Weight Loss | शुद्ध तुपानेही होईल वजन कमी, आताच जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

बहुतेक भारतीय खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणार्‍या तूपात 99.9 टक्के चरबी असते. तूप सॅच्युरेटेड फॅटपासून तयार केल्यामुळे रूम टेम्प्रेचरमध्ये ठेवले तरी ते खराब होत नाही.

Weight Loss | शुद्ध तुपानेही होईल वजन कमी, आताच जाणून घ्या ‘या’ गोष्टी!
तूप
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 4:21 PM

मुंबई : जर आपण सतत आपले वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर आपण आपल्या आहारातून चरबी वाढवणार्‍या गोष्टी नक्कीच काढून टाकल्या असतील. या चरबीयुक्त पदार्थांमध्ये तूप पहिळ्या क्रमांकावर आहे. परंतु आपणास हे माहित आहे का की, आपण वर्ज्य केलेल्या चरबीयुक्त तूपात केवळ पुष्कळ पौष्टिक घटकच असतात असे नाही, तर यामुळे आपले वजन कमी करण्यास देखील मदत होऊ शकते (Ghee will help you to reduce weight).

यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे की तुमच्या शरीरात जास्त वजन वाढवण्यासाठी तूप जबाबदार नाही, तर त्यापेक्षा जास्त वजन कमी करण्यात ते फायदेशीर ठरते.

तूप खाल्ल्यास शरीराचे वजन कमी होते का?

बहुतेक भारतीय खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणार्‍या तूपात 99.9 टक्के चरबी असते. तूप सॅच्युरेटेड फॅटपासून तयार केल्यामुळे रूम टेम्प्रेचरमध्ये ठेवले तरी ते खराब होत नाही. तूप बहुधा गायीच्या दुधाचा वापर करून बनवला जाते. फॉस्फोलाइपिड घटकाच्या उपस्थितीमुळे घरगुती बनवलेले तूप बर्‍याच काळासाठी टिकून राहते, तर व्यावसायिकरित्या तयार केलेल्या तूपात ते उपलब्ध नसते.

नुकतेच, तूपातील फॅटी अॅसिडसची रचना समजून घेण्यासाठी एक संशोधन केले गेले, ज्यामध्ये असे आढळले की तूप डोकोसॅक्सिनोइक अॅसिडचा चांगला स्रोत आहे. डोकोसॅक्सिनोइक अॅसिड सर्वात लोकप्रिय ओमेगा-3 फॅटी अॅसिड आहे. ओमेगा 3 फॅटी अॅसिड ही आवश्यक चरबी आहेत, ज्याचे आपण आपल्या आहारात सेवन करणे आवश्यक आहे. हे अॅसिड आपले शरीर स्वतःहून तयार करू शकत नाही (Ghee will help you to reduce weight).

डोकोसॅक्सिनोइक अॅसिडचा खास करून कर्करोग, हृदयविकाराचा झटका, मधुमेह, सांधेदुखीसारख्या समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. आयुर्वेदानुसार तुमचे आयुष्य वाढवण्यासाठी तूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि तुमच्या शरीरास अनेक रोगांपासून वाचवते.

डॉक्टरांनी असा सल्ला दिला आहे की जर तुम्ही तुमचे वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत असाल तर तूप खाणे आवश्यक आहे. कारण, ते अमीनो अॅसिडने समृद्ध आहे आणि चरबीच्या पेशींचे आकार कमी करण्यास मदत करते.

वजन कमी करण्यासाठी वापरा तूप

तज्ज्ञ म्हणतात की, तूप ओमेगा-3 फॅट आणि ओमेगा-6 फॅटने समृद्ध आहे आणि आपले वजन कमी करण्यासाठी हे घटक खूप चांगले ठरू शकतात. याव्यतिरिक्त, तूपातील ओमेगा-3 फॅटी अॅसिडस् आपल्या शरीरातील काही ‘इंच’ कमी करण्यात मदत करतात, जे आपल्या शरीराचे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Ghee will help you to reduce weight)

हेही वाचा :

पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.