Hair Care Tips| केसांच्या आरोग्यासाठी मेथीचे दाणे लाभदायी, जाणून घ्या काही खास टिप्स

Hair Care Tips| केसांच्या आरोग्यासाठी मेथीचे दाणे लाभदायी, जाणून घ्या काही खास टिप्स (Fenugreek seeds are beneficial for hair health, know some tips)

Hair Care Tips| केसांच्या आरोग्यासाठी मेथीचे दाणे लाभदायी, जाणून घ्या काही खास टिप्स
केसांच्या आरोग्यासाठी मेथीचे दाणे लाभदायी
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 12:23 PM

मुंबई : केस गळणे, केसांची वाढ कमी होणे आणि डोक्यातील कोंडा सारख्या समस्या बर्‍याच लोकांना त्रास देतात. केसांच्या समस्येवर मात करता येत नाही, असे नाही. आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या केसांसाठी चमत्कार ठरतात. यापैकी एक आहे मेथी. मेथीचे दाणे केस गळतीपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर आहेत. मेथीच्या तेलामुळे केसांची वाढ होतेच, त्याचबरोबर पातळ केस जाड होतात. केसांच्या समस्येवर मेथीचे दाणे घरगुती उपचार मानले जातात. मेथीचे दाणे केस आणि स्कल्पचे आरोग्य सुधारते. आपल्या केसांची निगा राखण्यासाठी मेथी उत्तम पर्याय आहे. अनेकांना प्रश्न पडतो की केसांची वाढ कशी करायची ? किंवा केसांच्या वाढीसाठी कोणते केस वापरायचे? नैसर्गिकरित्या लांब केस मिळविण्यासाठी तुम्ही मेथीच्या तेलाचा वापर करु शकता. घरच्या घरी तुम्ही मेथीचे तेल बनवू शकता. (Fenugreek seeds are beneficial for hair health, know some tips)

केसांची वाढ होण्यास मदत

मेथीचे दाणे लोह आणि प्रथिने यांचे समृद्ध स्रोत आहेत. हे दोन पोषक तत्व केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहेत. त्यामध्ये प्लाव संयुगाची एक अद्वितीय रचना आहे, ज्यात फ्लेवोनोइड्स आणि सैपोनिन्सचा समावेश आहे. या संयुगाला त्यांच्या अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीफंगल प्रभावांमुळे केसांच्या वाढीस प्रभावशाली असल्याचे मानले जाते.

हेल्दी स्कल्पसाठी लाभदायक

मेथीचा वापर कोरडी, चिडचिडी त्वचा, डोक्यातील कोंड्यावर उपचार करण्यासाठी फार पूर्वीपासून केला जातो. स्कल्पला सुटलेली खाजही केसांच्या गळतीस कारणीभूत ठरते. डोक्यातील कोंड्याची अनेक कारणे आहेत. यात तेल, फंगल इन्फेक्शन, जळजळ आणि कोरडी त्वचा यांचा समावेश आहे.

दाट केसांसाठी मेथीचे तेल उपयुक्त

केसांच्या आरोग्य राखण्यासाठी योग्य पोषण आवश्यक आहे. पोषक तत्वांची कमतरता केस गळतीस कारणीभूत होऊ शकते. प्रथिने, आवश्यक चरबी, जस्त आणि लोह हे अशी काही पौष्टिक तत्त्वे आहेत जी केसांच्या वाढीमध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतात आणि दाट केसांसाठी उपयुक्त आहेत. मिक्सरमध्ये दोन चमचे मेथीची दाणे घेऊन बारीक करून घ्या. ही पावडर एका भांड्यात घ्या आणि त्यात एक चमचा नारळाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑईल घाला. सर्व सामग्री एकत्र मिक्स करा आणि ही पेस्ट केसांना लावा.

मेथीचे तेल बनविण्याची प्रक्रिया

कढईत मेथीचे दाणे हलके भाजून घ्या. भाजल्यानंतर हे दाणे मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. त्यानंतर ही पावजर नारळाच्या तेलात टाका आणि काही तास पावडर तेलात भिजू द्या. तेलात मेथीचा रंग आल्यानंतर हे तेल गाळणीने गाळून घ्या. त्यानंतर तेल घट्ट झाकणाच्या बाटलीत ओतून ठेवा. (Fenugreek seeds are beneficial for hair health, know some tips)

बँकेत मुलींसाठी अकाऊंट उघडा, रोज 35 रुपये टाका, मिळवा पाच लाख रुपये

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीला 12 दिवसांनंतर ब्रेक; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.