Health | केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत, शरीरातील अनेक समस्यांवर गुणकारी ‘कांदा’!
कांदा हा अनेक विकारांवर गुणकारी आहे. भरपूर प्रमाणात कांदा खाल्ल्यास अनेक समस्यांचा त्रास कमी होते.
मुंबई : कांदा फक्त स्वयंपाक घरापुरता मर्यादित नाही. कॉस्मेटोलॉजी आणि औषधांमध्येही कांदा वापरला जातो. जेवणात वापरला जाणारा कांदा शरीरातील अनेक व्याधींवर रामबाण उपाय ठरतो. कांद्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन, कॅल्शियम, खनिज, फॉस्फोरस, कॅलरी, लोह असते. तसेच कांदा आपल्या शरीरातील पाण्याची कमतरताही भरून काढतो. कांदा हा अनेक विकारांवर गुणकारी आहे. भरपूर प्रमाणात कांदा खाल्ल्यास अनेक समस्यांचा त्रास कमी होते. (Health Benefits of Onion)
बद्धकोष्टता कमी होते : कांद्यात असलेले फायबर पोटासाठी खूप फायदेशीर आहे. कांदा खाल्याने कफ दूर होतो. जर तुम्हांला वारंवार बद्धकोष्टता होत असेल तर, नियमित कांदा खाणे फायदेशीर ठरते.
घश्याची खवखव कमी होते : वारंवार सर्दी, खोकल्याचा त्रास होत असेल तर, कांद्याचा ताजा रस प्यावा. या रसात गूळ किंवा मध मिसळून प्यायल्याने अधिक गुणकारी ठरेल. (Health Benefits of Onion)
नाकातील रक्तस्त्राव थांबवतो : नाकातून रक्तस्त्राव होत असेल तर, कच्चा कांदा कापून त्याचा वास घ्यावा. असे केल्याने नाकातून येणारे रक्त थांबते आणि आराम मिळतो.
मधुमेहावर नियंत्रण ठेवते : नियमित कांदा खाल्ल्याने शरीरात नैसर्गिकरित्या इन्सुलिन तयार होते. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी दररोज जेवणाबरोबर सलाडच्या स्वरूपात कांदा खाल्ल्यास, त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. (Health Benefits of Onion)
हृदयाशी संबंधित आजार कमी होतात : कच्चा कांदा रक्तदाब नियंत्रित करतो. कांद्यात मिथाईल सल्फाइड आणि अमिनोऍसिड असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो आणि हृदयासंबंधित समस्या कमी होतात.
रक्ताची कमतरता दूर होते : नियमित कांदा खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर होते.
केस गळती कमी होते : केसगळतीपासून मुक्ती मिळवण्यासाठी कांदा खूपच फायदेशीर आहे. केसांवर कांद्याच्या रसाची मालिश केल्याने केस गळणे बंद होते. याशिवाय कांद्याचा लेप लावल्याने कमी वयात पांढरे झालेले केस पुन्हा काळे होऊ लागतात. (Health Benefits of Onion)
फिट्सच्या समस्येवर गुणकारी : जर हायस्टीरियाचा (फिट) रोगी बेशुद्ध झाला असेल तर, कांदा कुटून नाकाला लावल्यास तो लगेच शुद्धीत येतो.
पचनक्रिया सुधारते : हिरवा कांदा खाण्याचे खूप फायदे आहेत. हिरव्या कांद्यात अँटी बॅक्टेरियल गुण असतात. अँटी बॅक्टेरियल गुणांमुळे हा कांदा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. हिरव्या कांद्यामध्ये क्रोमियम देखील असते.
दृष्टी सुधारते : कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए अधिक असल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते.
केसतोडीची वेदना कमी होते : बऱ्याचदा केस शरीरावरील केस तुटल्याने त्या ठिकाणी फोड येतो आणि वेदना होतात. कांदा भाजून त्यावर बांधल्याने केस तोडीच्या वेदना कमी होतात आणि फोडदेखील बरा होतो.
मुतखड्यावर प्रभावी : कांद्याच्या रसात साखर मिक्स करून रिकाम्या पोटी प्यायल्यास किडनी स्टोन (मुतखडा) बाहेर पडण्यास मदत होते. (Health Benefits of Onion)
**(टीप : कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)
संबंधित बातम्या :
तुळशीची 4 पानं, दालचिनी 2, रोग प्रतिकार शक्तीसाठी आयुष मंत्रालयाचा आर्युर्वेद काढा कसा बनवाल?
आजारांपासून दूर राहा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे 7 घरगुती उपाय