Garlic Side Effect | लसूण खात असाल तर याकडे लक्ष द्या
जेवण बनविताना लसूण हा घटक खूप महत्वाचा मानला जातो. जेवणाची चव अधिक चवदार बनविण्यात आणि आरोग्यासाठीही लसूण अधिक लाभदायक आहे. मात्र कच्ची लसूण अधिक प्रमाणात खात असाल तर तुम्हाला त्याचा तोटा सहन करावा लागू शकतो.
मुंबईः भारतातील पाकशास्त्रातील अनेक पदार्थांमध्ये लसूणचा (Garlic) वापर केला जातो. आहारात लसूण असेल तर शरीरासाठी त्याचे खूप मोठे फायदे होत असतात. लसूणमध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस, पोटॅशियम, जीवनसत्व ब अशी पोषक तत्व शरीराला भरपूर मिळतात. अन्न चविष्ट करण्याबरोबरच शरीरातील रोगप्रतिकार शक्ती (Immunity) वाढविण्यात मदत होते. सध्याच्या काळात लसूण फक्त भारतीय पाकशास्त्रातच वापरले जाते असे नाही तर अनेक प्रकारच्या फास्टफूडमध्येही याचा वापर केला जात आहे. तर काही जण प्रमाणपेक्षा जास्त लसूणाचा वापर करतात. हिवाळ्याच्या (Winter Season) दिवसात तर प्रत्येक आहारात लसूणचा वापर केला जातो. मात्र लसूण आहारात प्रमाणापेक्षा जास्त वापर होत असेल तर त्याचा तुमच्या आरोग्याला तोटा होऊ शकतो.
ब्लड प्रेशर कमी
लसूणमुळे तुमचा ब्लड प्रेशर कमी होऊ शकतो. ब्लड प्रेशरचा ज्यांना पूर्वीपासूनच त्रास आहे, त्यांनी आहारात लसूण वापर कमी केला पाहिजे किंवा आहारात लसूण वर्ज करणे गरजेची आहे. त्यामुळे ब्लड प्रेशर असणाऱ्यांसाठी लसूण नुकसानकारक ठरू शकते.
लसूण अधिक उग्र
लसूणचा वास अधिक उग्र आणि तिखट असतो. त्यामुळे लसूण जास्त खात असाल तर तुम्ही बोलताना त्याचा अधिक दुर्गंधी येते. त्यामुळे बोलताना तोंडावाटे दुर्गंधी येत असेल तर त्यांनी लसूण वर्ज केली पाहिजे.
अॅसिडिटीचा त्रास
लसूणमध्ये सगळ्यात जास्त मात्रा असते ती अॅसिडची. त्यामुळे लसूण अधिकप्रमाणात खाल्यास गळ्यात जळजळण्याचा त्रास होऊ लागतो. ज्यांना अधिच अॅसिडेटीचा त्रास होतो, त्यांनी आपल्या आहारात लसूण खाणे टाळले पाहिजे.
अतिसाराचा त्रास
उपाशी पोटी लसूण खाल्यास अतिसाराचा त्रास संभवू शकतो. लसूणमुळे शरीरात सल्परसारख्या गॅस तयार होतो. त्यामुळे अतिसाराचा त्रास होतो.
मळमळ आणि उल्टी
अमेरिकेतील कॅन्सर इन्स्टिट्यूटकडून जाहीर झालेल्या एका अहवालानुसार उपाशी पोटी लसूण खाल्यास मळमळणे आणि उल्टीचा त्रास होऊ शकतो. तर हॉवर्ड मेडिकल स्कूलने सांगितले आहे की, लसूणमुळे गॅस्ट्रोचाही त्रास होतो.
संबंधित बातम्या