Winter Fruit | थंडीच्या दिवसांत ‘रताळे’ खाणे अतिशय गुणकारी, शरीराला होतील अनेक फायदे!
रताळे कच्चे, उकडून, भाजून किंवा त्यापासून एखादा चमचमीत पदार्थ बनवून खाण्यासाठी वापरतात.
मुंबई : सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरु आहे. बाहेर थंडीचा कडाका वाढत आहे आणि अशा या थंड हंगामात बाजारात विविध हंगामी फळे विक्रीस येत आहे. या फळांच्या सेवनाने तुमच्या शरीराला अनेक फायदे होऊ शकतात. यापैकी एक फळ, कंदमूळ म्हणजे रताळे. या रताळ्याला स्वीट पोटॅटो देखील म्हणतात (Health benefits of sweet potato).
रताळे कच्चे, उकडून, भाजून किंवा त्यापासून एखादा चमचमीत पदार्थ बनवून खाण्यासाठी वापरतात. जातीनिहाय काही रताळे पांढरे, काही केशरी तर काही पिवळट रंगाचेही असतात. मात्र, बाजारात ही कंदमुळे खरेदी करताना चांगली पाहून घ्यावीत. अनेकदा खोडून काढताना मार लागून किंवा जमिनीतील कीटकांच्या किडीमुळे हे कडू चवही देतात. कडू भाग काढून आपण हा पदार्थ सहजतेने खाऊ शकतो. आरोग्याच्या बाबतीत याचे अनेक पोषक फायदे आहेत. चला तर जाणून घेऊया या फायद्यांविषयी…
रताळ्याचे फायदे :
– हिवाळ्यात रताळे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. कंदमूळे आणि फळे खाणे हिवाळ्यात अधिक फायदेशीर असतात कारण ते आपले शरीर आतून उबदार ठेवतात. रताळ्याच्या गडद रंगात बीटा-कॅरोटीन आणि व्हिटामिन ए, कॅरोटीनोइड्स जास्त प्रमाणात आढळतात. 100 ग्रॅम रताळ्यामध्ये 400 टक्क्यांपेक्षा जास्त जीवनसत्व आढळतात.
– रताळ्यात लोह, फोलेट, तांबे, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे असतात, जे तुमची रोगप्रतिकार शक्ती बळकट करतात. हे खाल्ल्याने तुमची त्वचा चमकदार होते. तसेच, चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येत नाहीत. त्यामध्ये उपस्थित व्हिटामिन सी त्वचेमध्ये कोलेजेन तयार करतो, जे आपल्याला नेहमी तरुण आणि सुंदर दिसण्यात मदत करतात.
– रताळ्यांमध्ये तंतुमय मेद मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनक्रिया सावकाश पद्धतीने सुरू राहून लवकर भूक लागत नाही. यामुळे रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित राहते (Health benefits of sweet potato).
– या कंदमूळाच्याच्या सेवनाने शरीरात रक्ताची वाढ होते आणि त्याचबरोबर ते आपल्या शरीरातील कार्यशक्ती देखील वाढवते. त्यात असलेले व्हिटामिन बी 6 हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
– वजन वाढण्यात अन्नातल्या उर्जा (कॅलरीज) चा सर्वात मोठा वाटा असतो. रताळ्यात कॅलरीजचं प्रमाण प्रत्येकी 100 ग्रॅम मागे फक्त 90 एवढं कमी असतं.
– जर काही खाल्ल्यानंतर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढली, तर रताळे खाणे चांगले. यासह, रक्तातील साखर नेहमीच नियंत्रित राहते आणि मधुमेहदेखील वाढू डेत नाही.
– त्यामध्ये सामान्य प्रमाणात कॅलरी आणि स्टार्च असतात. त्याच वेळी, संतृप्त चरबी आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण अतिशय कमी असते. त्यात फायबर, अँटी-ऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे आणि ग्लायकोकॉलेट्स आढळतात.
– रताळ्यात पिष्टमय पदार्थाचा प्रकार हा घटक असतो. आपल्या शरीरातील अतिरिक्त मेद (चरबी) कमी करण्याचं काम करतो. सोबतच तयार होणाऱ्या नवीन मेदावारही नियंत्रण आणतो.
(Health benefits of sweet potato)
हेही वाचा :
मिठाई खायची इच्छाय, पण शुगरचा प्रॉब्लेम? नो टेन्शन ही फळं ट्राय करा!https://t.co/lxsw0Honnb#fruits #Sugar #Health #Immunity
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 14, 2020