फक्त नारळपाणीच नव्हे त्याची मलाई देखील आरोग्यासाठी उपयुक्त, जाणून घ्या फायदे

नारळपाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्याचप्रमाणे त्यातील मलईदेखील आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असते. शहाळ्यातील मलईचे आरोग्यासाठी काय काय फायदे असतात, ते जाणून घेऊया.

फक्त नारळपाणीच नव्हे त्याची मलाई देखील आरोग्यासाठी उपयुक्त, जाणून घ्या फायदे
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Jun 26, 2023 | 2:48 PM

Coconut Malai : नारळपाणी (Coconut water) हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. तसेच त्यातील मलईचेही गुणधर्मही आपल्यासाठी उपयुक्त असतात. नारळाच्या मलईमध्ये (Coconut malai) प्रथिने, तांबे आणि मॅंगनीज यासारखी अनेक पोषक गुणधर्म असतात. तांबे म्हणजेच कॉपर आपल्या हाडांसाठी खूप फायदेशीर असते, हे तर सर्वांनाच माहीतअसते. त्यासह ते हृदय तंदुरुस्त ठेवण्यातही महत्वपूर्ण भूमिका बजावते. नारळाची मलई खाल्ल्याने आपले मेटाबॉलिज्म म्हणजेच चयापचय दरही वाढतो. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

शहाळ्यातील मलईच नव्हे तर नारळाचे तेल, दूध आणि इतर अनेक प्रकारेही तुम्ही त्याचे सेवन करू शकता, उपयोग करू शकता. नारळाच्या मलईमुळे आरोग्याला इतरही अनेक फायदे मिळतात. ते कोणते हे जाणून घेऊया.

पचनतंत्र सुधारते

शहाळ्याच्या मलईमध्ये फायबर जास्त असते. ही मलई खाल्ल्याने आपली पचनक्रिया निरोगी राहते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहण्यास मदच होते. मलई नियमितपणे खाल्ल्यास पचनतंत्र सुधारते, ज्याच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

हृदय स्वस्थ ठेवते

शहाळ्यातील मलई ही आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी देखील अतिशय फायदेशीर असते. त्याचे सेवन केल्याने गुड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. हृदयाशी संबंधित समस्याही दूर राहतात. मलई खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉलही कमी होते. एकंदरच हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी मलई हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

प्रतिकारक शक्ती वाढते

शहाळ्यातील मलईमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि मॅंगनीज यासारखी पोषक तत्वे खूप असतात. मलई ही शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करते. थोडक्यात आपली इम्युनिटी वाढते. त्यामुळे मलईचे सेवन केल्याने आपण स्वतःला अनेक आजारांपासून वाचवू शकतो.

मेंदूसाठीही फायदेशीर

मलई ही आपल्या मेंदूचे कार्य सुधारते. नारळातील मलई खाल्ल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. हे आपल्या मेंदूचे कार्य वाढवण्यासही मदत करते, विचारशक्तीही वाढते.

वजन कमी करण्यास उपयुक्त

मलई खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. त्यामध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे मलई खाल्ल्याने आपले पोट जास्त काळ भरलेले राहते. तसेच मलई खाल्ल्याने आपले मेटाबॉलिज्म म्हणजेच चयापचय दरही वाढतो. ज्यामुळे वजन कमी करण्यास जास्त मदत होऊ शकते.

स्ट्रेस कमी होतो

मलईमध्ये काही असे गुणधर्म, अनेक अँटी-ऑक्सीडेट्स असतात. ते आपल्या शरीराचे फ्री- रॅडिकल्समुळे होणारे नुकसान रोखतात, त्यामुळे ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेसपासूनही आपला बचाव होतो.

शरीर थंड राहतं

नियमितपणे मलई खाल्यास उष्णेतपासून, गरमापासून बचाव होतो. मलई खाल्याने आपल्याला खूप एनर्जी मिळते. ज्यामुळे आपण गरमीशी लढा देऊ शकतो. मलई खाल्ल्याने शरीर थंड राहते. तसेच आपल्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होत नाही. त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रासही वाचतो.

थोडक्यात काय तर मलई ही शरीरासाठी सर्वार्थाने उत्तम असून त्याचे नियमित सेवन केल्यास आपले आरोग्य सुधारण्यास मदतच होते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.