Methi for diabetes | मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी गुणकारी ‘मेथीचे दाणे’, असे करा सेवन…
आतापर्यंत मधुमेहावर मेथीच्या दाण्यांचा परिणाम, यावर बरेच अभ्यास केले गेले आहेत, ज्यात त्याचे बरेच फायदे दिसले. संशोधनात असे दिसून येते की, मेथीमध्ये प्रोबायोटिक्स असतात.
मुंबई : मधुमेह हा आजच्या युगातील सर्वात गंभीर आजार आहे, ज्याचा उपचार करणे शक्य नाही. म्हणजेच, जर हा आजार एखाद्या व्यक्तीस झाला, तर त्या व्यक्तीला आयुष्यभर या समस्येचा सामना करावा लागतो. आपण औषधे आणि खाण्यात बदल करून त्याचे दुष्परिणाम कमी करू शकता, परंतु त्यापासून पूर्णपणे मुक्त होऊ शकत नाही (Health care tips Methi for diabetes patients).
अशा परिस्थितीत विज्ञान आणि आयुर्वेद म्हणतं की, हा रोग टाळण्यासाठी मेथीचे दाणे वापरले जाऊ शकतात. चला तर, जाणून घेऊया मेथीचे दाणे आपल्याला मधुमेहाच्या समस्येपासून कसे वाचवू शकतात…
अभ्यास काय म्हणतो?
आतापर्यंत मधुमेहावर मेथीच्या दाण्यांचा परिणाम, यावर बरेच अभ्यास केले गेले आहेत, ज्यात त्याचे बरेच फायदे दिसले. संशोधनात असे दिसून येते की, मेथीमध्ये प्रोबायोटिक्स असतात. हे गुणधर्म शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलवर परिणाम न करता ते कमी करतात. याशिवाय ते रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याचेही काम करतात, ज्यामुळे तुम्हाला मधुमेहाचा धोका टाळता येतो. मेथीच्या दाण्यांमध्ये अल्कलॉइड आढळतात, जे मधुमेहावरील रामबाण उपाय म्हणून ओळखले जातात. त्यांचे हे गुणधर्म शरीरातील पातळीवर नियंत्रण ठेवतात.
एका अभ्यासात असेही म्हटले आहे की, जर दररोज 10 ग्रॅम मेथीचे सेवन केले, तर मधुमेहामुळे होणाऱ्या समस्याही कमी होऊ शकतात. मेथीच्या दाण्यांमध्ये विद्रव्य फायबर आणि ग्लूकोमोनास फायबर असते. ते आतड्यांमधून ग्लूकोज शोषून घेण्यास आणि मधुमेह नियंत्रित करण्याचे कार्य करतात. याव्यतिरिक्त, मेथीमधील अल्कॉइड्समुळे शरीरात इन्सुलिनचे प्रमाण सुधारते आणि ग्लाइसेमिक पातळी कमी होते. यासाठीच मेथीच्या दाण्यांचे सेवन कसे करावे ते जाणून घेऊया, जेणेकरुन मधुमेह आणि इतर परिणाम टाळता येतील.
मेथीचा चहा
हे ऐकून तुम्हाला थोडे विचित्र वाटेल. परंतु, मधुमेह टाळण्यासाठी आणि त्याचे परिणाम कमी करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. यासाठी पाण्यात मेथीची दाणे भिजत घालावे आणि त्यांना 10 ते 15 मिनिटे उकळवावे. यानंतर, चहाप्रमाणेच त्याचे सेवन करावे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहील (Health care tips Methi for diabetes patients).
मेथी पावडर
100 ग्रॅम मेथी पावडरच्या डोसवर नुकतेच संशोधन केले गेले. या संशोधनात मधुमेह रूग्णांना दुपारच्या व रात्रीच्या जेवणासह मेथीची पावडर समान प्रमाणात दिली गेली. 24 तासांनंतर मधुमेहाच्या रूग्णातील साखरेची पातळी आणि कोलेस्ट्रॉलची तपासणी केली, तर त्यात चंगलीच घट आढळली.
दही आणि मेथीचे सेवन
दही आणि मेथी दोन्हीमध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म शरीरात ग्लुकोजची पातळी कमी करण्यासाठी मदत करतात. अशा वेळी एक कप दहीमध्ये मेथीची पूड घालून खा. याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
भिजलेल्या मेथीचे सेवन
मेथीमध्ये आढळणारे पौष्टिक घटक मधुमेहाच्या समस्येसवर गुणकारी ठरतातच, परंतु पचन आणि आम्लपित्ताच्या समस्येस देखील प्रतिबंधित करतात. जर, आपल्यालाही मेथीच्या माध्यमातून या समस्यांपासून आराम मिळवायचा असेल, तर यासाठी दररोज 10 ग्रॅम मेथीचे दाणे गरम पाण्यात भिजवून त्याचे सेवन करावे (Health care tips Methi for diabetes patients).
एकावेळी किती मेथी खावी?
अभ्यासानुसार, एका दिवसात 2 ते 25 ग्रॅम मेथीचे सेवन करणे योग्य आणि सुरक्षित आहे. तथापि, त्याचे प्रमाण किती बरोबर आहे, ते सेवन करत असलेल्या व्यक्तीवर अवलंबून असते. तसे, त्याचे एकावेळी जास्तीत जास्त प्रमाण 10 ग्रॅम निश्चित केली गेले आहे. याशिवाय मेथीचे कच्चे दाणे 25 ग्रॅम, पावडर 25 ग्रॅम आणि भिजवलेली मेथी देखील 25 ग्रॅमच योग्य आहे. परंतु, जर तुम्हाला मेथीचे सेवन करायचे असेल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मेथीचे सेवन केल्यास चयापचय क्रिया, इन्सुलिन आणि ग्लुकोज सुधारण्यास मदत होते. या व्यतिरिक्त, ज्यांना मधुमेह होण्याचा धोका आहे किंवा ज्यांचा कौटुंबिक इतिहास या रोगाशी जोडलेला आहे, त्यांच्यासाठी देखील हे फायदेशीर आहे. तथापि, मधुमेह टाळण्यासाठी केवळ मेथीच नाही तर योग्य जीवनशैली, अन्न आणि व्यायाम देखील आवश्यक आहेत.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Health care tips Methi for diabetes patients)
हेही वाचा :
Diabetes Test | मधुमेहाची तपासणी करताना करू नका ‘या’ चुका, अन्यथा होईल मोठी गडबड!#DiabetesTest | #BloodSugar | #Health | #healthtips https://t.co/owd9wluP2X
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 12, 2021