Monsoon Skincare : आपल्या स्किनकेयरमध्ये एक्सफोलिएशनचा करा समावेश, जाणून घ्या याची पाच कारणे
आपण आपल्या त्वचेला स्क्रब करता तेव्हा ती नवीन पेशींचा एक थर तयार करते आणि ती खोलवर शुद्ध करते, ज्यामुळे आपली त्वचा तजेलदार दिसते. (Here are five reasons to include exfoliation in your skincare)
मुंबई : आयुर्वेदानुसार आपली त्वचा स्वच्छ केल्याने केवळ आपल्या त्वचेच्या वरच्या थरातून घाण निघत नाही तर एक्सफोलिएट होण्यासह बरेच फायदे होऊ शकतात. पावसाळ्यात आपण आपली त्वचा का स्वच्छ करावी यासाठी 5 सोप्या कारणांची यादी येथे आहे. हे आपल्याला मृत त्वचेपासून मुक्त होण्यास मदत करते, ज्यामुळे सेल टर्नओवर वाढतो. आपण आपल्या त्वचेला स्क्रब करता तेव्हा ती नवीन पेशींचा एक थर तयार करते आणि ती खोलवर शुद्ध करते, ज्यामुळे आपली त्वचा तजेलदार दिसते. (Here are five reasons to include exfoliation in your skincare)
एक्सफोलिएट केल्याने त्वचेवरील छिद्र ओपन होतात
आपल्या वातावरणातील जास्त आर्द्रतेमुळे, आपण मुरुम, पुरळ आणि त्वचेच्या इतर समस्यांना बळी पडतो. एक्सफोलिएट केल्याने आपल्या त्वचेवरील छिद्र उघडले जातात आणि त्वचा साफ होते. जर आपली त्वचा संवेदनशील असेल तर आपण आपल्या त्वचेच्या पृष्ठभागावर जास्त प्रमाणात स्क्रब करु नका.
साखर आणि नारळ तेलाचे मिश्रण चांगले
भारतीय महिलांकडून वापरल्या जाणार्या घरगुती उपचारांपैकी एक म्हणजे साखर आणि नारळ तेल यांचे मिश्रण. नारळ तेल सौम्य मॉइश्चरायझर म्हणून काम करते तसेच साखर मृत त्वचेच्या पेशी काढते. आपण याचा वापर आपल्या ओठ, कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर करण्यासाठी करू शकता.
चमकदार त्वचेसाठी हर्बल पॅक वापरा
आपली त्वचा शुद्ध करण्यासाठी बेसन, हळद आणि केशरचा हर्बल पॅकचा वापर करु शकता. यामुळे त्वचेतील नैसर्गिक चमक दीर्घकाळ टिककण्यास मदत करते. हे ब्लॅकहेड्स प्रतिबंधित करते आणि अगदी हट्टी सनटॅन देखील साफ करते.
चेहरा स्क्रब करा
जर आपल्या त्वचेवर आणि खडबडीत पॅच असतील तर सतत एक्सफोलीएटिंग केल्याने नको असलेल्या केसांची वाढ थांबण्यास मदत करते. हे सोपा डीआयवाय(DIY) वापरण्यासाठी, थोडासा लिंबाचा रस पिळून घ्या, एक स्क्रब तयार करण्यासाठी मध आणि साखर घाला. ते लावा, गोलाकार गतीमध्ये वरच्या बाजूस मालिश करा. हे 20-30 मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर धुवा.
स्क्रब केल्याने मूड चांगला होतो
सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे वैदिक ग्रंथांनुसार शारीरिक फायद्यांव्यतिरिक्त, स्वत: ला रगडणे किंवा ब्रश केल्याने आपला मूड चांगला होतो. स्वत: बरोबर वेळ घालवणे, स्क्रीनपासून दूर राहणे आणि स्वत: ची काळजी घेणे आणि पोषणाकडे लक्ष दिल्याने आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर करते. हे आपल्याला तजेलदार बनवणे. (Here are five reasons to include exfoliation in your skincare)
विमा धारक हरवल्यास कुटुंब कशा पद्धतीनं मिळवू शकतात विमा हक्क, 4 सोपे मार्ग जाणून घ्या…#insuranceclaim #insurancepolicy #lifeinsurancepolicy #MissingPerson https://t.co/stQjbres3G
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 1, 2021
इतर बातम्या
ट्रिपल कॅमेरा, दमदार प्रोसेसरसह Realme चा बजेट फोन लाँचिंगसाठी सज्ज, जाणून किंमत आणि फीचर्स