Holi 2022 : होळीच्या सणाचा आनंद द्विगुणित करायचा असेल तर नारळाच्या करंज्या स्वीट डिश म्हणून हवीच!!

Holi 2022 : स्वादिष्ट मिठाई शिवाय कोणताच सण पूर्ण होत नाही. होळीचा सण काही दिवसांवर येऊन पोहोचलेला आहे. होळीच्या सणाला करंज्या आवडीने खाल्ल्या जातात.आज या सणाच्या निमित्ताने तुम्ही घरच्या घरी मावा ऐवजी नारळाच्या करंज्या सहजच गोड स्विट डिश म्हणून सेवन करू शकता.

Holi 2022 : होळीच्या सणाचा आनंद द्विगुणित करायचा असेल तर नारळाच्या करंज्या स्वीट डिश म्हणून हवीच!!
होळीला हे खास पदार्थ बनवाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 6:44 PM

होळीचा सण ( holi festival) काही दिवसांवर येऊन पोचलेला आहे. प्रत्येक जण या सणाची तयारी करण्यात मग्न आहे. होळीच्या सणाला दिवशी प्रत्येक व्यक्ती एकमेकांना रंग लावून होळीचा आनंद घेत असतात. या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे मिष्टान्न गोड पदार्थ खाऊन हा दिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. करंज्या हा पदार्थ या सणाला मोठ्या आवडीने बनवून खाल्या जातात. हा पदार्थ चवीला अतिशय स्वादिष्ट असतो. सर्वसाधारणपणे या करंज्या मावा (gujiya) पदार्थापासून बनवले जातात परंतु तुम्ही घरच्या घरीसुद्धा हा पदार्थ बनवून या सणाचा आनंद द्विगुणित करू शकता परंतु यंदाच्या होळीला मावा ऐवजी नारळाचा वापर करून तुम्ही या पदार्थाची लज्जत अधिकच वाढू शकतात. नारळाच्या करंज्या चवीला अतिशय गोड असतात आपल्यापैकी अनेक जण दिवाळीच्या सणाला नारळाच्या करंज्या बनवत असतात परंतु होळीच्या सणाला देखील तुम्ही नारळाच्या करंज्या बनवून हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करू शकता. नारळाच्या करंज्या चवीला स्वादिष्ट ( delecious) असतात पण त्याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी देखील याचे खूप सारे फायदे सांगण्यात आलेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया की रेसिपी आपल्याला कशा पद्धतीने बनवायचे आहे त्याबद्दल..

नारळाच्या करंज्या बनवण्यासाठी लागणारी सामग्री.

250 ग्रॅम मैदा

2 कप ऑलिव्ह तेल

150 ग्रॅम किसलेले नारळ

2 मूठभर मिक्स ड्रायफ्रूट्स

2 मोठे चमचे तूप

आवश्यकतेनुसार पाणी

1 कप पिठी साखर

1 चमचा वाटलेली काळी इलायची

नारळाच्या करंज्या बनवण्याची पद्धत कृती :

स्टेप- 1 कणीक मळा

या नारळाच्या करंज्या बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ड्रायफूटचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. आता एक मोठे बाऊल घेऊन त्यामध्ये थोडेसे तूप आणि मैदा टाकायचा आहे.हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित एकजीव करायचे आहे. आपल्या गरजेनुसार पाणी मिक्स करून कणिक मळून घ्यायची आहे आता हा बाउल ओल्या कपड्याने झाकून 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवून द्यावे.

स्टेप – 2 नारळाची स्टफिंग तयार करा.

आता आपल्याला गॅसवर एक तवा किंवा पॅन ठेवायचा आहे आणि त्यामध्ये नारळाचे बारीक कापलेले तुकडे म्हणजचे किस टाकायचे आहेत. नारळ किसाला दोन ते तीन मिनिटांपर्यंत भाजून घ्यायचे आहे आता आपल्याला नारळामध्ये पिठीसाखर टाकायचे आहे. हे मिश्रण आपल्याला काही वेळ एकत्रित भाजायचे आहे. आता यामध्ये विलायची पावडर आणि बारीक ड्रायफूटचे तुकडे टाकायचे आहे त्या सर्व पदार्थांना एक मिनिटांपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आणि स्टफिंगसाठी बाऊल मध्ये काढून एका बाजूला ठेवायचे आहे.

स्टेप – 3 पुऱ्या लाटून घ्या

आता आपल्याला जी मळलेली कणिक आहे त्या कणिके च्या मदतीने बारीक बारीक पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत.

स्टेप – 4 स्टफिंग

आता आपण मळलेल्या कणिके च्या आधारे करंजी बनवण्यासाठी करंजीचा साचा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये गोल लाट्या बनवून त्यामध्ये सारण भरायचे आहे. सारण भरल्यानंतर आजूबाजूला थोडेसे पाणी लावून साचा बंद करायचा आहे. अतिरिक्त प्रमाणामध्ये जमा झालेली कणीक काढून घ्यायची आहे आणि आता बनवलेली करंजी आपल्याला साच्यामध्ये काढून आपल्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे संपूर्ण कणिकेची अशाप्रकारेच आपल्याला करंजी बनवायची आहे.

स्टेप 5 – करंज्या तळा

आता मंद आचेवर किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार एका कढई मध्ये तेल गरम करायला ठेवायचे आहे. या या कडई मध्ये ऑलिव्ह तेलाचा वापर करायचा आहे जोपर्यंत तेल व्यवस्थित गरम होत नाही तोपर्यंत आपल्याला या तेलात करंजी सोडायच्या नाहीत. एकदा का तेल व्यवस्थितरित्या गरम झाल्यावर आपल्याला करंजी सोडायच्या आहेत अशा प्रकारे कुरकुरीत आणि खमंग करंजी लवकरच तयार होऊन जातील.

स्टेप – 6 करंजी खाण्यासाठी वाढा

जेव्हा या करंज्या व्यवस्थित तळून होतील त्यानंतर एका प्लेटमध्ये करंजी खाण्यासाठी घरातील सदस्यांना द्या. कुरकुरीत आणि खमंग करंजी खाऊन प्रत्येकाच्या मनामध्ये वारंवार नारळाच्या करंज्या खाव्यात अशी इच्छा देखील निर्माण होईल, अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी होळीचा सण साजरा करण्यासाठी नारळाच्या करंज्या सहजच बनवू शकता.

Sugar Free Food | शुगर फ्री पदार्थांमागे धावणे सोडा, एक-दोन नव्हे, तब्बल 92 साईड इफेक्ट्स

मखना आणि ड्रायफ्रुट्सपासून बनवा हेल्दी आणि टेस्टी पदार्थ, कसा? वाचा…

‘या’ 10 सवयी तुमची किडनी खराब करतील, वेळीच व्हा सावध!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.