Healthy Food For Typhoid | टायफॉइड तापात  ‘या’ 5 गोष्टींचे सेवन ठरेल लाभदायी

‘साल्मोनेला टायफी’ नावाच्या जिवाणूच्या संसर्गामुळे टायफॉइडचा ताप येतो. यामध्ये, एखाद्या व्यक्तीचे शरीर तीव्र तापाने गरम होऊ लागते.

Healthy Food For Typhoid | टायफॉइड तापात  ‘या’ 5 गोष्टींचे सेवन ठरेल लाभदायी
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 1:32 PM

मुंबई : ‘साल्मोनेला टायफी’ नावाच्या जिवाणूच्या संसर्गामुळे टायफॉइडचा ताप येतो. या रोगामुळे शरीरातील रक्त कमी होते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती आणि यकृत व्यवस्थित काम करणे थांबवते. यामध्ये, एखाद्या व्यक्तीचे शरीर तीव्र तापाने गरम होऊ लागते. यात कधीकधी अतिसार सारख्या समस्या देखील उद्भवतात. टायफॉइडमध्ये, डॉक्टर रुग्णाला विशिष्ट आहार (टायफॉइड हेल्दी डाएट) सेवन करण्याचा सल्ला देतात (Healthy Food For typhoid patient).

द्रवपदार्थ

टायफॉइडमध्ये तहान लागत नसल्यामुळे रुग्णाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. या दरम्यान रुग्णाला अतिसार किंवा जुलाब यांसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. हा धोका टाळण्यासाठी, शक्य तितके द्रव पदार्थ सेवन करावेत. दररोज किमान 8 ग्लास पाणी प्यावे. या आजारात नारळाचे पाणी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ

टायफॉइडच्या तापात शरीराला जास्त कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खाण्याने फायदा होतो. तथापि, आपण जे काही पदार्थ खात आहोत ते पचण्यास जड नाहीत, याची खात्री करून घायवी. या तापादरम्यान उकडलेले बटाटे किंवा उकडलेले तांदूळ खाणे फायदेशीर ठरू शकते.

मनुका

टायफॉइडच्या तापापासून मुक्तता मिळवण्यासाठी मनुका हा सर्वात चांगला पदार्थ आहे. मनुक्याला युनानी औषधांमध्ये देखील महत्त्वाचे स्थान आहे. मानुक्यामध्ये सैंधव मीठ घालून, ते तव्यावर हलके भाजून खाल्ल्याने टायफॉइडचा ताप कमी होतो. तीव्र ताप आल्यानंतर आपण 4-5 मनुका अशा प्रकारे भाजून खाऊ शकता (Healthy Food For typhoid patient).

दुग्धजन्य पदार्थ

टायफॉइड तापात रूग्णाला बराच अशक्तपणा जाणवतो. अशा परिस्थितीत शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते आणि अशावेळी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन फायदेशीर ठरते. याकाळात शरीराला ऊर्जा देण्यासाठी आपण दही, दूध यासारखी सारख्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू शकता.

हाय कॅलरी अन्नपदार्थ

टायफॉइड तापात, डॉक्टर रुग्णाला जास्त कॅलरीयुक्त आहार घेण्याचा सल्ला देतात. वास्तविक, या तापात एखाद्याचे शरीर कमकुवत होते आणि हळूहळू त्याचे वजन देखील कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत हाय कॅलरीयुक्त अन्न पदार्थ शरीराला ताकद देण्याचे काम करतात. यात आपण केळी, रताळे आणि पीनट बटर यासारखे पदार्थ खाऊ शकता.

(Healthy Food For typhoid patient)

टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.