Food | उन्हाळ्यात शरीराला ठेवायचंय आतून ‘कूल’, तर आहारात ‘या’ घटकांचा करा समावेश!

वसंत ऋतु अर्थात उन्हाळा आता जवळ आला आहे. हिवाळा संपत असताना आपल्या शरीरात आतून उष्णता जाणवू लागते.

Food | उन्हाळ्यात शरीराला ठेवायचंय आतून ‘कूल’, तर आहारात ‘या’ घटकांचा करा समावेश!
हिवाळा संपत असताना आपल्या शरीरात आतून उष्णता जाणवू लागते.
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 5:40 PM

मुंबई : हिवाळ्याच्या काळात सर्दी टाळण्यासाठी आणि शरीराला उबदार ठेवण्यासाठी असे पदार्थ सेवन केले जातात जे उबदार आहेत. हे पदार्थ आपल्या शरीराला आतून उबदारपणा प्रदान करण्यात मदत करतात. परंतु, आपल्या सर्वांना माहित आहे की, वसंत ऋतु अर्थात उन्हाळा आता जवळ आला आहे. हिवाळा संपत असताना आपल्या शरीरात आतून उष्णता जाणवू लागते. अशावेळी काय करावे? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो.  तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल. तर काळजी करू नका. आम्ही तुमच्यासाठी असे काही पदार्थ घेऊन आलो आहोत, जे तुमच्या शरीराची उष्णता कमी करण्यात आणि शरीराला आतून थंड ठेवण्यास मदत करतील (Healthy food for reducing internal heat of the body).

शरीराला आतून कूल ठेवतील ‘हे’ पदार्थ :

मुळा

पचनक्रिया सुधारण्यासाठी मुळ्यातील फायबरयुक्त घटक उपयुक्त ठरतात. मुळा आपल्या आहारात कोशिंबीरीच्या रूपात समाविष्ट केल्यास बद्धकोष्ठता दूर होते. मुळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण देखील पुरेसे आहे. त्यामुळे शरीराची उष्णता दूर करण्यात मदत होते.

दही

प्रोबायोटिक समृद्ध दही केवळ मधुरच नाही तर शरीराला शीतलता देखील प्रदान करते. आपण दह्याचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. मसालेदार ताक किंवा गोड लस्सी देखील बनवू शकता. तसेच, आपण दही रायता बनवून तो देखील खाऊ शकता. दह्यासोबत खाण्यासाठी आणखी एक उत्तम पर्याय म्हणजे हंगामी फळे. फळे कापून त्यात दही घालून फ्रुट सलाड बनवून ते खाऊ शकता.

नारळपाणी

शरीराच्या उष्णतेपासून मुक्त होण्यासाठी नारळपाणी हे सर्वोत्तम पेय आहे. हे फार महाग नाही आणि बहुतेक सर्व फळांच्या दुकानांमध्ये उपलब्ध असते. यात आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पौष्टिक पदार्थ मुबलक प्रमाणात आहेट. यामध्ये असलेले शीत गुणधर्म, आपल्याला शरीराच्या उष्णतेविरूद्ध लढण्यास मदत करतात. अभ्यासातून असेही दिसून आले आहे की, नारळपाणी नियमितपणे प्यायल्याने कर्करोगापासून संरक्षण होते (Healthy food for reducing internal heat of the body).

कोथिंबीर

ही स्वस्त औषधी वनस्पती जवळजवळ सर्व भाजी विक्रेत्यांसह सहज उपलब्ध आहे. दही, चाट किंवा रायतामध्ये कोथिंबीर टाकून खाल्ल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. कोथिंबीरची चटणी बनवणे आणि ती आपल्या आहारात समाविष्ट करणे हा सर्वात सोपा आणि चांगला मार्ग आहे. कोथिंबीर आपल्या शरीराचे तापमान केवळ थंड ठेवतच नाही, तर आपल्याला तजेला देखील प्रदान करते.

हिरव्या पालेभाज्या

वर्षभर हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. आपल्या रोजच्या आहारात या भाज्या समाविष्ट करणे देखील फायदेशीर आहे कारण हिरव्या पालेभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र, हे लक्षात ठेवा की, या भाज्या जास्त प्रमाणात शिजविणे टाळा. कारण यामुळे त्यातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

लिंबू

व्हिटामिन सी समृद्ध लिंबू आपल्याला शरीराच्या उष्णतेपासून आराम देतेच, परंतु आपला बर्‍याच रोगांपासून बचाव देखील करते. विशेषत: जेव्हा हवामान बदलत असते, तेव्हा ते आपल्या शरीरास वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी तयार करते. आपण कोशिंबीरी, डाळ-भाजी किंवा चहामध्ये लिंबू घालू शकता.

कांदा

कांदे आपल्या शरीरास आतून थंड ठेवण्यास देखील मदत करतात. कच्चे कांदे खाल्ल्यास तोंडाची चव खराब होऊ शकते. म्हणून, त्यात लिंबू आणि मीठ मिसळून त्याची छान कोशिंबीर बनवा. आपण आपल्या भाज्या, आमट्या आणि रायत्यामध्ये देखील कांदा समाविष्ट करू शकता. लाल कांदा क्वेरसेटिनमध्ये समृद्ध आहे, जो एक नैसर्गिक अँटी- अॅलर्जीन मानला जातो. आपल्या दैनंदिन आहारामध्ये कांद्याचा समावेश केल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

(Healthy food for reducing internal heat of the body)

हेही वाचा :

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.