Child Care | मुलांची उंची वाढत नाहीय? मग, डाएटमध्ये सामील करा ‘हे’ पदार्थ!

उंची न वाढण्याची काही अन्य कारणे देखील असू शकतात. परंतु, शरीरात पौष्टिक घटकांची कमतरता हे मुख्य कारणांपैकी एक मानले जाते.

Child Care | मुलांची उंची वाढत नाहीय? मग, डाएटमध्ये सामील करा ‘हे’ पदार्थ!
मुलांची उंची
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 12:19 PM

मुंबई : सध्याच्या बदलत्या जीवनशैलीचा मुलांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. कमकुवत आहारामुळे त्यांचे शरीर योग्य प्रकारे वाढत नाही आणि त्याचा परिणाम त्यांच्या उंचीवर देखील होतो. उंची कमी असल्याने, बर्‍याच वेळा मुलांची चेष्टा देखील केली जाते, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो (Healthy food for childrens height growth).

उंची न वाढण्याची काही अन्य कारणे देखील असू शकतात. परंतु, शरीरात पौष्टिक घटकांची कमतरता हे मुख्य कारणांपैकी एक मानले जाते. अशावेळी मुलांसह पालक देखील चिंताग्रस्त होतात. मात्र, चिंता सोडून आपल्या मुलांच्या आहारात काही विशिष्ट घटकांचा समावेश केला पाहिजे. चला तर, जाणून घेऊया अशाच काही सुपरफूड्सबद्दल, ज्यांच्या समावेश मुलांच्या आहारात केला, तर त्यांचे शरीर मजबूत बनण्यासह उंची वाढवण्यात देखील उपयुक्त ठरू शकते.

अंडी

अंडी मुलांची उंची वाढवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. अंडी प्रोटीनचा एक चांगला स्त्रोत मानला जातो, तसेच त्यात रायबोफ्लेविन हा घटक देखील आढळतो. हे दोन्ही घटक शरीराच्या वाढीसाठी चांगले मानले जातात.

दूध

आपण आपल्या बालपणात वडिलधाऱ्यांकडून असे ऐकले असेल की, तुम्हाला लवकर मोठे व्हायचे असेल, तर दूध प्यायले पाहिजे. वास्तविक दूध हा कॅल्शियमचा मुख्य स्रोत मानला जातो. यामुळे शरीराची हाडे विकसित होतात. हाडांचे वस्तुमान आणि हाडांच्या घनतेच्या विकासात दूध मदत करते. शरीराच्या विकासासाठी हाडांचा विकास खूप महत्वाचा आहे. अशा परिस्थितीत मुलांची उंची वाढवण्यात दूध उपयुक्त ठरते.

अश्वगंधा

अश्वगंधा हा आयुर्वेदात औषधी गुणधर्मांचा खजिना मानला जातो. याचा उपयोग बर्‍याच समस्यांपासून मुक्त होण्यासाठी केला जातो. मुलांच्या आहारामध्ये अश्वगंधाची पावडर सामील केल्यास, त्यांचे शरीर मजबूत आणि कणखर बनते. तसेच उंची देखील चांगली वाढते. परंतु, यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे बंधनकारक आहे (Healthy food for childrens height growth).

सोयाबीन

मुलांच्या आहारात सोयाबीनचा समावेश करावा. सोयाबीन प्रथिने समृध्द असतात, जे शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असतात. प्रथिने हाडे आणि स्नायू तयार करण्यात आणि त्यांना विकसित करण्यात मदत करतात. अशा वेळी, ते उंची वाढवण्यात देखील प्रभावी ठरू शकतात.

कडधान्य

मुलांना आहारात अक्खी कडधान्य खाण्याची सवय लावा. आपण स्प्राउट्स म्हणूनहे त्यांना खाण्यास देऊ शकता. यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. कडधान्य खाल्ल्याने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे, तांबे, मॅंगनीज, जस्त आणि लोह या सर्व पोषक गोष्टी मुलांच्या शरीरात पुरेशा प्रमाणात जातात. याचा परिणाम त्यांच्या वाढीवर देखील होतो.

आवळा

व्हिटामिन सी समृद्ध असलेला आवळा उंची वाढवण्यात देखील उपयुक्त मानला जातो. हा शरीरातील हार्मोन्स संतुलित करतो आणि मेंदूला चालना देतो.

(Healthy food for childrens height growth)

हेही वाचा :

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.