महादेवाच्या पिंडीवर वाहिले जाणारे ‘बेलपत्र’ आरोग्यासाठीही लाभदायी, वाचा याचे फायदे…

बेलपत्रक केवळ महादेवाला संतुष्ट करण्यासाठीच वापरले जात नाही, तर आरोग्याच्या बाबतीतही त्याचे बरेच फायदे आहेत.

महादेवाच्या पिंडीवर वाहिले जाणारे ‘बेलपत्र’ आरोग्यासाठीही लाभदायी, वाचा याचे फायदे...
Follow us
| Updated on: Jan 04, 2021 | 7:00 PM

मुंबई : महादेव शिवशंकराला बेल अत्यंत प्रिय आहे. जेव्हा जेव्हा महादेवाची पूजा केली जाते, तेव्हा बेलपत्र अर्थात बेलाच्या पानाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. महादेवाच्या स्वभावाप्रमाणे थंड प्रकृतीचे बेलाचे पान भगवान शंकराला खूप प्रिय आहे. बेलपत्र हे नेहमी तीन पानांच्या गटामध्ये असते. या तीन पानांना ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे स्वरूप मानले जाते. परंतु, तुम्हाला माहिती आहे का की, बेलपत्रक केवळ महादेवाला संतुष्ट करण्यासाठीच वापरले जात नाही, तर आरोग्याच्या बाबतीतही त्याचे बरेच फायदे आहेत. खरं तर, बेलाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. म्हणून बेलाच्या पानांचा उपयोग अनेक समस्या आणि आरोग्याशी संबंधित त्रासांपासून मुक्त होण्यासाठी केला जाऊ शकतो (Health Benefits of Bel aka Bilva Patra).

डोळ्यांच्या समस्या

डोळ्यांमध्ये लालसरपणा, अॅलर्जी, वेदना असल्यास बेलाच्या पानांवर तूप लावा आणि डोळ्यांना शेक द्या. त्यानंतर डोळ्यांवर पट्टी बांधा. यामुळे डोळ्यांच्या समस्यांतून खूप आराम मिळेल.

मधुमेहावर प्रभावी

मधुमेह असणाऱ्या रूग्णांनी बेलाची पाने बारीक करून, त्याचा रस काढून, दिवसातून दोन वेळा सेवन करावा. काही काळानंतर, याचा सकारात्मक परिणाम दिसू लागेल.

तापावर गुणकारी

ताप आल्यानंतर बेलाची पाने एका ग्लास पाण्यात उकळा. पाणी अर्धे शिल्लक असताना, ते गाळून घ्या आणि चहाप्रमाणे प्या. याने तुम्हाला आराम वाटेल. जर, तोंडात फोड आले असतील, तर बेलाची पाने पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन, चावून चघळत राहा. याने तुम्हाला लवकर आराम मिळेल (Health Benefits of Bel aka Bilva Patra).

सांधे दुखी

जर हिवाळ्यात सांधेदुखीची समस्या वाढत असेल, तर बेलाची पाने गरम करून वेदना असलेल्या ठिकाणी बांधा. या उपायामुळे काही दिवसांत वेदना कमी होण्यास मदत होईल.

हृदयरोग आणि दम्याचा त्रास

बेलाच्या पानांचा काढा हृदयरोग आणि दम्याच्या रूग्णांसाठी खूप प्रभावी आहे. दररोज नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळी या काढ्याचे सेवन केल्याने या समस्या कमी होण्यास मदत होईल.

रक्तवाढीसाठी गुणकारी

मधमाशी आणि अन्य काही कीटक चावल्यास बेलपत्राचा रस जखमेवर लावल्यास आराम पडतो. बदलत्या जीवनशैलीत अनेकांना रक्ताच्या कमरतेची लक्षणे दिसून येतात. वाळलेल्या बेलाच्या गराची पावडर तयार करून गरम दुधात साखरेसोबत रोज एक चमचा घेतल्यास शरीरात नवीन रक्त तयार होण्यास सुरुवात होते.

(Health Benefits of Bel aka Bilva Patra)

हेही वाचा :

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.