AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Holi 2021 | रासायनिक रंगानी होऊ शकतो कर्करोगाचा धोका, होळीच्या रंगाचा बेरंग होण्यापूर्वी जाणून घ्या दुष्परिणाम!

होळीच्या निमित्ताने रंग आनंद पसरवण्याचे काम करतात. परंतु, जर या रंगांमध्ये भेसळ असेल तर सर्व आनंद बेरंगी होतो आणि त्याला जास्त वेळ लागत नाही. रंगपंचमीसाठी आपण ज्या रंगांचा वापर करतो त्या रंगांमध्ये क्रोमियम, सिलिका, शिसे, सल्फेट आणि अल्कलाईन सारखी रसायने देखील टाकली जातात.

Holi 2021 | रासायनिक रंगानी होऊ शकतो कर्करोगाचा धोका, होळीच्या रंगाचा बेरंग होण्यापूर्वी जाणून घ्या दुष्परिणाम!
फक्त भारतातच नाही तर जगभरातील काही निवडक देशात होळी साजरी केली जाते. पण प्रत्येक देशात याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 2:11 PM

मुंबई : होळीच्या निमित्ताने रंग आनंद पसरवण्याचे काम करतात. परंतु, जर या रंगांमध्ये भेसळ असेल तर सर्व आनंद बेरंगी होतो आणि त्याला जास्त वेळ लागत नाही. रंगपंचमीसाठी आपण ज्या रंगांचा वापर करतो त्या रंगांमध्ये क्रोमियम, सिलिका, शिसे, सल्फेट आणि अल्कलाईन सारखी रसायने देखील टाकली जातात. या कृत्रिम रंगांमध्ये काचेची पावडरची भेसळ केल्याचीही प्रकरणे समोर आली आहेत (Holi 2021 know the harmful side effects of chemical colors).

आपण आपल्या त्वचेचे रक्षण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी चांदीच्या रंगाचा वापर करतो, त्या चांदीच्या रंगात कार्सिनोजेनिक असते, यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. तज्ज्ञांच्या मते, जर या रंगांमुळे त्वचेमध्ये एलर्जीची समस्या उद्भवली असेल, किंवा जर ते डोळ्यांत गेले तर आपल्याला त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. चला तर, जाणून घेऊया अशा रासायनिक कृत्रिम रंगांनी होणारे नुकसान आणि त्यापासून बचावण्याचे मार्ग…

रासायनिक रंगांमुळे अशा प्रकारे होते नुकसान

जेव्हा हे रंग आपल्या त्वचेवर लावले जातात, तेव्हा यामुळे खाज सुटणे, लालसरपणा, पुरळ, पुळ्या इत्यादी दुष्परिणाम होऊ शकतात. परंतु, जर हे रंग डोळ्यांत गेले तर ते इतके धोकादायक असू शकते, ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या रंगांमुळे डोळ्यांमध्ये खाज सुटणे, जळजळ होणे, एलर्जी या सामान्य समस्य व्यतिरिक्त, यातील रसायनामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी देखील जाऊ शकते. हिरव्या रंगामुळे विशेषतः डोळ्यांना मोठे नुकसान होऊ शकते.

कर्करोगाचा धोका वाढवणारे लाल आणि सिल्व्हर रंग

सिल्वर आणि लाल रंगात कार्सिनोजेनिक घटक आढळतात. अशा परिस्थितीत त्वचेवर हे रंग लावल्यानंतर, सूर्यप्रकाशाच्या तीव्र प्रकाशामुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो. आपण जर दम्याचे रुग्ण असाल, तर रासायनिक रंग आपल्यासाठी आणखी गंभीर समस्या बनू शकतात. म्हणूनच, या रंगांनी होळी खेळण्याऐवजी आपला सण नैसर्गिक रंगांनी साजरा करणे चांगले (Holi 2021 know the harmful side effects of chemical colors).

डोळ्यांचे रक्षण कसे कराल?

सर्व प्रथम लक्षात ठेवा की, जर हे रंग डोळ्यांत गेले तर डोळे चोळण्याची चूक करू नका. सर्व प्रथम साध्या पाण्याने डोळे धुवा. परंतु, हे लक्षात ठेवा की, डोळे धुतताना जोरात पाणी शिंपडू नका. डोळे धुतल्यानंतर गुलाबाच्या पाण्याचे काही थेंब डोळ्यात घाला आणि काही काळ डोळे मिटून झोपून राहा. परंतु, जर समस्या अधिक दिसत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

त्वचेवर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी या पद्धती वापरा!

त्वचेला रंगांच्या दुष्परिणामांपासून वाचवण्यासाठी त्वचेवर नारळ तेल किंवा मोहरीचे तेल चांगल्या प्रकारे लावा. ते वापरल्याने रंग थेट आपल्या त्वचेवर लागणार नाही. परंतु, रंग आपल्या त्वचेवर लागला तरीही आपण त्वरित पाण्याने स्वच्छ करा.

अशा प्रकारे तयार करा नैसर्गिक रंग!

जर आपण पाण्याचे रंग तयार करत असाल, तर बीटरूट कापून घ्या आणि रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे पाणी लाल रंगाचे होईल. त्याच वेळी, रात्रभर पाण्यात हळद आणि झेंडूची फुले टाकून पिवळा रंग तयार केला जाऊ शकतो.

कोरडे रंग तयार करायचे असतील, तर तुम्ही हळदीमध्ये पीठ घालून पिवळा रंग तयार करू शकता. लाल रंग तयार करण्यासाठी, जास्वंदाची फुले सुकवा आणि तिची पावडर तयार करून, लाल रंग बनवा. जर, हे सोपे वाटत नसेल, तर आपण हर्बल गुलालसह सुक्या रंगाची होळी खेळू शकता.

(Holi 2021 know the harmful side effects of chemical colors)

हेही वाचा :

सर्वाधिक धोकादायक रक्ताचा कर्करोग, प्रारंभिक लक्षणे दिसल्यास सावधगिरी बाळगा

लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रयत्न करतायत? मग, आजच आहारामध्ये ‘हे’ समाविष्ट करा

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....