भेट दिली होती. लक्षद्वीपमध्ये अनेक रोमांचक गोष्टींचा थरार अनुभवता येणार आहे. आम्ही तुम्हाला अशाच काही साहसी उपक्रमांबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्हाला रोमांचक वाटतील. याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी तुम्ही नक्कीच लक्षद्वीपला भेट देऊ शकता.
lakshadweep adventure : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारताचा केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप चांगलाच चर्चेत आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे स्नॉर्कलिंगचा आनंद घेतला. साहसी गोष्टींशिवाय पिकनिकची मजाच नसते. लक्षद्वीपवर जर तुम्ही जाण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाया या बेटाच्या निसर्गसौंदर्यासोबत साहस दाखवण्याच्या कोणत्या गोष्टींचा आनंद घेता येईल हे देखील सांगणार आहोत. पीएम मोदींनी येथील सुंदर समुद्रकिनारे एक्सप्लोर केले. त्यांनी लोकांना येथे येण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतर लक्षद्वीपबाबत गुगलवर सर्च देखील वाढले. सोशल मीडियावर त्यांनी साहसप्रेमींना एक सल्लाही दिला, ज्यामध्ये ते म्हणाले की, “लक्षद्वीप नक्कीच साहसी गोष्टी आवडणाऱ्यांच्या यादीत असले पाहिजे.” ते साहसी उपक्रम काय आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
स्नॉर्कलिंग
ज्या लोकांना समुद्रातील सौंदर्य पाहण्याची आवड आहे त्यांनी हे नक्की केले पाहिजे. तुम्ही तंदुरुस्त आहात आणि तुम्हाला कोणतीही वैद्यकीय समस्या नाही तर तुम्ही सागरी जीवसृष्टीचे दृश्य अनुभव करु शकता. अनेक पर्यटकांना ते नक्कीच आवडेल. याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही नक्कीच बजेट ठेवले पाहिजे.
स्कुबा डायव्हिंग
लक्षद्वीपमध्ये तुम्ही स्कूबा डायव्हिंगचा देखील आनंद घेऊ शकता. हा एक रोमांचक अनुभव असतो. यामध्ये तुम्हाला समुद्राखाली लपलेले सुंदर जग अगदी जवळून पाहता येते.
कयाकिंग
हे असे जल साहस आहे ज्यात नवशिक्याही सहभागी होऊ शकतात. इथल्या स्वच्छ पाण्यात कयाकिंगचा अनुभव खूप रंजक असेल.
मासेमारी
अनेकांना मासेमारी करण्याची देखील आवड असते. त्यामुळे तुम्ही लक्षद्वीपला येऊन मासेमारी करण्याचा आनंद घेऊ शकता.
पॅरासेलिंग
हे देशात अनेक ठिकाणी केले जात असले तरी तुम्ही लक्षद्वीपमध्ये याचा वेगळाच अनुभव घेऊ शकता. तुम्ही जेट बोट आणि वाफेच्या माध्यमातून समुद्रातील स्कीइंगचा थरारक अनुभव घेऊ शकता. स्वच्छ पाण्यामुळे, हा उपक्रम येथे अनेक ठिकाणी केला जातो, ज्यामध्ये तुम्हाला समुद्रकिनारा आणि आसपासच्या परिसराची सुंदर दृश्ये पाहण्याची संधी मिळेल.