AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

शास्त्रज्ञांनी केलेल्या वेगवेगळ्या संशोधनात असे दिसून आले आहे की, ‘व्हिटामिन-डी’ची कमतरता असणाऱ्या लोकांना कोरोना काळात अधिक धोका असतो.

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक
घरात राहून व्हिटॅमिन डीची कमतरता कशी दूर कराल? जाणून घ्या याबद्दल सर्व काही
| Edited By: | Updated on: Dec 07, 2020 | 12:28 PM
Share

मुंबई : कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य तज्ज्ञ याला कोरोना विषाणूची दुसरी लाट म्हणत आहेत. गेल्या काही दिवसांत कोव्हिड-19 प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस भयानक बनत चालली आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी घरीच राहून आपला बचाव करणे महत्त्वाचे आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या वेगवेगळ्या संशोधनात असे दिसून आले आहे की, ‘व्हिटामिन-डी’ची (Vitamin D) कमतरता असणाऱ्या लोकांना कोरोना काळात अधिक धोका असतो. ‘व्हिटामिन-डी’मुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते. ज्यामुळे आपले शरीर कोणत्याही प्रकारच्या विषाणूंविरूद्ध लढण्यास तयार होते (Food Supplement for Vitamin D Deficiency).

वास्तविक आपले शरीर दररोज हजारो विषाणूंशी लढत असते, ज्यासाठी व्हिटामिन-डी आपल्याला मदत करते. अशा परिस्थितीत आपल्या शरीराला या व्हिटामिनची योग्य मात्रा मिळणे महत्त्वाचे असते. सहसा सूर्य प्रकाश आणि मांसाहारी पदार्थांमधून व्हिटामिन डी मिळते. परंतु, ज्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही त्यांच्यासाठी आहारात व्हिटामिन डीची कमतरता भरून काढणाऱ्या पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.

तर शरीरात असेल व्हिटामिन-डीची कमतरता…

1. जर आपल्याला सतत थकवा किंवा आजारी असल्यासारखे वाटत असेल तर, व्हिटामिन डीची कमतरता असून शकते. अशावेळी आपण वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी.

2. सतत सांधे दुखी, स्नायू दुखी किंवा अशक्तपणा, पायर्‍या चढताना पटकन थकल्यासारखे वाटणे देखील प्राथमिक लक्षण असू शकते.

3. व्हिटामिन-डीच्या कमतरतेमुळे केस देखील जास्त गळायला लागतात.

4. व्हिटामिन-डीची कमतरता असल्यास जखमा बऱ्या होण्यास देखील वेळ लागतो.

5. व्हिटामिन-डीच्या कमतरतेमुळे बऱ्याचदा आपल्याला नैराश्य देखील येऊ शकते.

(Food Supplement for Vitamin D Deficiency)

या पदार्थांचा आहारात करा समावेश

  1. मांस आणि भाजीपाला

मांसामध्ये व्हिटामिन-डी जास्त प्रमाणात आढळते. परंतु, आपण शाकाहारी असल्यास मशरूम आणि रताळे खाऊ शकता. यामुळे आपल्या शरीरात व्हिटामिन-डीची कमतरता भरून निघेल.

  1. संत्र्याचा रस

ताज्या संत्र्याचा अथवा फोर्टिफाइड संत्र्याचा रस व्हिटामिन डीची कमतरता भरून काढू शकतो. बाजारात टेट्रापॅकमध्ये मिळणारा संत्र्याचा रसही तुम्ही पिऊ शकता. संत्र्याच्या रसामुळे शरीराला 12 ते 15 टक्के व्हिटामिन-डी मिळते.

  1. अंड्यातील पिवळ बलक

अंडी आपल्या शरीराला व्हिटामिन-डी पुरवू शकतात. अंड्याच्या आतील पिवळा बलक अतिशय पौष्टिक आणि प्रथिनेयुक्त असतो. यातून शरीराला व्हिटामिन-डी मिळतो (Food Supplement for Vitamin D Deficiency).

  1. मासे

मांसाहारी लोकांसाठी ‘मासे’ हा व्हिटामिन-डीचा उत्तम स्त्रोत आहे. ‘साल्मन’, ‘टूना फिश’, ‘कॉड लिव्हर ऑइल’, ‘हेरिंग फिश’ इत्यादींमध्ये व्हिटामिन-डी मुबलक प्रमाणात आढळते.

  1. गायीचे दूध

आरोग्य तज्ञाच्या मते, गायीचे दूध व्हिटामिन-डीने समृद्ध असते. जे आपल्या शरीराला जवळपास 20 टक्के व्हिटामिन-डी देते.

  1. दही

दही खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन-डी देखील मिळते. म्हणूनच आहारात याचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून आपल्या शरीराला व्हिटामिन-डीची कमतरता भासणार नाही.

(Food Supplement for Vitamin D Deficiency)

टीप : सदर लेख संशोधनावर आधारित असून, कुठल्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.