Healthy Food | चविष्ट अळूच्या पानांचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे, मधुमेहाच्या रुग्णांसाठी ठरेल वरदान!

हृदयाच्या आकाराच्या अरबीच्या पानांमध्ये बरेच औषधी गुणधर्म असतात. भारतीय घरांमध्ये भाजी शिवाय इतर विविध पदार्थांमध्ये देखील ही पाने वापरली जातात.

Healthy Food | चविष्ट अळूच्या पानांचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे, मधुमेहाच्या रुग्णांसाठी ठरेल वरदान!
अळूची पाने
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 4:39 PM

मुंबई : हिरव्या पालेभाज्यांचे सेवन आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. यापैकी एक ‘अरबी पाने’ अर्थात ‘अळूची पाने’ ही एक अतिशय आरोग्यदायी भाजी आहे. हृदयाच्या आकाराच्या अरबीच्या पानांमध्ये बरेच औषधी गुणधर्म असतात. भारतीय घरांमध्ये भाजी शिवाय इतर विविध पदार्थांमध्ये देखील ही पाने वापरली जातात. त्याच्या अनोख्या चवीमुळे अरबीच्या पानांचा भजी बनवण्यासाठी देखील वापर केला जातो (Health benefits of Taro leaves aka aluchi pane).

अरबी अर्थात अळूचे पिक उपोष्णकटिबंधीय आणि उष्णकटिबंधीय प्रदेशात घेतले जाते. शरीराचे विविध विकार दूर करण्यासाठी याचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. एकंदरीत आरोग्य सुधारण्यास हे फायदेशीर ठरते. चला आरोग्यासाठी अरबीच्या पानांचे फायदे जाणून घेऊया…

हृदय निरोगी ठेवते

हृदय शरीराच्या इतर अवयवांकडे रक्त पुरवठा करते. परंतु, जेव्हा चरबी जमा झाल्यामुळे या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात, तेव्हा शरीरातील रक्ताचा प्रवाह थांबतो. हे टाळण्यासाठी अरबी पाने खूप फायदेशीर असतात. या पानांत नायट्रेट असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

उच्च रक्तदाब नियंत्रित करते

उच्च रक्तदाब ग्रस्त असलेल्यांनी त्यांच्या आहारात अरबी पानांचा नियमित समावेश केला पाहिजे. यामध्ये चरबी अजिबात नसते आणि सोडियमचे प्रमाणही कमी असते. अरबीचे पान नियमितपणे खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित होतो.

दृष्टी सुधारते

या पानांमध्ये विविध प्रकारचे पौष्टिक घटक आढळतात. त्यात आढळणारी बीटा कॅरोटीन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. अरबीची पाने खाल्ल्याने दृष्टी वाढते. अरबी पानांमध्ये व्हिटामिन ए देखील आढळतो, जो डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे (Health benefits of Taro leaves aka aluchi pane).

रक्तातील साखर नियंत्रणात राहते

मधुमेह असलेल्या लोकांसाठी अरबी पाने फायदेशीर ठरतात. जीवनशैलीतील सुधारणेसह, दररोज अरबी पाने सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित केली जाते. यात प्रतिरोधक स्टार्च असतो, जो सहजपणे शरीरात शोषला जात नाही.

वजन कमी होते

लठ्ठपणा ही एक सामान्य समस्या आहे. जास्त तेलकट पदार्थांचे सेवन केल्याने शरीरात चरबी जमा होते. अरबी पानांमध्ये फारच कमी कॅलरी आढळतात. यात आहारातील फायबर देखील असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. विविध गुणांनी समृद्ध असल्याने, अरबी पाने शरीराच्या अनेक विकारांवर विजय मिळविण्यास मदत करतात. हे केवळ रक्तातील साखर नियंत्रित करतेच, परंतु डोळ्यांची दृष्टी देखील वाढवते.

आयर्नची झीज भरून निघते.

रक्ताच्या कमतरतेमुळे वाढणारा अ‍ॅनिमियाचा त्रास रोखण्यास अळू मदत करते. अळूमध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन सी उपलब्ध असल्याने आयर्न शोषून घेण्याची क्षमतादेखील सुधारते.

(टीप : सेवनापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Health benefits of Taro leaves aka aluchi pane)

हेही वाचा :

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.