Fitness Mantra | केवळ व्यायामच नव्हे, तर तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी ‘या’ सवयी बदलण्याची गरज!

स्वतःला फिट ठेवण्यासाठी सोप्या सरळ गोष्टी दुर्लक्षित करून अनेकदा फॅन्सी डाएट आणि हार्डकोर व्यायामावर लक्ष केंद्रित करतो.

Fitness Mantra | केवळ व्यायामच नव्हे, तर तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी ‘या’ सवयी बदलण्याची गरज!
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 11:30 AM

मुंबई : कोरोना साथीच्या काळात आणि तीव्र थंडीमध्ये स्वत:ला निरोगी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत, तणाव आणि व्यस्त जीवनशैलीमुळे स्वत:ला निरोगी ठेवणे हे एखाद्या आव्हानापेक्षा काही कमी नाही. परंतु, अशावेळी आपण स्वतःला फिट ठेवण्यासाठी सोप्या सरळ गोष्टी दुर्लक्षित करून अनेकदा फॅन्सी डाएट आणि हार्डकोर व्यायामावर लक्ष केंद्रित करतो (Health Tips for fitness).

कमी खाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे व अत्याधिक खाणे दोन्ही आरोग्यासाठी घातक आहे. शरीराला कोणत्याही प्रकारचा अपाय न होता वजन कमी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आधुनिक जीवनशैलीमध्ये भरपूर खा, तयार बनविलेले पदार्थ खा, कितीही खा, अशा पध्दतीने आहार घेतला जातो, गरजेपेक्षा जास्त आहार शरीरात ढकलला जातो. आपल्याकडे अन्न पदार्थाचे स्वरूप, त्यातील पौष्टिक घटक न बघता फक्त पॅकिंग किंवा कंपनीचे नाव बघून अन्नपदार्थ खाल्ले जातात. या सर्व प्रकारामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे.

जर आपण केवळ व्यायाम आणि आहारासह तंदुरुस्त राहू शकतो, असे आपल्याला वाटत असेल, तर हे पूर्णपणे चुकीचे आहे. व्यायामाऐवजी काही सवयींचा अवलंब करुन आपण तंदुरुस्त राहू शकता. यामुळे आपल्याला दररोज व्यायामाची आवश्यकता नाही. आपल्याला फक्त या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी नियमित घ्यावी लागेल.

तणावापासून दूर रहा.

ताण आपल्या आरोग्यासाठी सर्वात हानिकारक आहे. त्यामुळे नेहमी तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. कठीण काळात आपण जितके शांत रहाल, तितके आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे (Health Tips for fitness).

कॅलरीवर लक्ष द्या.

हार्डकोर डाएटऐवजी आपल्या नियमित पदार्थांतून सेवन करत असलेल्या कॅलरीवर नियंत्रण ठेवा. आपल्या आहारात अधिक कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश करू नका.

भरपूर झोप घ्या.

पुरेशी झोप चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असते. मानवी शरीराला दररोज 7 ते 8 तास झोप मिळणे आवश्यक आहे. चांगली झोप तुम्हाला नेहमी निरोगी ठेवते.

भरपूर पाणी प्या.

दररोज 2 ते 3 लिटर पाणी प्या. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी पिण्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते आणि चरबीही कमी होते.

स्वत:ला आनंदी ठेवा.

सतत स्वत:ला आनंदी ठेवल्याने आपले आरोग्य देखील चांगले राहते. एखाद्याने प्रत्येक गोष्टीत आनंदी राहिले पाहिजे. यामुळे आपण निरोगी राहाल, तसेच तणावापासून दूर राहण्यास मदत होईल.

(Health Tips for fitness)

हेही वाचा : 

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.