Chocolate | मधुमेह, हृदयविकाराचा धोका कमी करेल ‘चॉकलेट’, वाचा याचे महत्त्वाचे फायदे…

चॉकलेट ट्रॉपिकल थिओब्रोमा कोको झाडाच्या बियांपासून बनवळे जाते आणि हा अँटिऑक्सिडेंट्सचा एक उत्तम स्रोत आहे.

Chocolate | मधुमेह, हृदयविकाराचा धोका कमी करेल ‘चॉकलेट’, वाचा याचे महत्त्वाचे फायदे...
मधुमेह, हृदयविकाराचा धोका कमी करेल ‘चॉकलेट’
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 1:16 PM

मुंबई : ‘व्हॅलेंटाईन वीक’मध्ये आज ‘चॉकलेट डे’ साजरा केला जात आहे. ‘चॉकलेट’ हा पदार्थ अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतो. चॉकलेट खाण्याने मुरुम, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, दात किडणे आणि मधुमेह होण्याचा धोकाअसतो, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. म्हणूनच चॉकलेट खाण्यापूर्वी आपण पुन्हा पुन्हा विचार करतो. चॉकलेटमुळे होणाऱ्या हानीबद्दल आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परंतु, हेच चॉकलेट आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर देखील आहे (Health Benefits of chocolate).

चॉकलेट ट्रॉपिकल थिओब्रोमा कोको झाडाच्या बियांपासून बनवळे जाते आणि हा अँटिऑक्सिडेंट्सचा एक उत्तम स्रोत आहे. बर्‍याच अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की, कोको बियाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहेत. आम्ही तुम्हाला चॉकलेट खाण्याच्या फायद्यांविषयी सांगणार ​​आहोत, ज्यामुळे आपण अगदी बिनधास्त चॉकलेट खाऊ शकाल..

चॉकलेट पौष्टिक आहे!

चॉकलेटमध्ये बरेच पौष्टिक घटक आढळतात, विशेषत: डार्क चॉकलेट, ज्यामध्ये भरपूर कोको आणि फायबर असतात. डार्क चॉकलेटमध्ये झिंकची मात्रा सर्वाधिक आहे, जी शरीराचे 300 एन्झाइम्स सक्रिय करते. तसेच, चयापचय वाढवण्याचे काम करते. याव्यतिरिक्त, चॉकलेटमध्ये लोह, मॅग्नेशियम, तांबे, मॅंगनीज, पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियमची मात्रा देखील भरपूर असते.

रक्तदाब कमी करते.

चॉकलेटमध्ये जास्त प्रमाणात फ्लानोल्स असतात ज्यामुळे एंडोथेलियम आणि रक्तवाहिन्यांची कार्य सुरळीत होण्यास मदत होते. ज्यामुळे नायट्रिक ऑक्साईड तयार होते आणि रक्तवाहिन्या कार्यरत होतात. यामुळे आपला रक्तदाब नियंत्रणात राहतो.

हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो!

कोकोमध्ये केवळ रक्तदाब कमी करण्यासाठीच नव्हे, तर हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठीचे गुणधर्म देखील आहेत. हे आपले एलडीएल आणि खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यात मदत करते. ज्यामुळे स्ट्रोक आणि हृदय विकाराचा धोका कमी होतो. दोन स्वीडिश अभ्यासांनी याची पुष्टी केली की, दररोज 19 ते 30 ग्रॅम चॉकलेट खाल्ल्याने हृदयाची समस्या उद्भवत नाही (Health Benefits of chocolate).

टाईप 2 मधुमेह

साखर मधुमेह रूग्णांसाठी अतिशय हानिकारक आहे. पण चॉकलेट नाही. अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की, डार्क चॉकलेट मध्यम प्रमाणात सेवन केल्यास टाईप 2 मधुमेहाची लक्षणे कमी होण्यास मदत होते. काही अभ्यासांनी असे सिद्ध केले आहे की, फ्लेव्होनॉइड्सचे जास्त सेवन केल्याने या रोगाचा धोका कमी होतो. याव्यतिरिक्त, फ्लेव्होनोझयुक्त कोकोआमुळे इन्सुलिन देखील कमी होते. चॉकलेट खाल्ल्याने मूड देखील चांगला होतो. म्हणूनच अनेक लोक तणावात चॉकलेटचे सेवन करतात.

कोणते चॉकलेट सर्वात फायदेशीर?

चॉकलेटचे तीन प्रकार आहेत. यातील व्हाईट चॉकलेट, मिल्क चॉकलेट आणि डार्क चॉकलेट खाणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यात कोकोआ मुख्य घटक आहे, जो आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या तीन चॉकलेटपैकी, डार्क चॉकलेट सर्वात फायदेशीर आहे, कारण त्यात साखर अजिबात नसते आणि कोकाचे प्रमाण अधिक असते.

एका दिवसात किती चॉकलेट खावे?

कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन शरीरासाठी बाधक ठरते. एका दिवसात 30 ते 60 ग्रॅमपेक्षा जास्त चॉकलेट खाऊ नये. जास्त प्रमाणात चॉकलेट सेवन केल्याने आपली दररोजची कॅलरी संख्या वाढेल, ज्यामुळे वजन वाढणे आणि इतर समस्या उद्भवू शकतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Health Benefits of chocolate)

हेही वाचा :

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.