Hair Care | हिवाळ्याच्या दिवसांत स्काल्प डिटॉक्स करणे आवश्यक, केस गळतीची समस्याही होईल दूर

हिवाळ्यात आपण आपल्या त्वचेची खूप काळजी घेतो. परंतु, याकाळात आपले आपल्या केसांच्या निगेकडे दुर्लक्ष होते.

Hair Care | हिवाळ्याच्या दिवसांत स्काल्प डिटॉक्स करणे आवश्यक, केस गळतीची समस्याही होईल दूर
रीठा केसातील कोंड्याच्या समस्येवर देखील चांगला उपाय आहे. केसांतील कोंडा काढून टाकण्यासाठी रीठा पाण्यात भिजत ठेवून, नंतर त्याची पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट केसांच्या मुळाशी लावा. या हेअर पॅकच्या निअय्मित वापरणे कोंड्याची समस्या नाहीशी होईल. आंघोळ करण्यापूर्वी आपण पेस्ट केसांमध्ये लावून नंतर केस धुवू शकता.
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 3:06 PM

मुंबई : हिवाळ्यात आपण आपल्या त्वचेची खूप काळजी घेतो. परंतु, याकाळात आपले आपल्या केसांच्या निगेकडे दुर्लक्ष होते. केस मुलायम राहावेत, केसांची आर्द्रता टिकून राहावी आणि केसांचे संरक्षण करण्याचे अनेक पद्धती आपल्याला माहिती असतात, ज्यामुळे आपले केस निरोगी आणि चमकदार दिसतात. परंतु केसांच्या स्काल्पला एक्सफोलिएट कसे करावे, हे आपल्याला माहिती आहे काय?  केसांची स्काल्प एक्सफोलिएट केल्याने स्काल्पचे पोर्स उघडतात. याचा आपल्या केसांना थेट फायदा होतो (Hair Care tips How to detox your scalp).

त्वचेप्रमाणेच केसांना मॉइश्चराइझ ठेवणेही खूप महत्त्वाचे आहे, अन्यथा केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. केस कोरडे होण्यामागील ड्राय स्काल्प आणि योग्य काळजीची अभाव हे मुख्य कारण असू शकते.

केसांच्या स्काल्पची क्लोगिंग करणे आणि स्वच्छ ठेवणे जितके आवश्यक आहे, तितकेच त्वचेला एक्सफोलीएट करणे देखील महत्वाचे आहे. स्काल्पचे रोम छिद्र साफ केल्याने आपले केस निरोगी होतात आणि त्यावर तेल जमत नाही. केसांना डिटॉक्स करण्यासाठी आपण हेअर मास्क वापरू शकता. चला तर, जाणून घेऊया केसांना डिटॉक्स करण्याचे फायदे आणि त्याच्यासाठी लागणारा हेअर मास्क कसा तयार करावा ते…

हेअर मास्कसाठी लागणारी सामग्री :

ग्रीन टी आणि बेंटोनाइट क्ले

(Hair Care tips How to detox your scalp)

हेअर मास्क बनवण्याची कृती :

अर्धा कप ग्रीन टी उकळा आणि फिल्टर करून घेऊन थंड होऊ द्या. आता एका वाटीत किंवा भांड्यात 2 ते 4 चमचे बेंटोनाइट क्ले मिसळा. आपल्याला ही माती ऑनलाईन आणि ऑफलाईन दुकानांमध्ये सहज मिळेल. या मातीमध्ये ग्रीन टी घालून, त्याची जाड पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या स्काल्पवर व्यवस्थित लावा आणि 15 मिनिटांनंतर थंड पाण्याने केस धुवा.

बेंटोनाइट चिकणमाती ज्वालामुखीच्या राखेतून बनवली जाते. ही माती आपल्या केसांना मॉइश्चरायझिंग करण्यासोबतच स्काल्पवरील घाण काढून टाकण्यासाठी देखील उपयोगी करते. त्यात अँटी मायक्रोबियल गुणधर्म आहेत.

हेल्थ लाईनच्या मते, जर आपण नैसर्गिक उत्पादनांचा वापर करू इच्छित असाल आणि कोरडेपणा किंवा केसांच्या रुक्षपणामुळे त्रस्त असाल, तर हा आपल्यासाठी एक चांगला पर्याय आहे. त्याच वेळी, ग्रीन टीमध्ये केटेचिन हा घटक असतो, जो केस गळतीस प्रतिबंध करतो आणि केसांतील कोंडा कमी करण्यास मदत करतो.

(टीप : डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Hair Care tips How to detox your scalp)

हेही वाचा :

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.