Honey Benefits | कोरोना काळात अनेक समस्यांना दूर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरेल ‘मध’, वाचा याचे फायदे…

मध खनिजे, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वांचा संग्रह आहे. रोगप्रतिकार शक्ती बळकट करण्याव्यतिरिक्त, मध अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यात देखील प्रभावी आहे.

Honey Benefits | कोरोना काळात अनेक समस्यांना दूर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरेल ‘मध’, वाचा याचे फायदे...
मध
Follow us
| Updated on: Apr 03, 2021 | 8:42 AM

मुंबई : संपूर्ण देशात कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. हे टाळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याबाबत सतर्क होण्याची गरज आहे. विशेषतः प्रत्येकाला आपली प्रतिकारशक्ती बळकट करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत आपल्यासाठी मधाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. मध खनिजे, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वांचा संग्रह आहे. रोगप्रतिकार शक्ती बळकट करण्याव्यतिरिक्त, मध अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यात देखील प्रभावी आहे. आयुर्वेदात याचा उपयोग सर्व रोग बरे करण्यासाठी केला जातो. चला तर, जाणून घेऊया मधातील या औषधी फायद्यांविषयी अधिक माहिती…(Health Benefits of Honey during corona pandemic)

मधापासून घरगुती उपचार :

– खोकल्याचा त्रास बराच काळ बरा होत नसेल, तर मधाचे सेवन करणे खूप उपयुक्त ठरू शकते. मधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात, जे संसर्ग रोखतात. तसेच, मध कफ सहजपणे काढून टाकतो. आपण एखादा चमचा नुसता मधही खाऊ शकता. याशिवाय आल्याच्या रसामध्ये मध मिसळून खाल्याने कफ आणि खोकल्यात खूप आराम मिळतो.

– वजन कमी करण्यासाठी देखील मध खूप उपयुक्त आहे. त्यात अजिबात चरबी नसते. याशिवाय मध कोलेस्टेरॉलची पातळी देखील नियंत्रित करतो. वजन कमी करण्यासाठी आपण कोमट पाण्यामध्ये मध मिसळून, ते पाणी सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकता.

– घसा खवखवणे या समस्येतून आराम देण्यासाठी देखील मध फार प्रभावी आहे. जर, तुम्हाला घसा खवखवणे किंवा घसा दुखण्याची असेल, तर मध सेवन केल्यास खूप आराम मिळेल (Health Benefits of Honey during corona pandemic).

– बद्धकोष्ठता हे बर्‍याच रोगांचे मूळ आहे. बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी मधाचे सेवन खूप फायदेशीर ठरते. नियमित सेवन केल्यास पोटातील गॅस आणि अपचनापासूनही मोठा आराम मिळतो.

– मधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे आणि विरोधी दाहक गुणधर्म असतात. कोणत्याही ठिकाणी सूज किंवा वेदना असल्यास किंवा जखम झाली असल्यास थेट त्या जागी मध लावू शकता. यामुळे भरपूर आराम मिळेल.

– जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल, तर त्वचेमध्ये नैसर्गिक ओलावा येण्यासाठी मधाचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी आपण केवळ मध चेहऱ्यावर फेसपॅक म्हणून वापरू शकता.

लक्षात ठेवा!

जेव्हा आपण शुद्ध मध वापराल, तेव्हाच मधाचे हे फायदे मिळू शकतात. आजकाल, बनावट मधदेखील बाजारात मोठ्याप्रमाणावर विकला जात आहे, जे लाभदायी ठरण्याऐवजी आरोग्यास हानी पोहोचवतो. शुद्ध मध खूप जाड असतो आणि पाण्यात मिसळल्यानंतर सहज विरघळत नाही, तो तळाशी साठतो. तर, बनावट मध पाण्यात टाकल्यानंतर लवकरच विरघळतो. मधाची शुद्धता तपासण्यासाठी हे एक अचूक प्रमाण नाही. परंतु, या पद्धतीने आपण शुद्ध आणि बनावट मध यांच्यातील फरकाचा अंदाज लावू शकतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Health Benefits of Honey during corona pandemic)

हेही वाचा :

Summer Drink | शरीराला ऊर्जा देण्याबरोबरच अनेक आजारांना पळवून लावेल ‘कलिंगडाचा रस’!

Healthy Breakfast | नेहमी तंदुरुस्त राहायचंय? मग नाश्त्यात खा ‘हे’ भारतीय पदार्थ!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.