Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Walking Rules : वॉकचे नियम फॉलो करा अन्यथा होणार नाही फायदा, जाणून घ्या चालण्याची योग्य पद्धत

प्रत्येकाची स्वतःची चालण्याची विशिष्ट पद्धत आहे, परंतु निरोगी चालण्यासाठी काही नियम माहित असणे आवश्यक आहे. अन्यथा बर्‍याच समस्या उद्भवू शकतात. (Follow the rules of the walk otherwise there will be no benefit, know the right way to walk)

Walking Rules : वॉकचे नियम फॉलो करा अन्यथा होणार नाही फायदा, जाणून घ्या चालण्याची योग्य पद्धत
चालणे आरोग्यासाठी फायदेशीर
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 8:48 AM

मुंबई : चालणे हा शरीराचा उत्तम व्यायाम आहे. जो अधिक चालतो, तो तंदुरुस्त राहतो, असे म्हणतात. चालण्याचे शरिर निरोगी ठेवण्याच्या दृष्टीकोनातून बरेच फायदे आहेत. रोज काही पावले चालल्यास वजन नियंत्रणात राहते, तसेच आपला मूडही प्रसन्न राहतो. कोणतीही गोष्ट आपण अधिक उत्साहाने करू शकतो. तशा प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्या शरिरात संचारते. चालणे हे शरीराची मूलभूत क्रिया आहे. चालल्यामुळे मधुमेह, हृदयरोग, रक्तदाबाची समस्या दूर होते. त्याचबरोबर स्नायू आणि हाडे मजबूत बनवते. प्रत्येकाची स्वतःची चालण्याची विशिष्ट पद्धत आहे, परंतु निरोगी चालण्यासाठी काही नियम माहित असणे आवश्यक आहे. अन्यथा बर्‍याच समस्या उद्भवू शकतात. (Follow the rules of the walk otherwise there will be no benefit, know the right way to walk)

1. चालताना शरीराचा तोल सांभाळणे, त्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत शरीरास अगदी सरळ परंतु आरामदायक स्थितीत ठेवले पाहिजे. खांदे झुकवू नयेत.

2. आपल्या शरीराचा पाया म्हणजे आपले पाय आहेत. त्यामुळे चालत असताना लक्षात घ्या की आपल्या पायाचे गुडघे आपल्या गुडघ्यास अनुसरुन असावेत. मान सरळ आणि सामान्य स्थितीत असावी. खांदे पाठीमागे असले पाहिजेत. परंतु तेही आरामदायक स्थितीत असावेत, याची खबरदारी घ्या.

3. ‘हेल्दी वॉकिंग’दरम्यान पायांच्या सर्व स्नायूंचा वापर होतो. अशा स्थितीत जेव्हा जेव्हा आपण चालण्याची सुरुवात करता, तेव्हा तेव्हा प्रथम पुढच्या पायची टाच ठेवा आणि संपूर्ण पाय जमिनीवर ठेवा.

4. चालताना आपले कोपर आपल्या शरीराच्या जवळ ठेवा आणि आपले हात फिरवा. यामुळे आपल्या खांद्यांना तसेच मागच्या स्नायूंना मजबुती येईल.

5. चालताना आपले डोके आणि हनुवटी नेहमीच किंचित वर ठेवा आणि पुढील दिशेने चाला. अशा कृतीमुळे चालताना आपले शरीर संतुलित ठेवण्यास मदत होते.

6. सुरुवातीच्या ‘वॉर्म अप’साठी सामान्य वेगाने चाला आणि सामान्यपणेच श्वास घ्या. १० ते १५ मिनिटांच्या सरावानंतर आपला चालण्याचा वेग वाढवा. पुढे काही काळ उच्च तीव्रतेचा वेग कायम ठेवा.

7. वेगाने खूप लांब पावले टाकण्याचे टाळा. दररोज सराव करा आणि ३० मिनिटांचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करा. यासाठी घाई करण्याची गरज नाही. दररोज काही वेळ वाढवून आपण वेग हळूहळू वाढवला पाहिजे. नंतर हा वाढीव वेग आपला चालण्याचा सामान्य वेग बनून जाईल.

8. ‘वॉर्म अप’च्या वेगाने जवळपास १० ते १५ मिनिटे चाला. यानंतर आपण चालणे ठेवू इच्छित असल्यास पुन्हा तोच वेग ठेवा. जर नसेल तर काही ठिकाणी बसून काही काळ आराम करा. (Follow the rules of the walk otherwise there will be no benefit, know the right way to walk)

इतर बातम्या

Kabaddi in Telangana: तेलंगणाच्या सूर्यापेटमधील कबड्डी सामन्यादरम्यान गॅलरी कोसळली, 50 हून अधिक जखमी

SBI Clerk 1st Waiting List : स्टेट बँक भरतीची लेटिंग लिस्ट जारी, अशी करा डाऊनलोड

काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?.
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.