Healthy Food | डोळ्यांच्या विकारापासून ते हृदयरोगापर्यंत, व्हिटामिनयुक्त ‘पपई’ बहुगुणकारी!

पिकलेली पपई खूप स्वादिष्ट असते आणि याच्यात खनिज, पोषक तत्व आणि व्हिटामिन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.

Healthy Food | डोळ्यांच्या विकारापासून ते हृदयरोगापर्यंत, व्हिटामिनयुक्त ‘पपई’ बहुगुणकारी!
Follow us
| Updated on: Oct 19, 2020 | 7:13 PM

मुंबई : पपई खाण्याचे खूप फायदे आहेत. पपई हे फळ सगळीकडे सहज उपलब्ध आहे. शिवाय आजारपणात देखील पपई फायदेकारक ठरतो. याचे जास्त दुष्परिणाम नसतात. पिकलेली पपई खूप स्वादिष्ट असते आणि याच्यात खनिज, पोषक तत्व आणि व्हिटामिन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. पपईचे सर्वात जास्त उत्पादन भारतामध्येच होते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये सर्वात जास्त उत्पादन केले जाते. (Health Benefits Of papaya)

पपई केवळ खाण्यासाठीच नाही, तर इतर अनेक कामांमध्ये उपयोगी पडते. कच्ची पपई भाजी बनवण्यासाठी वापरतात आणि यापासून सलाडपण बनवला जातो. पपईच्या बियांचे खूप औषधी गुण आहेत. ज्यामुळे आपला अनेक रोगांपासून बचाव होतो. पपईचा उपयोग अनेक प्रकारची औषधे बनवण्यासाठी केला जातो. विशेष करून पचन संबंधी औषधे बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

हृदय रोगावर फायदेकारक

हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अंग आहे. जर, आपल्याला हृदयासंबंधी काही आजार झाले तर, त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. बऱ्याचदा कोलेस्ट्रोल वाढल्याने हृदयरोगाचा धोका निर्माण होतो. कारण हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जेव्हा कोलेस्ट्रोल जमा होतो, तेव्हा हृदयासंबंधित आजार होतात. पपईमध्ये खूप पोषक तत्त्व असतात. जसे की, फायबर, विटामिन C आणि अँटी ऑक्सिडेंट मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो, ज्यामुळे रक्तात कोलेस्ट्रोल जमा होत नाही. ज्यामुळे आपल्याला हृदयासंबंधित आजार होण्याची संभावना कमी होते.( Health Benefits Of papaya)

पचन शक्ती वाढते

बऱ्याच लोकांना बाजारात झटपट मिळणारे पदार्थ जास्त आवडतात. म्हणून लोक फास्टफूडकडे आकर्षित होत आहेत. पण सतत व जास्त प्रमाणात फास्ट फूड खाल्यामुळे अनेक प्रकारचे आजार होतात. पप मध्ये अनेक प्रकारचे एन्झाईम्स असतात. ज्यामुळे आपली पचन क्रिया चांगली होते आणि आपली पचन शक्ती वाढवण्यास मदत होते. याच्यात डाईट्री फायबर उपलब्ध असते, ज्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते.( Health Benefits Of papaya)

डोळ्यांसाठी लाभदायी

पपईमध्ये अधिक मात्रेत व्हिटामिन A आणि व्हिटामिन C असतात. जे आपल्या डोळ्यांसाठी फायदेकारक ठरतात. वय वाढल्यावर आपली नजर कमी होते, पण पपईच्या नियमित सेवनाने डोळ्यांना फायदा होतो.

त्वचेसाठी फादेकारक

पपईमध्ये असलेले व्हिटामिन c, व्हिटामिन E आणि बीटा क्यारोटीनसारखे अँटी ऑक्सिडंट असतात, ज्यामुळे चेहऱ्यावर चमक येते आणि व्हिटामिनमुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. यामुळे आपण अधिक काळासाठी तरुण दिसू शकतो. पपईमध्ये उपलब्ध असलेले क्यारोटीन हे फुफ्फुस व तोंडाच्या कॅन्सरपासूनदेखील बचाव करते.

(Health Benefits Of papaya)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.