Hair Care | थंडीच्या दिवसांत रुक्ष केसांच्या समस्येमुळे हैराण? मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा!
त्वचेप्रमाणेच केसांना मॉइश्चराइझ ठेवणेही खूप महत्त्वाचे आहे, अन्यथा केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात.
मुंबई : हिवाळ्यात थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण कपड्यांवर उबदार जॅकेट देखील घालतो. त्याचप्रमाणे या दिवसांत त्वचा आणि केसांची निगा राखणेही खूप महत्त्वाचे आहे. या हंगामात त्वचेसह केसांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. बहुतेक स्त्रियांना लांब सडक, काळेभोर केस आवडतात. मात्र, थंडीच्या दिवसांत केसांच्या समस्या देखील वाढतात (Hair Pack for dry hair during winter season).
त्वचेप्रमाणेच केसांना मॉइश्चराइझ ठेवणेही खूप महत्त्वाचे आहे, अन्यथा केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. केस कोरडे होण्यामागील ड्राय स्काल्प आणि योग्य काळजीची अभाव हे मुख्य कारण असू शकते. जर आपण केसांच्या रुक्षपणा किंवा कोरडेपणाने देखील त्रस्त असाल तर काही सोप्या टिप्स वापरून आपण यातून मुक्तता मिळवू शकता.
अंडी आणि दह्याच्या हेअर मास्क
– 2 अंडी
– 6 चमचे दही
– 1 चमचा लिंबाचा रस
कृती :
– सर्वप्रथम अंडी फेटून घ्या. यात दही मिसळा.
– दही आणि अंडी व्यवस्थित फेटून झाल्यावर त्यात लिंबू रस मिसळा. यामुळे स्काल्पची नीट स्वच्छता होते.
– या मिश्रणाला व्यवस्थित केसांमध्ये लावून घ्या आणि 30 मिनिटे थांबा.
– यानंतर केसांना व्यवस्थित शॅम्पू आणि कंडीशनर लावून स्वच्छ धुवून घ्या.
(अंड्यातील प्रोटीन आपल्या केसांना बळकटी देते. तर, दही केसांना मॉइश्चराइझ करते. मात्र, आपण अंड्याचा वापर करू इच्छित नसाल तर, त्याऐवजी कोरफड वापरू शकता.)
(Hair Pack for dry hair during winter season)
कोरफड आणि व्हिटामिन ई हेअर मास्क
– 3 चमचे कोरफड जेल
– व्हिटामिन ई कॅप्सूल (3 चमचे तेल)
कृती :
– एका भांड्यात कोरफडचा ताजा गर काढून घ्या.
– आता व्हिटामिन ई कॅप्सूलमधून साधारण 3 चमचे तेल काढून घ्या.
– कोरफडचा गर आणि व्हिटामिन ई तेल व्यवस्थित मिक्स करून, केसांच्या स्काल्पवर लावून घ्या.
– साधारण 40 मिनिटांनी केस शॅम्पू आणि कंडीशनरने धुवून घ्या.
(कोरफड जेल केसांना पोषण देते, तसेच केसांतील कोंड्याची समस्या कमी करते. व्हिटामिन ईचे तेल केसांना मॉइश्चराइझ करून चमकदार बनवते.)
(Hair Pack for dry hair during winter season)
(टीप : कुठल्याही उपचारांपूर्वी डॉक्टर अथवा सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.)
हेही वाचा :
Hair Care | केस गळती, कोंड्याची समस्या? सगळ्यांवर रामबाण उपाय ठरेल बहुगुणकरी ‘रीठा’!
Hair Mask | केस गळती, रुक्षपणा समस्या होणार दूर, ‘हा’ हेअर मास्क ठरेल केसांसाठी वरदान!https://t.co/eedFAgnEcM#HairCare #HairMask
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 19, 2020