Jackfruit | वजन नियंत्रण आणि चमकदार त्वचेसाठी ‘फणसा’चे सेवन लाभदायी, वाचा याचे फायदे

तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा मधुमेहाची समस्या असेल तर फणस खाणे फायदेशीर ठरते.

Jackfruit | वजन नियंत्रण आणि चमकदार त्वचेसाठी ‘फणसा’चे सेवन लाभदायी, वाचा याचे फायदे
फणसाचे फायदे
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 5:38 PM

मुंबई : जगात केवळ दोन प्रकारचेच लोक आहेत, एक ज्यांना फणस अजिबात आवडत नाही आणि दुसरे ज्यांना फणस खूप आवडतो. आपल्याला फणस आवडो अथवा नावडो, परंतु त्याच्यापासुन असंख्य फायदे मिळवण्यासाठी फणस खाणे आवश्यक आहे. खासकरून जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा मधुमेहाची समस्या असेल तर फणस खाणे फायदेशीर ठरते. चला तर, जाणून घेऊया फणसाचे फायदे…(Health Benefits of Jackfruit)

अल्सरवर रामबाण

फणसाच्या पानांची राख अल्सरच्या उपचारांसाठी खूप उपयुक्त आहे. त्यासाठी ताजी हिरवी पाने धुवून, सुकवून घ्या व त्याची पूड तयार करा. पोटात अल्सर असल्यास हे पावडर खाल्ल्यावर आराम मिळतो.

चेहरा चमकदार बनवण्यासाठी

यासाठी फणसाच्या बियांचे चूर्ण बनवून, त्यात थोडा मध घालून चेहऱ्यावर लावल्यास चेहर्‍यावरील डाग दूर होतात. ज्या लोकांचा चेहरा कोरडा आणि निर्जीव आहे त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर फणसाचा रस लावावा. कोरडा होईपर्यंत त्यावर मसाज करा आणि नंतर थोड्या वेळाने आपला चेहरा पाण्याने धुवा. सुरकुत्यापासून मुक्त होण्यासाठी फणसाची पेस्ट बनवून, त्यात एक चमचा दूध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. नंतर गुलाबपाणी किंवा थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. हे नियमित केल्याने चेहर्‍यावरील सुरकुत्या दूर होतात.

तोंडाच्या अल्सरपासून मुक्ती

जर तोंडात अल्सर असेल, तर फणसाच्या कच्च्या पानांचा रस चघळावा आणि चोथा थुंकावा. याने माऊथ अल्सर बरा होते.

आम्लपित्तापासून आराम

उकडलेळ्या फणसाचा चांगला लगदा करून पाण्यात उकळा. हे मिश्रण थंड करून एक ग्लास सेवन केल्यामुळे शरीरात प्रचंड चैतन्य निर्माण होते. हेच मिश्रण अपचनग्रस्त रूग्णाला दिल्यास त्याचा फायदा होतो.

मधुमेहासाठी फायदेशीर

याच्या पानांचा रस मधुमेहाच्या रुग्णांना खूप फायदेशीर ठरतो. हा रस उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना देखील चांगला आहे (Health Benefits of Jackfruit).

दम्यावर नियंत्रण

दम्याच्या रूग्णांसाठी फणसाचे मूळ फायदेशीर मानले जाते. हे मूळ पाण्यात उकळवून ते पाणी फिल्टर करून प्यायल्याने दमा नियंत्रित केला जाऊ शकतो.

थायरॉईडमध्ये फायदेशीर

थायरॉईडसाठी देखील फणस फायदेशीर आहे. त्यामध्ये असलेले सूक्ष्म पोषक घटक आणि तांबे, चयापचयसाठी प्रभावी आहेत. हे जिवाणू आणि विषाणूजन्य संक्रमणापासून देखील आपले संरक्षण करते.

प्रतिकारशक्ती वाढते

त्यात व्हिटामिन सी, ए आणि अँटीऑक्सिडंट्स देखील भरपूर प्रमाणात आढळतात. यामुळेच शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यात फणस प्रभावी ठरतो. रोग आणि संक्रमण शरीरापासून दूर ठेवण्यात, प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात फणस महत्वाची भूमिका निभावतो.

वजन कमी करण्यासाठी फणस

ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी फणस हा एक चांगला पर्याय असू शकतो. त्यात चरबी नसते आणि कॅलरी देखील कमी असतात. यासह, यात भरपूर पौष्टिक घटक देखील आहेत. यामध्ये प्रथिनांचीही चांगली मात्रा असते, ज्यामुळे पोट बर्‍याच काळासाठी भरलेले राहते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Health Benefits of Jackfruit)

हेही वाचा :

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.