Age Weight Chart : डायटफायट नंतर… आधी वयाच्या हिशोबाने तुमचं वजन किती असावं ते पाहा; चार्ट पाहाच
वयानुसार आणि उंचीनुसार योग्य वजन कसे काढायचे हे बीएमआयद्वारे कळते. बीएमआय (Body Mass Index) ची गणना आणि तिच्या मर्यादाही आहेत. बीएमआय सोपे असले तरी ते सर्व घटकांचा विचार करत नाही, हेही स्पष्ट केले आहे. अंततः, वेगवेगळ्या उंची आणि वयांसाठी योग्य वजनाची श्रेणी तपशीलवार दिली आहे. आपले आरोग्य राखण्यासाठी योग्य वजन राखणे किती महत्त्वाचे आहे यावरही प्रकाश टाकला आहे.
हल्ली प्रत्येक तरुण किंवा तरुणी वजन कमी करण्याच्या फंदात पडलेले दिसतात. ज्येष्ठ नागरिकही डायटिंग करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. पण वजन कमी करण्यापूर्वी वयाच्या हिशोबाने आपलं वजन किती असावं हे माहीत असणं महत्त्वाचं आहे. नाही तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते. फिट राहायचं असेल तर वजन मेंटेन असणं आवश्यक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आपली लाइफस्टाईल, बॉडी टाइप, डेली अॅक्टिव्हिटीजने आपलं वजन ठरवलं जातं. पण वय आणि उंचीनुसार आपलं वजन किती असावं हे आपल्याला माहीत पडलं तर आपण अगणित आजारांपासून दूर राहू शकतो. किती असावं आपलं वजन? जाणून घेऊया.
उंचीनुसार वजन कसं कॅलक्युलेट करायचं?
BMI (Body mass index) च्या मदतीने उंचीवरून वजन कॅलक्युलेट करतात. त्यामुळेच अंडरवेट आहोत की ओव्हरवेट आहोत हे लोकांना कळतं. जर एखाद्याचा बीएमआय 18.5 हून कमी असेल तर त्याचा अर्थ तो अंडरवेट आहे. 18.5 ते 24.9 च्या दरम्यानचा बीएमआय सर्वात आयडियल मानला जातो. 25 पासून 29.9 बीएमआय ओव्हवेट मानला जातो. जर 30 प्लस असेल तर स्थुलतेचा हा संकेत आहे असं समजून जा.
BMI बाबतचा संभ्रम
काही डॉक्टर बीएमआयच्या वजनाला चुकीचं मानतात. अमेरिकन सीडीसी सारख्या असंख्य संस्था बीएमआयवर विश्वास ठेवू नका म्हणून डॉक्टरांना सांगत आहेत. बीएमआय कॅलक्युलेटरला जीवशास्त्राच्या तज्ज्ञाने नाही तर गणितज्ज्ञाने तयार केलं आहे. त्यात अनेक त्रुटी आहेत. उदा- मसल मास, बॉन डेन्सिटी, बॉडी स्ट्रक्चर, वंश, लिंगच्या अनुसार वजन मोजलं जात नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.
किती उंचीला किती वजन असावं
- 4 फूट 10 इंच – 41 ते 52 किलो वजन
- 5 फूट उंची – 44 ते 55.7 किलो वजन
- 5 फूट 2 इंच – 49 ते 63 किलो दरम्यान वजन
- 5 फूट 4 इंच – 49 ते 63 किलोपर्यंत वजन
- 5 फूट 6 इंच – 53 ते 67 किलो वजन
- 5 फूट 8 इंच – 56 ते 71 किलो दरम्यान वजन
- 5 फूट 10 इंच – 59 ते 75 किलोपर्यंत वजन
- 6 फूट उंची – 63 से 80 किलो वजन
कोणत्या वयात किती वजन असावं?
- 19-29 वर्ष – पुरुष 83.4 किलो, महिलेचं वजन 73.4 किलो पर्यंत असावं.
- 30-39 वर्ष – पुरुषाचे वजन 90.3 किलो आणि महिलेचे वजन 76.7 किलोपर्यंत असावं.
- 40-49 वर्ष- पुरुषाचे वजन 90.9Kg आणि महिला 76.2 किलोची असावी.
- 50-60 वर्ष – पुरुषाचे वजन 91.3 किलोपर्यंत आणि महिलेचं वजन 77.0 किलोपर्यंत.